रात्रीच्या वेळी सांगली आणि मिरज स्टेशनवर प्रवासाला जायला आलेल्या प्रवाशांना एक वेगळाच अन् काहीसा भीतीदायक अनुभव आला. अचानक पोलिसांचे डॉग आणि बॉम्ब शोध पथक स्टेशनवर आले आणि त्यांनी संपूर्ण स्टेशनवरच झाडाझडती सुरू केली. शेवटी दोन्ही स्टेशनवर पोलिसांना काहीच आढळून आलं नाही आणि पोलिसांसह प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडला. सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पण नंतर ते मॉकड्रीलचा भाग असल्याचं स्पष्ट झालं.
रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगली आणि मिरज स्टेशनची सांगली पोलिसांकडून झडती घेण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह पोलीस पथकाने सांगली रेल्वे स्टेशनची तपासणी केली. डॉग आणि बॉम्ब पथकाकडून रेल्वे स्थानकाची तपासणी करण्यात आली.
अचानक पोलीस फ़ौजफाटा आल्यामुळे आणि त्यांनी सुरू केलेल्या तपासणीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर सदर तपासणी मॉकड्रिल असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी माहिती दिली. या नंतर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना सुटकेचे निश्वास सोडला.
No comments:
Post a Comment