कराडमध्ये २१ व्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी औद्योगिक व पशुपक्षी प्रदर्शनाची तयारी सुरू झाली आहे. २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान होणाऱ्या या प्रदर्शनाच्या उद्घाटनासाठी राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि दिग्गज मंत्र्यांसह जिल्ह्यातील राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या प्रदर्शनाच्या घडामोडींकडे राज्यासह सातारा जिल्ह्याचं लक्ष लागलं आहे. दरम्यान, प्रदर्शनाच्या मंडपाचं भूमिपूजन ॲड. उदयसिंह विलासराव पाटील-उंडाळकर यांच्या हस्ते पार पडलं.
कराडमध्ये २१ व्या स्व. यशवंतराव चव्हाण कृषी प्रदर्शनाच्या मंडपाचे भूमिपूजन पार पडलं. २४ ते २८ नोव्हेंबरदरम्यान आयोजित या प्रदर्शनात आधुनिक कृषी तंत्रज्ञान, शेतीतील नाविन्यपूर्ण प्रयोग आणि पशुपालनाची माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे.
यंदा महाराष्ट्रावर असलेल्या दुष्काळाच्या सावटाच्या पार्श्वभूमीवर पिकांचं आणि पशुधनाचं व्यवस्थापन, पाणीटंचाईवर मात करण्याचे उपाय यावर विशेष भर दिला जाणार आहे. या प्रदर्शनाच्या उद्घाटनाला मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, जिल्ह्यातील मंत्री, आमदार आणि विविध राजकीय नेते उपस्थित राहणार आहेत.
दुष्काळी परिस्थितीत शेतकऱ्यांना दिलासा देणाऱ्या आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती आणि शेतीसाठी उपयुक्त मार्गदर्शन देणारं हे प्रदर्शन शेतकऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचबरोबर राज्यातील दिग्गज नेत्यांच्या उपस्थितीमुळे राजकीयदृष्ट्याही या प्रदर्शनाला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे.
No comments:
Post a Comment