Saturday, May 4, 2024

अजित पवारांची साताऱ्यात डरकाळी ; म्हणाले,... नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही ; का म्हणाले असे अजित पवार ; वाचा बातमी;

वेध माझा ऑनलाईन।

यंदाच्या लोकसभा निवडणुकीच्या जागावाटपात अजित पवारांना महायुतीत अवघ्या ४ जागांवर समाधान मानावे लागल्याने राष्ट्रवादीच्या नाराजांची मनधरणी करावी लागत आहे. यापूर्वी परभणीचे हक्काची जागा महादेव जानकर यांच्यासाठी सोडल्यानंतर राष्ट्रवादीचे इच्छुक असलेल्या राजेश विटेकर यांना आमदारकीचा शब्द देऊन अजितदादांनी कार्यकर्त्यांचे समाधान केले होते. आता, साताऱ्यातूनही अजित पवार यांनी असेच एक आश्वासन दिले आहे. साताऱ्यातून नितीन पाटलांना मी खासदार करेन नाहीतर पवारांची औलाद सांगणार नाही असं अजितदादानी म्हंटल आहे.

खरं तर महायुतीमध्ये साताऱ्याच्या जागेवरून तिढा पडला होता. हि जागा भाजपचे उदयनराजे लढवणार कि अजित पवार गटाकडून नितीन पाटील लढवणार अशा चर्चा मागील महिनाभर सुरु होत्या. मात्र महायुतीत हि जागा भाजपला सुटली आणि उदयनराजे पुन्हा एकदा निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. त्यांच्या प्रचारार्थ आज वाई येथे अजित पवारांची सभा पार पडली. या सभेतच अजित पवारांनी नितीन पाटील यांना खासदारकीचा शब्द दिला आहे. मात्र त्यासाठी त्यांनी एक मोठी अटही घातली आहे. साताऱ्यातील महायुतीच्या उमेदवाराला 1 लाखाच्या फरकाने निवडून द्या, मग नितिन काकाला खासदार करणार, नाही केले तर पवारांची औलाद सांगणार नाही असं आश्वासन अजित पवारांनी वाईच्या जनतेला दिले.


No comments:

Post a Comment