Saturday, December 5, 2020

जयवंतदादांची पृथ्वीराजबाबा गटाशी जवळीक वाढली ? शहराचे राजकीय समीकरण बदलणार.. शहरात चर्चा...


अजिंक्य गोवेकर
 कराड
पालिकेचे उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांची  बाबांशी वाढलेली जवळीक सध्या गावात चर्चेची बनली आहे... निमित्त होत दादांनी बाबांना भेटून येथील विमानतळाबाबतच्या शासनाने काढलेल्या आदेशाबाबत ज्या साशंकता आहेत त्यांविषयी चर्चा करण्याचे.. आणि येथील क्रेडाईच्या पदाधिकाऱ्यांसमवेत दादा बाबांना भेटलेही.. चर्चाही केली... मात्र त्यानंतर चर्चा रंगली ती दादांच्या बाबांशी वाढणाऱ्या जवळीकतेची...ही जवळीक भविष्यात शहराच्या राजकारणाला कोणत्या वळणावर नेणार ? दादा बाबा गटाची जवळीक होण्यामागचे कारण तरी काय ?  याचीही चर्चा यानिमित्ताने सध्या सुरू आहे

काही महिन्यांपूर्वी...
मुख्याधिकारी डाके यांनी स्वच्छ सर्वेक्षण विषयाला अनुसरून सर्व लोकप्रतिनिधींशी "एक' पत्र व्यवहार करत त्या विषयाला पुन्हा खडबडून जागे केल्यानंतर  पालिकेत एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करणाऱ्या दोन पत्रकार परिषदा शहराला ऐकायला मिळाल्या.आणि त्यातील नगराध्यक्षांच्या झालेल्या पत्रकार परिषदेत उपस्थित राहून उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांनी यापूर्वीचे वादग्रस्त सी ओ डांगे यांच्या भूमिकेसह जनशक्तीच्या भूमिकेवर टीका करत त्यावेळी आघाडीला घरचा आहेर दिला होता त्यानिमित्ताने जनशक्ती आघाडीत बिघाडी झाल्याचे लोकांसमोर आले होते.आणि त्यातच सध्या उपाध्यक्ष जयवंत पाटील यांची आ पृथ्वीराजबाबा गटाशी वाढत असलेली राजकीय जवळीक चर्चेत आहे. जनशक्तीचे गटनेते राजेंद्र यादव यांच्या पालिकेतील पराभवाचा ठपका प्रिथ्वीराजबाबा गटावर आहे, त्याच गटाशी जयवंत पाटील यांच्या राजकीय मैत्रीची चर्चा सध्या शहरात सुरू आहे.या मैत्रीसाठी पृथ्वीराजबाबा गटाकडूनदेखील भरपूर खतपाणी बऱ्याच महिन्यापासून मिळत असल्याचेही चर्चा आहे. 

सत्तारूढ गटनेते राजेंद्रसिह यादव यांची यशवंत विकास आघाडी व उपाध्यक्ष जयवन्त पाटील यांची लोकसेवा आघाडी असे मिळून जनशक्तीच्या बॅनर खाली हे दोन पालिकेचे नेते एकत्रितपणे पालिकेचा कारभार करताना काहीकाळ दिसले..दरम्यानच्या काळात यशवंत विकास आघाडीकडे पालिकेचे उपनगराध्यक्ष पद जाणार अशी शहरात जोरदार चर्चा होऊ लागली होती.मात्र तसे झाले नाही.... खऱ्या अर्थाने उपनगराध्यक्ष जयवंत पाटील व यादव गटामधील धुसफूस त्यानंतर अधिक वाढू लागल्याचे शहराला जाणवू लागले.दरम्यान येथील  विधानसभा निवडणुक पार पडली असता त्यात शहराने पृथ्वीराजबाबाना उचलून धरल्याचे मतदानातून दिसून आले. बहुतांश नगरसेवक  अतुलबाबांच्या पाठीशी होते तरी त्यांना शहरात पिछाडीवर का राहावे लागले? याचेच सर्वाना विशेष वाटले...मात्र, येथील पालिकेच्या राजकारणाला या निवडणुकीनंतरच खऱ्या अर्थाने वेगळे वळण मिळाले 

...म्हणजेच, यादव याना मानणारे नगरसेवक अचानकपणे फक्त त्यांच्याच भोवती दिसू लागले. तर, जयवंत पाटील  त्यांचे नेतृत्व मानणारे नगरसेवक स्वतंत्रपणे आपला वावर करताना दिसु लागले.कुठेतरी पार्टी अंतर्गत राजकारण घडतंय का? असा प्रश्न या यानिमित्ताने लोकांसमोर होता. त्यातच मुख्याधिकारी डांगे आपलं ऐकत नाहीत असे जेव्हा खुद्द उपनगराध्यक्ष पत्रकारांना म्हणाले तेव्हा तत्कालीन सी ओ डांगे सत्तारूढ गटाच्या एकाच नेतृत्वाचे ऐकत असल्याचे समोर आले. म्हणजेच पार्टीत दुफळी निर्माण झाल्याचे उघड झाले. सी ओ डांगे आमच्या पार्टीत भांडणे लावत आहेत,तेच आमची पार्टी चालवत आहेत...असा आरोप करत जयवंत पाटील पार्टी अंतर्गत विरोधकांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधताना यानिमित्ताने दिसत होते...मात्र  पार्टी अंतर्गत धुस्फुस थेट चव्हाट्यावर तोपर्यंत आली नव्हती, किंवा एकमेकांना उघड विरोधदेखील आजपर्यंत दिसला नव्हता...मात्र,ज्यावेळी शहराच्या स्वच्छ सर्वेक्षण विषयावरून जनशक्तीने नगराध्यक्षांच्या भूमिकेविरोधात पत्रकार परिषद घेऊन टीका केली त्यावेळी जनशक्तीच्या बाजूने जयवंत पाटील त्या पत्रकार परिषदेला उपस्थित दिसले नाहीत, मात्र दुसऱ्या दिवशी नगराध्यक्षाच्या बाजूने ते पत्रकार परिषदेतून बोलताना दिसले....त्यातून पार्टीशी असलेली फारकत त्यांनी दाखवून दिली होती, आणि याचनिमित्ताने जनशक्तिमधील धुसफूसही चव्हाट्यावर आली होती.

अस...नेमक काय घडलंय... की ज्यामुळे जनशक्तिअंतर्गत हे राजकीय वादळ अचानक घोंगावल?  हे  यथावकाश कळेलच... मात्र, या धुस्फुसीचाच परिणाम म्हणूनच की काय...?  शहराचे बदलणारे राजकारण आता नव्याने समोर आले आहे, आणि याच धुस्फुशीचा परिणाम म्हणून आ  पृथ्वीराज चव्हाण गटाशी  उपाध्यक्ष जयवंत पाटील यांची राजकीय जवळीक सध्या दिसू लागली आहे.यासाठी बऱ्याच महिन्यापासून काँग्रेस नेते शिवराज मोरे यांचे  प्रयत्न सुरू असल्याची राजकीय वर्तुळात चर्चा आहे आणि त्यात नुकतीच दादांनी येथील क्रेडाई पदाधिकाऱ्यांबरोबर बाबांची भेट घेतली त्यामुळे या चर्चेला निवडणुकीच्या तोंडावर अधिकच महत्व आले आहे  दरम्यान, एका झालेल्या सर्व साधारण सभेमधून जयवंत दादा गप्पच दिसले होते...फक्त एका मुद्यावर त्यावेळी ते हसताना दिसले...त्या हसण्यात जनशक्ती अंतर्गत राजकारणाचे उत्तर दडलंय का? हे होणाऱ्या निवडणुकीत कळेल अशी त्यावेळी चर्चा होती... आणि आता बाबा गटाशी जवळीक करत दादांनी याच जनशक्तीतील अंतर्गत राजकारणाला एक प्रकारे उत्तरच दिले आहे का... अशीही चर्चा सुरू  आहे... यादव गटाच्या विरोधकांना जवळ करत उपाध्यक्ष कोणती खेळी खेळत आहेत ? त्यासाठी बाबा गटाकडून या खेळीला खतपाणी मिळत आहे... त्यातून कोणते नवे समीकरण उदयास येणार ? आणि याच खेळीतून एकाच दगडात आणखी किती पक्षी मारण्याचा प्रयत्न होणार ? हेही पाहणे आता इंटरेस्टिंग ठरणार आहे 

1 comment: