Wednesday, May 1, 2024

सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता भाजप च्या वाटेवर, त्यांना राज्यपाल व्हायचंय ; वंचीत बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आबेडकर यांचा कराडात गौप्यस्फोट ; साताऱ्यातील काँग्रेसचा तो मोठा नेता कोण ? कराडसह जिल्ह्यात जोरदार चर्चा ;

वेध माझा ऑनलाईन
सातारा जिल्ह्यातील काँग्रेसचा मोठा नेता लवकरच भाजपमध्ये प्रवेश करणार आहे ,त्यांना राज्याचे राज्यपाल व्हायचं आहे असा गौप्यस्फोट वंचीत आघाडीचे सर्वेसर्वा प्रकाश आंबेडकर यांनी आज कराड येथे केला... त्यामुळे सातारा जिल्ह्यातील हा बडा नेता कोण ? याबाबत आता संपूर्ण जिल्ह्यात चर्चा सुरू आहे

संगम हॉटेल येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते वंचीत आघाडीचे सातारा लोकसभेचे अधिकृत उमेदवार माजी निवृत्त सैनिक प्रशांत कदम यांच्या उपस्थितीत या पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते

ते म्हणाले
कोल्हापूर च्या छत्रपतींच्या गादिचे देशासाठी मोठे योगदान आहे त्यामुळे आम्ही त्यांना पाठिंबा दिला आहे सांगलीत विशाल पाटील यांनीही आम्ही उघड पाठिंबा देत आमची त्याठिकाणची भूमिका स्पष्ट केली आहे पुण्यात मनसे मधून बाहेर पडलेल्या कॅन्डीडेट ला आम्ही उमेदवारी देत वंचीत आणि सच्या सामाजिक कार्यकर्त्याना बळ द्यायचं काम वंचीत आघाडी म्हणून केलं आहे 
काँग्रेसला होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत आम्ही आमच्या बरोबर घेत ती निवडणूक लढवणार आहोत काँग्रेस कार्यकर्ते आमचेच काम या निवडणुकीत करत आहेत 
आमचे साताऱ्याचे उमेदवार माजी सैनिक आहेत पंतप्रधान मोदी यांनी पर्वाच्या दिवशी कराडात येऊन जिल्ह्यातील सैनिकांचा विशेष उल्लेख करत एकप्रकारे आमच्या उमेदवारांची दखल घेतली असल्याचे सूतोवाच त्यांनी यावेळी केले

दरम्यान त्यांनी जिल्ह्यातील एक मोठा काँग्रेसचा नेता भाजप च्या वाटेवर असून त्या नेत्याला राज्यपाल व्हायचं असल्याचा गौप्यस्फोट केल्यामुळे यावेळी कराडच्या उपस्थित पत्रकारांच्या भुवया उंचावल्या गेल्या





No comments:

Post a Comment