आदित्य ठाकरे मंत्री बनू शकतो तर मग आमचे अमित ठाकरे मंत्री का बनू शकत नाही? असा उपरोधिक सवाल करत भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी मंत्री बनल्या नंतर उद्धव ठाकरे यांचं नाव खराब केलं. ठाकरेंचं नाव रसातळाला घेऊन गेलेत, असे म्हणत नितेश राणे आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. तर आदित्य ठाकरे याच्यापेक्षा अमित ठाकरे हे चांगले काम करतील, असं वक्तव्य करत नितेश राणेंनी विश्वास व्यक्त केला. इतकंच नाहीतर येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात आम्ही अमित ठाकरे यांची वाट पाहतोय, असं म्हणत नितेश राणे यांनी सूचक वक्तव्य केले. दरम्यान, नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.
No comments:
Post a Comment