Monday, August 2, 2021

घरपट्टी व पाणीपट्टी रद्द करा या मागणीसाठी कराडचे माजी नगरसेवक एकवटणार...माजी नगरसेवक विचारमंचचे नेते अशोकराव पाटील यांनी केले आवाहन...

कराड- कराड नगरपालिकेने 2020 व 21 या कालावधीमधील घरपट्टी व पाणीपट्टी माफ करावी या मागणीसाठी उद्या मंगळवार दिनांक 3 रोजी सकाळी 11 वाजता पालिका मुख्याधिकारी डाके याना निवेदन देण्यासाठी शहरातील सर्व माजी नगरसेवक सदस्यांनी माजी नगरसेवक विचारमंचच्या माध्यमातून येथील प्रियदर्शनी दूधसंस्था येथे सकाळी 11 वाजता उपस्थित रहावे असे आवाहन या मंचचे उपाध्यक्ष माजी नगरसेवक अशोकराव पाटील यांनी केले आहे  

गेली दोन वर्षे लॉक डाऊनमुळे जनतेचे कम्बरटे  अक्षरशः मोडून पडले असताना सर्वांचेच अर्थिक गणित बिघडून गेले आहे त्यामुळे येथील पालिकेने आकारलेली भरमसाठ घरपट्टी व पाणीपट्टी रद्द व्हावी अशी मागणी जनतेकडून होत आहे येथील माजी नगरसेंवक विचार मंच या प्रश्नाला हातात घेऊन उद्या रस्त्यावर उतरणार आहे याबाबत माजी नगरसेवक अशोकराव पाटील यांनी शहरातील सर्व माजी नगरसेवकाना मुख्याधिकारी डाके याना निवेदन देण्यासाठी एकत्र येण्याचे आवाहन केले आहे

दरम्यान 2020 -2021 या काळातील घरपट्टी व  पाणीपट्टी  सरसकट माफ व्हावी यासाठी ऍडवोकेट श्रिकांत घोडके यांनी आज लाक्षणिक उपोषण केले त्यांना पाठिंबा देण्यासाठी माजी नगरसेवक विचार मंचचे उपाध्यक्ष  अशोकराव पाटील प्रदीप  जाधव हरिभाऊ जोशी आनंदराव लादे तसेच घनश्याम पेंढारकर यांनी पाठिंब्याचे पत्र दिले यावेळी अनेक व्यापारी व विवििध संघटनांचे पदाधिकारी यानीही आपला पाठिंबा  जाहीर केला आहे
 

1 comment:

  1. पाणी पट्टी वाढवून देखील नपाने पाण्याचे मिटर रिडींग प्रमाणे बील आकारणी 24 तास पाणी सुविधा न देताच सुरू केली आहे. हे योग्य नाही.

    ReplyDelete