कराड
कराड सिटी या साडेचार वर्षात बाद सिटी करून टाकली आहे मी आज स्मशानभूमीत गेलो होतो त्याठिकाणची अवस्था बघून लाज वाटली अशा शब्दात लोकशाही आघाडीचे नेते सुभाष पाटील यांनी पालिकेच्या कारभाराचे वाभाडे काढले शहराच्या कारभाराचा तमाशा झालाय असे म्हणणारे काका आज पुन्हा रोखठोक पहायला मिळाले...निमित्त होते लोकशाही गटाच्या पत्रकार परिषदेचे... त्यावेळी शहरातील अनेक प्रश्नाबाबत सुभाषकाकानी नाराजी व्यक्त करत एकूणच कारभारावर टीका केली...
नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांनी भ्रष्टाचार केल्याचा आरोप करत त्यांनी शहराची आणि सभागृहाची माफी मागावी या मागणीसाठी लोकशाही आघाडीने पत्रकार परिषद घेतली होती त्यावेळी मी अजूनही या आघाडीचा अध्यक्ष आहे आणि म्हणून इथं आलो आहे... असे स्पष्ट करत नेते सुभासकाका देखील यावेळी उपस्थित राहिले...मागे काही दिवसांपूर्वी त्यांनी पालिकेच्या एकूणच चाललेल्या कारभारावर कारभाराचा तमाशा झालाय अशा शब्दात टीका केली होती..याहीवेळी त्यांनी रोखठोक मत मांडत शहराच्या कामकाजाबद्दल सडेतोडपणे आपल्या स्टाईलने ताशेरे ओढले...
शहराच्या रखडलेल्या आजपर्यंतच्या कामाबाबत बोलताना कोणत्याही प्रकारचा अभ्यास संबंधितांचा दिसत नाही... त्यासाठी डेडिकेशन लागत... त्याग लागतो... तोही दिसत नाही... निर्णय क्षमता लागते... नुसतं मागच बघून पुढं कामकाज करण्याचा उद्योग सुरू आहे... गेल्या साडेचार वर्षात शहरात कोणतीही रखडलेली कामे झाली नाहीत... योजना राबविल्या नाहीत... असे स्पष्ट मत व्यक्त करत पालिकेत चाललेल्या कामकाजाबद्दल त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली...
निकृष्ठ काम करणाऱ्या ठेकेदारांना... ब्लॅक लिस्ट करून त्यांना... दगडं भरून ठीकं भेट देण्याचा विषय ठरला होता... यासाठी सगळ्याच नगरसेवकांनी सहमती दर्शवली होती... याबाबत लोकशाही ची भूमिका काय असे विचारले असता... त्या ठेकेदारानेच ठीक भरून याना काहीतरी दिलं असलं तर काय माहीत... असा उपहासात्मक प्रश्न करत काकांनी याही प्रश्नाबाबत कारभाऱ्यांना टोला हाणला ...स्मार्ट सिटी च्या विषयाची खिल्ली उडवताना ते म्हणाले... साडेचार वर्षात बाद सिटी करून टाकली आहे...आता चार महिन्यात हे काय स्मार्ट सिटी करणार...? आज स्मशानात गेलो होतो तिथली अवस्था बघून लाज वाटली अशा शब्दात देखील त्यांनी पालिकेचा कारभार यावेळी चव्हाट्यावर आणला...
एकूणच साडेचार वर्षाच्या सगळ्या कारभाराचे पोस्टमार्टम करत काकांनी आपली रोखठोक मतं त्यांच्या हटके स्टाईलने व्यक्त केली... म्हणूनच ही पत्रकार परिषद चांगलीच गाजली... त्यांच्या सडेतोड व अभ्यासू बोलण्याने... समर्पक उदाहरणे देण्याने... आणि विरोधकांची खिल्ली उडवण्याने पत्रकार परिषदेत अनेकदा हशा पिकला खरा...मात्र त्यातून त्यांचा तोच रोखठोकपणा, अभ्यास व एकूणच सर्व घडामोडींवर असणारे बारीक लक्ष दिसून आले.. पालिकेत आलोय म्हणजे मी अजूनही आघाडीचा अध्यक्ष आहे...म्हणून आलोय... नाहीतर विरोधक म्हणतील हे इथं कसे...असे त्यांनी शेवटी आवर्जून सांगितले आणि आपल्या उपस्थितीबद्दल भविष्यात होणाऱ्या विरोधकांच्या टीकेचा अगोदरच समाचार घेत त्यांनी आपल्या जबरदस्त पोलिटिकल सेन्सचे दर्शन पत्रकारांना यावेळी दिले...
काही दिवसांपूर्वी त्यांनी घेतलेली पत्रकार परिषददेखील शहरात चर्चेची राहिली होती त्यांनी त्यावेळी देखील आपल्याला लोक मेहरबान म्हणतात म्हणजे त्या शब्दाचा अर्थ काय...त्यांची जबाबदारी काय...याचे सविस्तर विवरण केले होते...गटनेता निवडून पालिकेत गेला पाहिजे असे आपल्याच पार्टीच्या गटनेत्याच्या नावाची नव्याने घोषणा करताना त्यांनी वक्तव्य केले होते...तसेच पार्टी मीटिंग चे महत्व काय असते...असे अनेक विषय हाताळत त्यांनी त्याहीवेळी शहराच्या कारभाराबाबत बोलताना कारभाराचा तमाशा झालाय... असे आपले सडेतोड मत व्यक्त केले होते... त्या पत्रकार परिषदेची शहरात चर्चा झाली होती ..आजही तेच काका आणि तोच रोखठोकपणा पहायला मिळाला...याचीही चर्चा शहरात सुरू आहे.
No comments:
Post a Comment