पुणे पदवीधर मतदारसंघाच्या भाजप-महायुतीच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार श्री. कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारार्थ आयोजित मतदार संवाद बैठकीत मतदार नोंदणी आणि मतदारांशी थेट संपर्क साधण्यावर भर देण्यात आला.या बैठकीला भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांनी प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
हॉटेल फर्न याठिकाणी ही बैठक पार पडली जिल्ह्यातील भाजप चे सर्व आमदार मंत्री यावेळी हजर होते मात्र सेना-राष्ट्रवादी चे कोणीही मंत्री, आमदार यावेळी हजर नव्हते
याविषयी पत्रकारांनी विचारले असता
रवींद्र चव्हाण म्हणाले...,
महायुतीत कोणतीही नाराजी नाहीये...
लवकरच महायुतीचा मेळावा होणार आहे त्यावेळी महायुतीचे सर्व नेते उपस्थित राहिलेले तुम्हाला दिसतील
यावेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना रवींद्र चव्हाण यांनी पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीमध्ये मतदार नोंदणीला विशेष महत्त्व असल्याचे सांगितले. नोंदणीकृत मतदारांपर्यंत पोहोचणे, त्यांच्याशी संवाद साधणे आणि त्यांना मतदान प्रक्रियेबाबत माहिती देणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.
तसेच, महायुतीतील सर्व नेते आणि कार्यकर्त्यांनी मतदारांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली असून, पुणे पदवीधर मतदारसंघाच्या उमेदवार डॉ. स्मिता जाधव आणि शिक्षक मतदारसंघाचे उमेदवार कौस्तुभ गावडे यांच्या प्रचारासाठी संघटितपणे काम करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
नवरात्रोत्सव सुरू असल्याने सध्या विविध कार्यक्रम आणि उपक्रमांच्या माध्यमातून जनसंपर्कावर भर दिला जात आहे. निवडणूक जसजशी जवळ येईल, तसतसे महायुतीतील नेते आणि कार्यकर्ते प्रत्यक्ष प्रचारात सहभागी होतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तसेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्यासह महायुतीतील प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत पुढील काळात महायुतीचा संयुक्त मेळावा आयोजित करण्याचे नियोजन असल्याची माहितीही रवींद्र चव्हाण यांनी दिली.
एकंदरीत, पुणे पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणी, मतदारांशी संवाद आणि संघटनात्मक तयारी यावर महायुतीकडून भर दिला जात असल्याचे या बैठकीतून स्पष्ट झाले.
No comments:
Post a Comment