कराड
कराड जनता बँकेचे अवसायक मनोहर माळी यांनी 6 डिसेंबर 2020 रोजी सहकार आयुक्तांना अहवाल दिला होता. त्या अहवालात कर्मचाऱ्यांच्या 4 कोटी 62 लाख 87 हजारांची वाटलेली कर्ज संशयास्पद आहेत, त्याची चौकशी करा, अशी मागणी करत त्याचा अहवाल सहकार आयुक्तांना केली होती. तेच अवासायिक माळी आता सेवकांच्या कर्जाची अवैधरित्या वसुली करत आहेत. त्या सगळ्याचा खुलासा त्यांनी करावा, अवसायिकांच्या याच मनमानी कारभाराविरोधात आम्ही 15 ऑगस्टला करणाऱ्या उपोषणावर ठाम आहोत. आता माघार घेणार नाही, अशी भूमिका सेवकांनी प्रसिध्दी पत्रकाव्दारे स्पष्ट केली आहे.
प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, बँकेचे अवसायक मनोहर माळी यांचा सेवकांचे तक्रारीबाबत खुलासा बेकायदेशीर केला. कराड जनता सहकारी बँक लि, कराड या बँकेचे बडतर्फ चेअरमन राजेश पाटील यांनी बँकेची मालमत्ताही आपली खासगी मालमत्ता समजून त्यामध्ये नियमबाह्य कामकाज केल्याने बँक अवसायनात निघाली. आता अवसायक माळी हे देखील राजेश पाटील यांचेकडून बँकेची मालमत्ता आपलेकडे हस्तांतरीत झालेली आहे, असे समजून बँकेचा कारभार हाकत आहेत. बँकेच्या सेवानिवृत्त, स्वेच्छानिवृत्त व राजीनामा दिलेल्या सेवकांनी बँकेकडून येणे असलेल्या रकमेबाबत कायदेशीर मार्गाचा अवलंब करून बँकेविरूध्द दावा दाखल केलेला आहे. मात्र, समन्स बजावून देखील कायद्याची भिती वाटत असलेने अवसायक माळी हे कोर्टापुढे हजर न रहाता त्यामधून वेळोवेळी पळवाट शोधत आहेत.
अवसायक मनोहर माळी यांनी आमचे तक्रारीबाबत प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकाबाबत आम्ही सेवक खालीलप्रमाणे खुलासा करत आहोत. पत्रकामध्ये ज्या व्यक्तीने बँकेकडून कर्ज घेतलेले आहे. सदरील व्यक्ती एखाद्या कर्जदारास जामीनदार आहे. त्याने प्रथम कर्जाची परतफेड करावी व त्यानंतर त्यांना बँकेकडे असणारी ठेव रक्कम बँक परत करत असते असा सर्वसाधारण नियम आहे. तो सेवकांनी लागू होतो असे नमूद केलेले आहे. मात्र, बँकेचे तत्कालीन उपमुख्य कार्यकारी अधिकारी (कर्ज) या वरीष्ठ श्रेणीचे अधिकारी व्ही. बी. डूबल यांनी त्यांचे सहीने वरील सर्व सेवकांच्याकडून बँकेस कोणत्याही प्रकारचे कर्ज येणेबाकीत नसलेबाबतचा “ना हरकत दाखला” दिलेला आहे, हे माहीत असूनही जाणिवपूर्वक याची माहिती वृत्तपत्रकापासून लपविलेली आहे.
तसेच संबंधित अधिकाऱ्यास आपली जबाबदारी काय असते याचे आकलन नाही, हे माहीत आहे. देखील यापुढील कोणताही भ्रष्टाचार त्यांचे सहीने विनासायास आपणास करता येईल, हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्या अधिकाऱ्यास अवसायक माळी यांनी पदोन्नती देवून मुख्य कार्यकारी अधिकारी या सर्वोच्च पदावर विराजमान केलेले आहे. मात्र, अवसायक यांनी सेवकांची जी कर्जे येणे बाकीत आहेत, असे दर्शविलेले आहे. आणि त्याबाबत ज्या अधिकाऱ्याने ना हरकत प्रमाणपत्र दिलेले आहे त्याचे विरोधात कोणताही फौजदारी दावा दाखल केलेला नाही.
No comments:
Post a Comment