Tuesday, August 17, 2021

"त्या' नगरसेविकेची पात्रता काय? माझा भत्ता इतर नगरसेवकांबरोबरीने जमा होत असताना माझ्या मानधनाबाबत घाणेरडे राजकारण का? नगराध्यक्षांचा सवाल...

वेध माझा ऑनलाइन
कराड
कराड नगरपरिषदेतील माझ्या मानधनाबाबत गेले काही दिवस उलट सुलट चर्चा विविध आघाड्यांच्या झालेल्या पत्रकार परिषदेमधून सुरु आहेत.  ज्यांची स्वतःची पात्रता काय आहे हे संपूर्ण कराडकरांना माहिती आहे अशी एक शनिवार पेठेतील महिला नगरसेविका स्वत: एक महिला आहोत याचा विचार न करता उचलली जीभ लावली टाळ्याला या प्रकारानुसार अतिशय खालच्या भाषेत माझ्यावर गरळ ओकुन प्रकाशझोतात राहण्याचा अतिशय घाणेरडा प्रकार करत आहे.  तोंड वर करून तुम्ही दुसऱ्यांच्यावर कितीही थुंकायचा प्रयत्न तरी थुंकी शेवटी तुमच्याच तोंडावर पडणार आहे याची जाणीव तुम्हाला नाहि अशा भाषेत नगराध्यक्षा सौ शिंदे यांनी नगरसेविका सौ हुलवान यांचा समाचार निवेदनाद्वारे घेतला आहे 

सौ हुलवान यांनी काही दिवसापूर्वी नगराध्यक्षा सौ शिंदे यांना चोर नगराध्यक्षा म्हणून पत्रकार परिषदेतून हिणवले होते त्यावर पलटवार करताना आज नगराध्यक्षा सौ शिंदेंनी नाव न घेता हुलवान यांच्यावर जबरदस्त हल्लाबोल केला आहे तसेच लोकशाही आघाडी व जनशक्तीवर देखील त्यानी टीका करत त्यांचाही समाचार घेतला आहे 

दरम्यान जनशक्ती आघाडी आणि लोकशाही आघाडी हे दोघेजण मिळून माझ्यावर टीका करीत आहेत . गेले चार - साडेचार वर्ष आपण निद्रिस्त होतात काय ? निवड़णूक जवळ आली की जो माणूस काम करतोय त्याच्या  पाठीमागे आपण का लागलाय , हे कराडकर जनतेला माहित आहे . तुम्ही गेले काही दिवस काय कारस्थान करताय याची संपूर्ण माहिती जनतेला आहे हे तुम्ही विसरू नका या भाषेत नगराध्यक्षा सौ रोहिणी शिंदे यांनी त्यांच्यावर विरोधकांनी केलेल्या आरोपाचा निवेदनाद्वारे समाचार घेतला आहे...दरम्यान माझाही मिटींगचा भत्ता मी स्वतः घेतलेला नाही तर तो भत्ता इतर नगरसेवकांच्या मिटींग भत्त्याप्रमाणे शासकीय जमा झालेला आहे. असाही महत्वपूर्ण खुलासा नगराध्यक्षा सौ शिंदे यांनी या निवेदनातून केला आहे मग माझ्याशी कोणतीही चर्चा न करता परस्पर माझ्या मानधनाचा विषय त्या उपसूचनेमध्ये कसा समाविष्ट केला असा सवालही त्यांनी केला आहे

नगराध्यक्षा सौ शिंदे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की...सन २०१६ मध्ये मी लोकनियुक्त नगराध्याक्षा म्हणुन निवडुन आल्यानंतर पहिले तीन वर्ष रू २५००/- इतके प्रतिमाह मानधन मिळत होते. त्यानंतर २३ ऑगस्ट २०१९ रोजी महाराष्ट्र शासनाने काढलेल्या आदेशानुसार महाराष्ट्रातील सर्व लोकनियुक्त नगराध्यक्षांना प्रतिमाह रु २०,०००/- ( ब वर्ग )इतके मानधन मिळू लागले . माझ्यासारख्या सर्वसामान्य घरातून आलेल्या महिलेला ही रक्कम फार मोठी व मोलाची आहे. कोविड कालावधीत झालेल्या मिटिंगमध्ये एक उपसूचना जनशक्ती कडून मांडण्यात आली. त्यामध्ये नगराध्यक्षा,उपनगराध्यक्ष,सर्व नगरसेवक यांचे सर्व मिटींग भत्ते शासकीय जमा करणेबाबत   ठराव मांडला. यामध्ये त्यांनी उपनगराध्यक्ष, तसेच त्यांच्या गटाच्या नगरसेवकांशी चर्चा केली असे त्यांचे म्हणणे आहे.परंतु माझ्याशी कोणतीही चर्चा न करता परस्पर माझे मानधनाचा विषय त्या उपसूचनेमध्ये कसा समाविष्ट केला. बर इतर सदस्यांबरोबर माझाही मिटींगचा भत्ता मी स्वतः घेतलेला नाही .तो भत्ता इतर नगरसेवकांच्या मिटींग भत्त्याप्रमाणे शासकीय जमा झालेला आहे. असे असताना व मानधन हा माझा वैयक्तीक हक्क असतानासुद्धा मला विचारत न घेता परस्पर काहीही मुद्दे घालून उपसूचना मांडायची. म्हणजे हा नगराध्यक्षा म्हणुन माझ्या वैयक्तिक अधिकारांचे हनन करण्याचा विरोधकांचा डाव आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे.

 तसेच यामध्ये ३२ नगरसेवकांचे आजअखेर झालेल्या मिटिंगचे भत्ते प्रत्येकी एकूण  साधारणपणे ७००/- ते ८००/- शासन जमा झालेत . त्याचप्रमाणे माझ्याही मिटिंगचे भत्ते ७००/- ते ८००/- एकूण शासन जमा झालेत. असे असताना माझे वर्षभराचे वैयक्तिक मानधन रु.२ लाख ४० हजार हे सुद्धा शासनाच्या तिजोरीत जमा करा हे कितपत रास्त आहे .म्हणजे ज्या नगरसेवकांचे करोडोचे व्यवसाय -मालमत्ता आहे, जे पिढयानपिढया राजकारणाचा उपयोग व्यवसाय म्हणून करतात अशा गब्बर नगरसेवकांचे ८००/- रुपये कोविड मदत म्हणून जमा आणि माझ्यासारख्या सामान्य कष्टकरी  घरातून आलेल्या महिलेकडून मात्र सदर ८००/- रुपए भत्ता देण्याबरोबरच मानधनाचेही रु.२ लाख ४० हजार जमा करा म्हणणे म्हणजे माझा हक्क ओरबाडून घेण्याचा हा प्रकार आहे. म्हणजे माझ्यासारख्या सामान्य कुटुंबातून आलेल्या महिलेसोबत अतिशय घाणेरडे राजकारण करण्याचा हा प्रकार आहे.  

दरमहा मला जे २० हजार रुपये मानधन मिळते आहे, त्यामधील काही रक्कम मी निश्चितच सामाजिक कार्यासाठी तसेच गरीब विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कामासाठी मागील २-३ वर्षांपासुन खर्च करते आहे. त्याची वाच्यता करून मला प्रसिद्धी-मोठेपणा मिळवायचा नाही. कारण हि बाब माझ्या मानसिक समाधानासाठी मी करत असून त्याची मी कधीही प्रसिद्धी करीत नाही.

 गेले अनेक दिवस काही आघाड्या, नगरसेवक हे माझ्यावर अतिशय खालच्या पातळीवर जावून वैयक्तिक टीका करू लागले आहेत. शनिवार पेठेतील एक नगरसेविका तर टीका करताना आपण एक महिला आहोत याचे तारतम्य विसरून वैयक्तिक भांडण असल्याप्रमाणे अतिशय हीन पातळीवर उतरून टीका करत आहेत. सामान्य कुटुंबातील महिलेने पुढे जावून राजकारण - समाजकारण भाग घ्यायचाच नाही का ? काही प्रस्थापित नेते, घराणे यांचीच मक्तेदारी नगरपालिकेत राहीली पाहिजे अशी मानसिकता यांची आहे , ती योग्य आहे का? मी करत असलेल्या कामामुळे एका सामान्य कुटुंबातील महीलेला लोकप्रियता मिळत आहे .कराडचे नागरिक मला अनेक रूपात आशीर्वाद देत आहेत. आणि सर्व कराडकर मायबाप माझ्यासारख्या सर्वसामान्य कुटुंबातुन आलेल्या महिलेला साथ देतील , अशा मला आशा आहे.  असेही प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे... 

No comments:

Post a Comment