वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीचा अजून पाचवा टप्पाच सुरू आहे. सातव्या टप्प्यापर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अति उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचं अभिनंदन करणं सुरू केलं आहे. भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत निकाला आधीच लागले सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी हे बॅनर लावले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे बारामतीतील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. तरीही कार्यकर्त्यांना आपलाच नेता निवडून येणार असल्याचं वाटत आहे.
एकीकडे 4 जूनला देशाच्या लोकसभा निवडणुकीचे चित्र काय असणार? याची लोकांमध्ये उत्सुकता आहे. तर दुसरीकडे अतिशय लक्षवेधी लढत ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात पुणे सातारा महामार्गावर ‘गुलाल आपलाच’ असा आशय लिहिलेले बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा भला मोठा फोटो असून विजयी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करण्यात आलं आहे
देशातील लोकसभा निवडणुका सुरु आहेत. अनेक ठिकाणी मतदान झाले आहे तर अनेक ठिकाणी मतदान बाकी आहे. येत्या 4 जून रोजी या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे 4 जून रोजी नक्की काय होणार? याची उत्सुकता सर्वांना आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यातील लढत अतिशय लक्षवेधी आणि चुरशीची झाली आहे. त्यात नक्की कोण बाजी मारणार? बारामतीचा गड कोण काबीज करणार? याची उत्सुकता नागरीकांना लागून राहिली आहे. बारामतीत कोण आणि कसे विजयी होणार, याचे अंदाज लावले जात आहेत. पारावर, चौकात, हॉटेलात, शेतात सर्वत्र हीच चर्चा ऐकायला मिळत आहे.
No comments:
Post a Comment