Monday, November 16, 2026

कराडमध्ये ‘सुनंदा’ फिजिओथेरपी अँड न्यूट्रिशन क्लिनिकचा गुरुवारी शुभारंभ! आरोग्यसेवेच्या क्षेत्रात नवा उपक्रम; रामचंद्र राजे यांच्या हस्ते उद्घाटन, मान्यवरांची उपस्थिती-


वेध माझा ऑनलाइन - 
आधुनिक जीवनशैलीमुळे वाढत चाललेल्या शारीरिक व्याधी, सांधेदुखी, स्नायूंचे विकार आणि पोषणविषयक समस्यांवर योग्य उपचार व मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने कराडमध्ये ‘सुनंदा फिजिओथेरपी अँड न्यूट्रिशन क्लिनिक’ सुरू करण्यात येत आहे. गुरुवार, दि. १९ नोव्हेंबर रोजी दुपारी १.३० वाजता या क्लिनिकचा शुभारंभ होणार आहे.

या क्लिनिकचा शुभारंभ मा. श्री. रामचंद्र राजे (शिक्षक निवृत्त, लेखक, दिग्दर्शक व व्यंगचित्रकार) यांच्या शुभहस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून कराडच्या लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील, ज्येष्ठ फिजिओथेरपिस्ट डॉ. सागर डोंबाळे आणि दैनिक पुढारीचे ब्युरो मॅनेजर सतीश मोरे उपस्थित राहणार आहेत.

डॉ. ऐश्वर्या राजे  यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू होणाऱ्या या क्लिनिकच्या माध्यमातून फिजिओथेरपी आणि पोषणविषयक मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. 
डॉ. ऐश्वर्या राजे आणि दैनिक पुढारीच्या उपसंपादिका प्रतिभा राजे या कार्यक्रमाच्या निमंत्रक आहेत 

कराडमधील गोळेकर नेत्र रुग्णालयाजवळ, दत्त चौक येथे हा शुभारंभ सोहळा होणार आहे. आरोग्यविषयक उपचार आणि योग्य पोषण मार्गदर्शनाची सांगड घालणारा हा उपक्रम कराडकरांसाठी उपयुक्त ठरण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

No comments:

Post a Comment