काँग्रेस नेते अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या असून येत्या काळात आपल्या राजकारणात, धोरणात बदल करावे लागणार असल्याचं म्हटलं आहे. इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये झालेल्या 'राष्ट्रीय संविधान परिषदेत' राहुल गांधी म्हणाले की, "सत्य हे आहे की काँग्रेस पक्षाला आगामी काळात आपलं राजकारण बदलावं लागेल. काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या आहेत, मी काँग्रेसचा असूनही हे सांगत आहे." याआधी राहुल यांनी दावा केला होता की, भाजपा 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. "मी एका गोष्टीची गॅरंटी देतो की, आता होणाऱ्या निवडणुकीत नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार नाहीत. तुमची इच्छा असेल तर मी सही करून देईन. मोदींची रणनीती ही भावाला भावासोबत लढायला भाग पाडण्याची आहे आणि या निवडणुकीत हे काम करत नाही. जर यामध्ये चीटिंग केली तर हरकत नाही, पण त्यांचा पक्ष 180 (जागा) च्या पुढे जात नाही."असेही ते म्हणाले
No comments:
Post a Comment