Monday, May 20, 2024

कराडमधील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी पोलिसांनी घेतली ताब्यात ;

वेध माझा ऑनलाइन ।
कराड परिसरातील सोने चांदीच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने नुकतेच ताब्यात घेतले आहे 

 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गेल्या दोन महिन्यापासून  पाचजण विद्यानगर परिसरात रूम घेऊन राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या पाचजणापैकी तिघेजण पोलिसांच्या हाती लागले. तर दोघेजण पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. तर आणखी एका संशयित आरोपीचा शोध सुरू आहे
ताब्यात घेतलेल्यांकडे चौकशी केली असता कराड परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांकडून तीन पिस्टल, चार जिवंत काडतुसे, दोन कोयते चिकट टेप पाच दोऱ्या व एक चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ताब्यात असलेले संशयित पलूस, इचलकरंजी, पुसेगाव, गोडोली सातारा तालुक्यातील आहेत तर एकजण केरळ राज्यातील आहे
दरम्यान घटनास्थळी कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी भेट दिली आहे.  

No comments:

Post a Comment