लोकसभा निवडणूक २०२४ साठी आत्तापर्यंत ५ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यंदा पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार असा दावा भाजपकडून केला जातोय तर दुसरीकडे देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल असा दावा विरोधी पक्षातील नेतेमंडळी करत आहेत. अनेक राजकीय विश्लेषक भाजपला २८० ते ३०० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करत आहेत. अशातच जर मोदींना २७२ ची मॅजिक फिगर गाठता आली नाही तर महाराष्ट्रातून शरद पवार किंवा उद्धव ठाकरे मोदींना पाठिंबा देतील का? अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र आता खुद्द शरद पवारांनीच हि गोष्ट फेटाळून लावली आहे.
ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कदम यांनी शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी शरद पवारांना थेट प्रश्न केला कि समजा यंदाच्या निवडणुकीत 272 पेक्षा कमी भाजपच्या जागा आल्या आणि तुम्हाला त्यांनी साद घातली तरी तुमचा पक्ष त्यांच्यासोबत जाणार का? यावर उत्तर देताना पवारांनी स्पष्टपणे नाही असं उत्तर दिले. भाजपचे धोरण आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाणार नाही.. आमचे व्यक्तिगत संबंध चांगले राहतील, मी अजून राज्यसभेत आहे, त्याठिकाणी मोदींची भेट झाली तर आम्ही बोलणार नाही असं नाही .. मात्र उद्या संसदेत मी त्यांच्या बाजूने हात वर करणार नाही असं पवारांनी स्पष्ट केलं. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपला पक्ष भाजपला साथ देणार नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं.
No comments:
Post a Comment