Monday, December 7, 2020

भारत बंदला कराड शहर हाँकर्स संघटनेचा पाठिंबा -जावेद नायकवडी

  कराड
येथील हाँकर्सधारकांमधे शेतकर्यांच्या आवक मालावर व्यवसाय करणारे असे अनेक व्यापारी आहेत.शेतकर्यांवर अन्याय म्हणजे हाँकर्सधारकांवर अन्याय आहे असे आम्ही मानतो, त्यामुळे आम्ही उद्या मंगळवार दि 8 रोजी होणाऱ्या भारत बदला व्यवसाय बंद ठेवुन जाहिर पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे.कराड शहरातील सर्व हाँकर्सधारकांनी हा होणारा भारत बंद पाळावा असे आवाहन हाँकर्स संघटनेचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी आज येथे हॉकर्स पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत केले.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात उद्या भारत बंद ची हाक देण्यात आली आहे.त्या बदला पाठिंबा देण्याकरिता येथील हॉकर्स संघटनेच्या वतीने बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आल्याचे अध्यक्ष जावेद नायकवडी यांनी जाहीर केले.
यावेळी संघटनेचे सचिव हरिष बल्लाळ,सल्लागार आनंदराव लादे,उपाध्यक्ष सतिश तावरे,खजिनदार गजानन कुंभार,संघटक आशपाक मुल्ला,व अन्य पदाधिकारी उपस्थित होते.

Sunday, December 6, 2020

जिल्ह्यात 116 जण सापडले बाधित

 सातारा दि.7 (जिमाका): जिल्ह्यात काल रविवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार 116 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर  3 कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील* सातारा 1,  शनिवार पेठ 1, करंजे पेठ 3, गडकर आळी 1, दौलतनगर 1, तामजाईनगर 1, 
शाहूनगर 1,  शिवथर 1,  शाहुपुरी 1, अंबदरे 1, परळी 1, नागठाणे 4, चिंचणेर वंदन 6, पाडळी 1, साबळेवाडी 1, सांभरवाडी 1, मोहितेमळा 1, माडवी 1, हमदाबाज 3.
*फलटण तालुक्यातील* लक्ष्मीनगर 1, रविवार पेठ 1, ब्राम्हण गल्ली कसबा पेठ 1,  तरडगाव 1, तडवळे काळज 1,  पिंपळवाडी 2, साखरवाडी 1, सुरवडी 1, मुरुम 1, विढणी 1, शेरेचीवाडी 1. 
*खटाव तालुक्यातील* खटाव 7,    पळशी 1,  राजाचे कुर्ले 11, त्रिमली 1, जायगाव 1, गिरीजाशंकरवाडी 1, तडवळे 1, पांढरवाडी 3, पुसेगाव 1. 
*माण  तालुक्यातील*  देवापूर 1, म्हसवड 5, गोंदवले बु 1, वलाई 1. 
*कोरेगाव तालुक्यातील* कोरेगाव 3,  सातारा रोड 1, किन्हई 2. 
*जावली तालुक्यातील* सोनगाव 1, जावळवाडी 6, सावली 1, टेटली 1. 
*वाई तालुक्यातील* गणपती आळी 1, सिध्दनाथवाडी 1.
*खंडाळा तालुक्यातील*  खंडाळा 2, लोणंद 3, म्हावशी 5, अहिरे 1. 
*महाबळेश्वर तालुक्यातील* महाबळेश्वर 4. 
 *इतर* 1, पाडळी 2. 
*इतर जिल्ह्यातील* पिंपरे (ता. पुरंदर), इस्मालपूर सांगली).
* 3 बाधितांचा मृत्यु*
जिल्ह्ह्यातील विविध खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्यांमध्ये गोळेश्वर ता. कराड येथील 58 वर्षीय पुरुष, सोनवडी ता. फलटण येथील 78 वर्षीय पुरुष, शिवथर ता. सातारा येथील 80 वर्षीय पुरुष अशा एकूण 3  जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 
*एकूण नमुने -257138*
*एकूण बाधित -52063*  
*घरी सोडण्यात आलेले -49579*  
*मृत्यू -1744* 
*उपचारार्थ रुग्ण-740* 
0000

परदेशी तरुणीचा दारू पिऊन धिंगाणा ; पोलिसांनी केली अटक

कराड : अंमली पदार्थाच्या सेवनानंतर परदेशी तरुणीने कराड-चिपळूण रोडवर धुडगूस घातल्याचं समोर आलं आहे. आधी बाईक, त्यानंतर रस्त्यावर उभी असलेली जीप पळवून तिने कराडपर्यंत अनेकांना धडका दिल्या. कराडजवळ जीप पलटी झाल्यानंतर हा थरार संपला. परदेशी तरुणीला ताब्यात घेऊन पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.

साताऱ्यात परदेशी युवतीने जीप चोरुन भररस्त्यात अनेकांना उडवल्याचा धक्कादायक प्रकार काल (रविवारी) रात्री घडला. मूळ नेदरलँडच्या असलेल्या पावलीन कोरनेलिया जिसजे या तरुणीने अंमली पदार्थाची नशा केल्याची प्राथमिक माहिती आहे. कराडच्या कृषी महाविद्यालयाजवळ जीप उलटल्यानंतर ती पोलिसांच्या हाती लागली. या घटनेने कराड आणि पाटण परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

चिपळूनच्या दिशेने बाईकवरुन आलेल्या परदेशी तरुणीने पाटण नवा रस्ता भागात धुडगूस घातला. यावेळी नागरिकांनी पोलिसांना फोन करुन घटनेची माहिती दिली. या तरुणीने जवळच्या दुकानासमोर उभी असणारी महिंद्रा जीप पळवून कराडच्या दिशेने पोबारा केला.

जीपचा वेग ताशी शंभरच्या पलिकडे होता. वाटेत तिने अनेकांना जोरात कट मारले तसेच दहा ते बारा जण थोडक्यात बचावले, अशी माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. अखेर कराडमधील कृषी महाविद्यालयात एका वॅगन आर गाडीला धडक देऊन तिची जीप उलटली.

कराड पोलिसांनी तिला ताब्यात घेऊन अधिक तपास सुरु केला आहे. अटकेची प्रक्रिया करुन तिला आज न्यायालयात हजार केले जाणार आहे. पोलिस ठाण्यात फक्त अपघाताची नोंद करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील 56 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 6 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 56 नागरिकांना घरी सोडण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
  
घेतलेले एकूण नमुने – 256182
एकूण बाधित -- 51947
घरी सोडण्यात आलेले -49579
मृत्यू -- 1741
उपचारार्थ रुग्ण -- 627
00000

आज जिल्ह्यातील 173 जण बाधीत

सातारा दि.6 (जिमाका): जिल्ह्यात काल शनिवारी रात्री जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टनुसार  173 नागरिकांचे अहवाल कोरोना बाधित आले आहेत, तर 9  कोरोना बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक, डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली आहे.
कोराना बाधित अहवालामध्ये 
*सातारा तालुक्यातील*  सातारा 2, भूविकास बँक 1, तामजाई नगर 1, शाहूनगर 1,  कामाठी पुरा 1, कार्तिक स्वामी मंदीराशेजारी 1, सदरबझार 1, धस कॉलनी 3, केसरकर पेठेतील 1, रामाचा गोट 1, व्यंकटपूरा 1, गेापाळकुंज सोसायटी संगमनगर 1, क्रांती सोसायटी 1, वडजल निंभोरे 1, उसवने 1,फत्यापुर 1, पाडळी 1,  हमदाबाज कोंडवे 2, शिवथर 11, शिंदी खुर्द 1, नेले 1,  कोंडवे 2, कारंदवाडी 1, नागठाणे 7, अतित 1, सोनगाव 1, कोडोली 1,कारंडेवाडी 1, पानमळेवाडी  1, पाटखळ 1, तरवडी 1, गोवे 1, अंगापूर 1, जिहे 4, गोजेगाव 1, खेड 1, क्षेत्रमाहुली 1, 

*कराड तालुक्यातील*  कराड शहरातील कराड 1,  आगाशिवनगर 1, सुपने 1, सैदापूर 1, कोलेवाडी 3, कुसुर 1,

*पाटण तालुक्यातील*  ब्राम्हणपूरी 1,

*फलटण तालुक्यातील* फलटण शहरातील बुधवार पेठ 5, लक्ष्मीनगर 1, हनुमाननगर 1, कसबापेठ 2, पिंपळवाडी-साखरवाडी 2, पिंप्रद 1, माठाचीवाडी 1, निंभोरे 2, हिंगणगाव 1, जाधववाडी 4, धुळदेव 1, कोळकी 2, विडणी 5, भडकमकरनगर 1, रावडी 1, मुरुम 1, पाडेगाव 1, सरकळ 1, कोळकी 1, बरड 1, तरडगाव 1, मिरेवाडी 1, 

*खटाव तालुक्यातील*   वडूज 3, साठेवाडी 1, रेवळी 1, पुसेगाव 1, जाखणगाव 3, खटाव 3, पळशी 1, मोरोळे 1, दातेवाडी 1, 

*माण  तालुक्यातील*  गोंदवले बुद्रुक 2,मासाळवाडी 1, पांढरवाडी 1, ढाकणी 1, बनगरवाडी 5, म्हसवड 4, पर्यंती 1, 

*कोरेगाव तालुक्यातील*   जळगाव 1, पिंपरे खुर्द 1,  आर्वी 1, सुर्ली 1,कुमठे 1, शिरंबे 1,  रहिमतपूर 2, एकसळ 1, 

*जावली तालुक्यातील*  रुईघर 4, अमृतवाडी 1, 

*वाई तालुक्यातील* गंगापूरी 1, सिध्दनाथवाडी 1, जांब 2, सह्याद्रीनगर  1, हवलेवाडी 6, 

*खंडाळा तालुक्यातील*  लोणंद 3, कन्हेरी 2, मिरजेवाडी 1, 

*महाबळेश्वर तालुक्यातील* भिलार 2, खिंगर 1, 
 
*9 बाधितांचा मृत्यु*
 क्रांतीसिंह नाना पाटील रुग्णालयात  बनगरवाडी ता. माण येथील 88 वर्षीय पुरुष, अंबवडे ता.खटाव
येथीलल 75 वर्षीय पुरुष, जावळी ता. फलटण येथील 45 वर्षीय पुरुष तसेच
जिल्हयातील विविध खाजगी हॉस्पिटल मध्ये लोणंद ता. खंडाळा येथील 70 वर्षीय महिला व 69
वर्षीय पुरुष, मारीपेठ ता. महाबळेश्वर येथील 70 वर्षीय पुरुष, किन्हई ता. कोरेगांव येथील 60 वर्षीय
महिला, जळगांव ता. कोरेगाव येथील 70 वर्षीय महिला, गावडेवाडी ता. पाटण येथील 44 वर्षीय पुरुष अशा  एकूण 9 जणांचा उपचारादरम्यान मृत्यु झाला आहे, असेही डॉ. चव्हाण यांनी कळविले आहे. 

*एकूण नमुने -256182*
*एकूण बाधित -51947*  
*घरी सोडण्यात आलेले -49523*  
*मृत्यू -1741* 
*उपचारार्थ रुग्ण-683* 
0000

Saturday, December 5, 2020

जयवंतदादांची पृथ्वीराजबाबा गटाशी जवळीक वाढली ? शहराचे राजकीय समीकरण बदलणार.. शहरात चर्चा...


अजिंक्य गोवेकर
 कराड
पालिकेचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची  बाबांशी वाढलेली जवळीक सध्या गावात चर्चेची बनली आहे... निमित्त होत दादांनी बाबांना भेटून येथील विमानतळाबाबतच्या शासनाने काढलेल्या आदेशाबाबत ज्या साशंकता आहेत त्यांविषयी चर्चा करण्याचे.. आणि येथील क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांसमवेत दादा बाबांना भेटलेही.. चर्चाही केली... मात्र त्यानंतर चर्चा रंगली ती दादांच्या बाबांशी वाढणाऱ्या जवळीकतेची...ही जवळीक भविष्यात शहराच्या राजकारणाला कोणत्या वळणावर नेणार ? दादा बाबा गटाची जवळीक होण्यामागचे कारण तरी काय ?  याचीही चर्चा यानिमित्ताने सध्या सुरू आहे

काही महिन्यांपूर्वी...
मुख्याधिकारी डाके यांनी स्वच्छ सर्वेक्षण विषयाला अनुसरून सर्व लोकप्रतिनिधींशी "एक' पत्र व्यवहार करत त्या विषयाला पुन्हा खडबडून जागे केल्यानंतर  पालिकेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या दोन पत्रकार परिषदा शहराला ऐकायला मिळाल्या.आणि त्यातील नगराध्यक्षांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी यापूर्वीचे वादग्रस्त सी ओ डांगे यांच्या भूमिकेसह जनशक्तीच्या भूमिकेवर टीका करत त्यावेळी आघाडीला घरचा आहेर दिला होता त्यानिमित्ताने जनशक्ती आघाडीत बिघाडी झाल्याचे लोकांसमोर आले होते.आणि त्यातच सध्या उपाध्यक्ष जयवंत पाटील यांची आ पृथ्वीराजबाबा गटाशी वाढत असलेली राजकीय जवळीक चर्चेत आहे. जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या पालिकेतील पराभवाचा ठपका प्रिथ्वीराजबाबा गटावर आहे, त्याच गटाशी जयवंत पाटील यांच्या राजकीय मैत्रीची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.या मैत्रीसाठी पृथ्वीराजबाबा गटाकडूनदेखील भरपूर खतपाणी बऱ्याच महिन्यापासून मिळत असल्याचेही चर्चा आहे. 

सत्तारूढ गटनेते राजेंद्रसिह यादव यांची यशवंत विकास आघाडी व उपाध्यक्ष जयवन्त पाटील यांची लोकसेवा आघाडी असे मिळून जनशक्तीच्या बॅनर खाली हे दोन पालिकेचे नेते एकत्रितपणे पालिकेचा कारभार करताना काहीकाळ दिसले..दरम्यानच्या काळात यशवंत विकास आघाडीकडे पालिकेचे उपनगराध्यक्ष पद जाणार अशी शहरात जोरदार चर्चा होऊ लागली होती.मात्र तसे झाले नाही.... खऱ्या अर्थाने उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व यादव गटामधील धुसफूस त्यानंतर अधिक वाढू लागल्याचे शहराला जाणवू लागले.दरम्यान येथील  विधानसभा निवडणुक पार पडली असता त्यात शहराने पृथ्वीराजबाबाना उचलून धरल्याचे मतदानातून दिसून आले. बहुतांश नगरसेवक  अतुलबाबांच्या पाठीशी होते तरी त्यांना शहरात पिछाडीवर का राहावे लागले? याचेच सर्वाना विशेष वाटले...मात्र, येथील पालिकेच्या राजकारणाला या निवडणुकीनंतरच खऱ्या अर्थाने वेगळे वळण मिळाले 

...म्हणजेच, यादव याना मानणारे नगरसेवक अचानकपणे फक्त त्यांच्याच भोवती दिसू लागले. तर, जयवंत पाटील  त्यांचे नेतृत्व मानणारे नगरसेवक स्वतंत्रपणे आपला वावर करताना दिसु लागले.कुठेतरी पार्टी अंतर्गत राजकारण घडतंय का? असा प्रश्न या यानिमित्ताने लोकांसमोर होता. त्यातच मुख्याधिकारी डांगे आपलं ऐकत नाहीत असे जेव्हा खुद्द उपनगराध्यक्ष पत्रकारांना म्हणाले तेव्हा तत्कालीन सी ओ डांगे सत्तारूढ गटाच्या एकाच नेतृत्वाचे ऐकत असल्याचे समोर आले. म्हणजेच पार्टीत दुफळी निर्माण झाल्याचे उघड झाले. सी ओ डांगे आमच्या पार्टीत भांडणे लावत आहेत,तेच आमची पार्टी चालवत आहेत...असा आरोप करत जयवंत पाटील पार्टी अंतर्गत विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना यानिमित्ताने दिसत होते...मात्र  पार्टी अंतर्गत धुस्फुस थेट चव्हाट्यावर तोपर्यंत आली नव्हती, किंवा एकमेकांना उघड विरोधदेखील आजपर्यंत दिसला नव्हता...मात्र,ज्यावेळी शहराच्या स्वच्छ सर्वेक्षण विषयावरून जनशक्तीने नगराध्यक्षांच्या भूमिकेविरोधात पत्रकार परिषद घेऊन टीका केली त्यावेळी जनशक्तीच्या बाजूने जयवंत पाटील त्या पत्रकार परिषदेला उपस्थित दिसले नाहीत, मात्र दुसऱ्या दिवशी नगराध्यक्षाच्या बाजूने ते पत्रकार परिषदेतून बोलताना दिसले....त्यातून पार्टीशी असलेली फारकत त्यांनी दाखवून दिली होती, आणि याचनिमित्ताने जनशक्तिमधील धुसफूसही चव्हाट्यावर आली होती.

अस...नेमक काय घडलंय... की ज्यामुळे जनशक्तिअंतर्गत हे राजकीय वादळ अचानक घोंगावल?  हे  यथावकाश कळेलच... मात्र, या धुस्फुसीचाच परिणाम म्हणूनच की काय...?  शहराचे बदलणारे राजकारण आता नव्याने समोर आले आहे, आणि याच धुस्फुशीचा परिणाम म्हणून आ  पृथ्वीराज चव्हाण गटाशी  उपाध्यक्ष जयवंत पाटील यांची राजकीय जवळीक सध्या दिसू लागली आहे.यासाठी बऱ्याच महिन्यापासून काँग्रेस नेते शिवराज मोरे यांचे  प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि त्यात नुकतीच दादांनी येथील क्रेडाई पदाधिकाऱ्यांबरोबर बाबांची भेट घेतली त्यामुळे या चर्चेला निवडणुकीच्या तोंडावर अधिकच महत्व आले आहे  दरम्यान, एका झालेल्या सर्व साधारण सभेमधून जयवंत दादा गप्पच दिसले होते...फक्त एका मुद्यावर त्यावेळी ते हसताना दिसले...त्या हसण्यात जनशक्ती अंतर्गत राजकारणाचे उत्तर दडलंय का? हे होणाऱ्या निवडणुकीत कळेल अशी त्यावेळी चर्चा होती... आणि आता बाबा गटाशी जवळीक करत दादांनी याच जनशक्तीतील अंतर्गत राजकारणाला एक प्रकारे उत्तरच दिले आहे का... अशीही चर्चा सुरू  आहे... यादव गटाच्या विरोधकांना जवळ करत उपाध्यक्ष कोणती खेळी खेळत आहेत ? त्यासाठी बाबा गटाकडून या खेळीला खतपाणी मिळत आहे... त्यातून कोणते नवे समीकरण उदयास येणार ? आणि याच खेळीतून एकाच दगडात आणखी किती पक्षी मारण्याचा प्रयत्न होणार ? हेही पाहणे आता इंटरेस्टिंग ठरणार आहे 

आज जिल्ह्यातील 189 जणांना दिला डिस्चार्ज

सातारा दि. 5 (जिमाका):  जिल्ह्यात विविध रुग्णालयात आणि कोरोना केअर सेंटर, डिसीएचसी व सीसीसीमध्ये उपचार घेत असलेल्या आज संध्याकाळपर्यंत 189 नागरिकांना घरी सोडण्यात आले असून 468 जणांचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
468 जणांचे नमुने पाठविले तपासणीला
स्व. क्रांतीसिंह नाना पाटील सर्वसाधारण रुग्णालय सातारा येथील 31, कराड येथील 13, फलटण येथील 9, कोरेगाव येथील 19, वाई येथील 14, खंडाळा येथील 25, रायगाव येथील 168, पानमळेवाडी येथील 79, महाबळेश्वर येथील 13, दहिवडी 12, खावली 17,  म्हसवड 15, व कृष्णा मेडीकल कॉलेज कराड येथील 53 असे एकूण 468 जणांचे नमुने तपासणीला पाठविण्यात आले आहे, अशी माहितीही जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
घेतलेले एकूण नमुने – 254476
एकूण बाधित -- 51774
घरी सोडण्यात आलेले -49523
मृत्यू -- 1732
उपचारार्थ रुग्ण -- 519
00000