Tuesday, August 31, 2021

आज आणि उद्या काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता ...

वेध माझा ऑनलाइन
छत्तीसगडवर कमी दाबाचे क्षेत्र तयार झाल्याने तसेच पूर्व-पश्चिमेकडून दोन्ही दिशेने वारे वाहत असल्याने कमी दाबाचे क्षेत्र तयार होत असल्याने पुढील दोन दिवस उत्तर कोकण, उत्तर मध्य महाराष्ट्रात मुसळधार पावसाची शक्यता आहे. कोकणात 31 आॅगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाची शक्यता असल्याचा हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
उद्या आणि परवा मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगडमध्ये काही ठिकाणी अतिमुसळधार ते मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तर ठाणे आणि रायगडला उद्यासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.


मराठवाड्यात आज आणि उद्या सर्वत्र पावसाचा अंदाज, लातूर आणि उस्मानाबादसाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर आज काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे मध्य महाराष्ट्रात 31 आॅगस्ट रोजी काही ठिकाणी अतिमुसळधारेचा इशारा देण्यात आला आहे.

उद्या नाशिकसाठी आॅरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. विदर्भात 30 आॅगस्ट ते 1 सप्टेंबर दरम्यान काही ठिकाणी मुसळधार पावसाचा शक्यता आहे. संपूर्ण विदर्भासाठी आज आॅरेंज अलर्ट देण्यात आला आहे.

अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ आणि बुलढाण्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज तर नागपूर, भंडारा, गडचिरोली, गोंदिया, चंद्रपुरमध्ये मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे

No comments:

Post a Comment