Thursday, May 9, 2024

अजितदादांच्या आरोपांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर ; म्हणाल्या...त्याचा हिशोब करा ;

वेध माझा ऑनलाइन।
मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती… पण केवळ मी त्यांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी मिळाली नाही, असं विधान अजित पवार यांनी शिरूरमध्ये बोलताना केलं. त्यांच्या या वक्तव्याला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. आता मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. तुम्हीच तुलना करा ना… कोणाला काय मिळालं? याचा हिशोब करा. मला काय मिळालं आणि अजितदादांना काय काय मिळालं. सगळं तुमच्या समोर आहे. सगळं स्पष्ट होईल. खूप सोपं उत्तरं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.


चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर सुप्रिया सुळे बोलल्या
चंद्रकांत पाटलांनी बारामतीत असं बोलायला नको होतं. मुळात हे वक्तव्य दीड महिन्यांपूर्वी केलं होतं. आम्हाला वेदना देणारं हे वक्तव्य आहे. शरद पवारांना संपवायचं आहे, असे शब्द चंद्रकांतदादांचे होते. ते असं का बोलले होते, हे आम्हाला समजलं नव्हतं. मात्र गेली महिनाभर यावर कोणी बोललं नाही. ही प्रवृत्ती वाईट आहे. आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून काम केलं आहे. अशात संपवायची भाषा खूप धक्कादायक आणि दुर्दैवी होतं. लोकशाहीत असं चालत नाही, 
लोकशाहीत संपवायची भाषा नसते. सत्तेतील नेते बारामतीत येऊन पवारांना संपवायची भाषा करतात हे दुर्दैवी आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत

No comments:

Post a Comment