Saturday, June 4, 2022

पंजाबराव पाटील हे बळीराजा शेतकरी संघटनेचे स्वयंघोषित बोगस अध्यक्ष ; त्यांच्या पदाला कोणताही कायदेशीर आधार नाही ; त्यांच्याविरोधात राज्यभर तक्रारी करणार...बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला यांचे स्पष्टीकरण...

वेध माझा ऑनलाइन - पंजाबराव पाटील हे बळीराजा शेतकरी संघटनेचे स्वयंघोषित बोगस अध्यक्ष आहेत त्यांच्या पदाला कोणताही कायदेशीर आधार नाही त्यांच्या कडे बळीराजा संघटनेची कसलीही अधिकृत कागदपत्रे नसताना त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांची संघटनेच्या नावाखाली फसवणूक केली आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेचे अधिकृत रजिष्ट्रेशन केले आहे त्यामुळे  प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्वत्र फिरत असलेले बी जी पाटील आणि  स्वयंघोषित अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्याविरोधात आम्ही महाराष्ट्रभर तकारारी करणार आहोत असे बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे

बळीराजाचे पंजाबराव पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्या सहित काही जणांची संघटनेतून हकालपट्टी करत असल्याचे आज जाहीर केले होते त्याबाबत मुल्ला यांनी सविस्तर खुलासा करताना पंजाबराव पाटील यांच्यासह संघटनेविषयी अनेक खुलासे करत पत्रकाद्वारे पोलखोल केली आहे

मुल्ला यांनी पत्रकात पुढे म्हणाले आहे की...
बळीराजा शेतकरी संघटना रजिस्टर आहे असे खोटे सांगून अनेकांना यामध्ये सामील करुन घेतले गेले मात्र  आमच्या लक्षात ही बाब आल्यानंतर आम्ही ही संघटना रितसर रजिस्टर करून घेतली जेणे करून यामध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांना भविष्यात अडचण येऊ नये...ते अजूनही जर म्हणत असतील की आमची संघटना रजिस्टर आहे तर त्यांनी ती कागदपत्रे दाखवावीत असे आव्हान देखील मुल्ला यांनी केले आहे
भविश्यात शेतकऱ्यांनी या बोगस लोकांपासून सावध रहावे असे आवाहन देखील बळीराजाचे प्रदेशाध्यक्ष मुल्ला यांनी केले आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि प्रमाण पत्र घेऊन सोमवारी याबाबत कराडला पत्रकार परिषद घेणार आहोत त्यानंतर बोगस कोण कायदेशीर कोण याचा खुलासा होईल असेही मुल्ला यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे

कोरोनाची चौथी लाट येणार ? कोरोना वाढू नये यासाठी खबरदारी घ्या...केंद्र सरकारने पाच राज्यांना पत्राद्वारे केल्या सूचना ;

वेध माझा ऑनलाइन - राज्यात विशेषत: राजधानी मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. गुढीपाडव्याच्या आधी राज्य सरकारने कोरोनासंबंधित सर्व निर्बंध हटवले होते. मास्क लावणंही ऐच्छिक केलं होतं. पण सततच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यात पुन्हा एकदा मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय. सध्यातरी मास्क सक्ती करण्यात आलेली नाहीय. पण पुढचे 10 -15 दिवस रुग्णवाढ होत असलेल्या ठिकाणी आणि बंदिस्त ठिकाणी मास्क वापरा, असं सांगण्यात आलंय. ज्यामध्ये बसेस, लोकल ट्रेन, ऑफिस, शाळा, सिनेमागृह, सभागृह, मॉल्स अशा ठिकाणांचा समावेश आहे.

गेल्या तीन महिन्यांपासून देशातील कोरोना रुग्णसंख्येची वाढ कमी झाली होती. मात्र आता गेल्या काही आठवड्यांपासून कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. 84 दिवसांनंतर शुक्रवारी पहिल्यांदाच देशातील नवीन कोविड रुग्णांची संख्या 4 हजारांच्या पुढे गेली. तर, 4 फेब्रुवारीनंतर मुंबईत कोरोनाच्या प्रकरणांमध्ये सर्वांत मोठी वाढ दिसून आली. शनिवारी देशात 3962 नवीन रुग्ण आणि 26 मृत्यूची नोंद झाली आहे. आठवड्याचा पॉझिटिव्हिटी रेटदेखील वाढत आहे. त्यामुळे देश कोरोनाच्या चौथ्या लाटेकडे वाटचाल करत आहे का? असा प्रश्न पुन्हा एकदा उपस्थित झाला आहे.

केंद्र सरकारचं पाच राज्यांना पत्र...
कोरोना प्रकरणांमध्ये झालेली वाढ पाहता, केंद्र सरकारने 5 राज्यांना पत्र लिहून रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी खबरदारी घेण्यास आणि कडक उपाययोजना राबविण्यास सांगितलं आहे. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी महाराष्ट्र, तमिळनाडू, केरळ, तेलंगणा आणि कर्नाटक या राज्यांना या संदर्भात पत्र लिहिलंय. या पत्रात म्हटलं आहे की, राज्यांमधील वाढत्या रुग्णसंख्येमुळे स्थानिक संसर्ग वाढण्याची शक्यता वाढते. गेल्या तीन महिन्यांपासून कोरोना प्रकरणांमध्ये लक्षणीय घट झाली आहे. पण 27 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 15,708 नवीन प्रकरणं नोंदवली गेली असून, 3 जून रोजी आठवड्यातील रुग्णसंख्या 21,055 झाली. मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात पॉझिटिव्हिटी रेट 0.52 टक्के होता तो जूनच्या पहिल्या आठवड्यात 0.73 टक्के झाला आहे.

महाराष्ट्रात, 27 मे रोजी संपलेल्या आठवड्यात 2,471 नवीन रुग्ण आढळले, तर 3 जूनच्या आठवड्यात त्यांची संख्या 4,883 झाली. पॉझिटिव्हिटी रेट देखील 1.5 वरून 3.1 टक्क्यांपर्यंत वाढला आहे. महाराष्ट्रातील 6 जिल्ह्यांमध्ये, मुंबई उपनगरांसह (मुंबई, ठाणे, पुणे, रायगड आणि पालघर) कोरोनाचा प्रसार सर्वाधिक होत आहे. वाढत्या केसेस पाहता मुंबई महानगरपालिकेने कोविड टेस्टिंग वाढवण्याच्या आणि वॉर्ड तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. दरम्यान, आयआयटी कानपूरच्या तज्ज्ञांसोबत बीएमसी प्रमुखांची बैठक झाली होती, त्या बैठकीत जुलैमध्ये कोरोनाची चौथी लाट येण्याची भीती वर्तवण्यात आली होती.



मास्क सक्तीबाबत नामदार राजेश टोपे काय म्हणाले...? टोपेंनी केले महत्वाचे विधान...

वेध माझा ऑनलाइन - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढत होत असल्याचं दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मास्क सक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.

"आपल्याकडे मुबई, पुणे, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांमध्ये थोड्याप्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाकडून पत्रक आलं आहे. या जिल्ह्यातील लोकांसाठी उपाययोजना कराव्या लागतील आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये म्हणून उपाययोजना कराव्या लागतील. त्याबाबती टास्क फोर्सची एक बैठक झाली. यात बंदीस्त ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करावं, असं ठरवण्यात आलं. तो आवाहनाचा मुद्दा आहे, त्यात मास्कसक्ती नाही," असं स्पष्टीकरण टोपे यांनी दिलं. इंग्रजीत मस्ट हा शब्द वापरल्यानं तो सक्तीचा असा होत नाही, मॅंडेटरी असा होत  नसल्याचंही ते म्हणाले.

"जरी रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे याबाबचे रुग्ण फ्लू आजारासारखे पॉझिटिव्ह होतायत आणि बरे होतायत. पॅनिक होण्याची परिस्थिती नाही. जे पॉझिटिव्ह होतायत ते त्यांच्या इम्युनिटीनेच बरे होतायत असं मला दिसून येतंय," असंही त्यांनी स्पष्ट केलंय. पंधरा वीस दिवस आपल्याला परिस्थिती पाहता येईल, त्यानंतर परिस्थिती आणि संख्या पाहून मास्कसक्ती करायची का हे ठरवलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.

 दरम्यान, राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अशी माहिती मिळत आहे... महाराष्ट्रात बंदिस्त ठिकाणी मास्क सक्ती करण्याचं आरोग्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. मात्र यावरुन प्रशासन आणि मंत्री यांच्यात मात्र समन्वय नसल्याचं समोर आलं आहे... राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र माध्यमांशी बोलताना कोरोना मास्क वापरण्याबद्दल 'मस्ट' शब्द वापरला असला तरी त्याचा अर्थ 'बंधनकारक' असा नाही, असं म्हणत आरोग्य सचिवांच्या आदेशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे... आरोग्य सचिवांचं पत्र आणि आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळं नागरिकांचा मात्र गोंधळ उडण्याची शक्यता आहे.

माझी वसुंधरा अभियानात सातारा जिल्ह्याची सर्वोत्तम कामगिरी - कराड नगरपरिषदेचा उद्या होणार सन्मान...

वेध माझा ऑनलाइन - राज्य शासनाने सुरू केलेल्या माझी वसुंधरा अभियान 2.0 मध्ये सातारा जिल्ह्याने उत्कृष्ट कामगिरी केली आहे. त्यामुळे सातारा जिल्हाधिकारी, सातारा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा नगरपरिषद, कराड नगरपरिषद दहिवडी नगरपंचायत व मान्याचीवाडी ग्रामपंचायतीचा सन्मान रविवारी 5 रोजी जागतिक पर्यावरण दिनी मुंबईत होत आहे. याबाबतचे पत्र माझी वसुंधरा अभियान संचालनालयाच्या वतीने संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थांना प्राप्त झाले आहे.

राज्य शासनाने पृथ्वी, अग्नी, जल, वायू आणि आकाश या पंचमहाभूतांशी निगडित पर्यावरणाच्या दृष्टीने उपक्रम राबवण्यासाठी माझी वसुंधरा अभियान सुरू केले आहे. या अभियानात स्थानिक स्वराज्य संस्थांकडून पर्यावरणाच्या दृष्टीने कार्यक्रम राबवण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. यात राज्यात सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांना दरवर्षी जागतिक पर्यावरणदिनी गौरवण्यात येते. गतवर्षी सातारा जिल्ह्यातील कराड नगरपरिषदेने यामध्ये राज्यस्तरावर दुसरा क्रमांक पटकावला होता. या वर्षी सातारा जिल्ह्याची कामगिरी सर्वोत्तम झाली आहे. यामध्ये जिल्हाधिकारी सातारा, सातारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी कार्यकारी अधिकारी, अमृत गटात सातारा नगरपरिषद, नगरपालिका गटात कराड नगरपरिषद, नगरपंचायत गटात दहिवडी तर ग्रामपंचायत गटात पाटण तालुक्यातील मान्याचीवाडी ग्रामपंचायतीची कामगिरी सर्वोत्तम झाली आहे. त्यामुळे माझी वसुंधरा अभियान संचालनालयाच्या वतीने या स्थानिक स्वराज्य संस्थांना आज पत्र प्राप्त झाले असून या पत्रात सर्वोत्तम कामगिरीबद्दल आपला सन्मान मुंबईत करण्यात येणार असल्याचे म्हटले आहे.
 राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा सन्मान सोहळा नरिमन पॉईंटवरील टाटा थिएटरमध्ये सकाळी साडेदहा वाजता होणार आहे. याच वेळी स्थानिक स्वराज्य संस्थांचे गुणानुक्रम जाहीर होणार आहेत.

Friday, June 3, 2022

कोरोनाप्रमाणे मंकीपॉक्सचीही महासाथ येईल का ?तातडीची पाऊले उचलण्याची गरज!

वेध माझा ऑनलाइन - मंकीपॉक्सवर नियंत्रण मिळवता येऊ शकतं, असं सांगत याआधी दिलासा देणाऱ्या जागतिक आरोग्य संघटनेने आता आपल्या वक्तव्यावरून यूटर्न घेतला आहे. त्यामुळे जगाची चिंता वाढली आहे. मंकीपॉक्सवर नियंत्रण मिळवता येईल की नाही याची खात्री आम्हाला नसल्याचं आता WHO ने म्हटलं आहे. त्यामुळे आता कोरोनाप्रमाणे मंकीपॉक्सचीही महासाथ येईल की काय? अशीच भीती आता आहे

जगातील 30 देशांना मंकीपॉक्सने शिरकाव केला हे. 550 पेक्षा जास्त प्रकरणं दिसून आली आहेत. त्यामुळे जागतिक आरोग्य संघटनेनेही चिंता व्यक्त करत आताच तातडीने पावलं उचलण्याची गरज असल्याचं म्हटलं आहे.

Thursday, June 2, 2022

राहुल गांधी गेल्या 4 वर्षांपासून भेटले नाहीत ;पृथ्वीराज चव्हाण यांनी टाइम्स ऑफ इंडिया शी बोलताना व्यक्त केली नाराजी...आणखी काय म्हणाले... पहा...

वतेढ माझा ऑनलाइन - मुंबई:काँग्रेस नेतृत्वात बदलाची मागणी करणाऱ्या आणि गांधी कुटुंबाला विरोध करणाऱ्या पक्षाच्या G-23 गटातील आणखी एका नेत्याने पक्षावर जाहीर नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेस नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले की, ते गेल्या 4 वर्षांपासून राहुल गांधींना एकदाही भेटू शकले नाहीत. तसेच, उदयपूर येथे झालेल्या पक्षाच्या चिंतन शिबिरात आत्मपरीक्षण करण्यात आले नसल्याचेही त्यांनी सांगितले. 

'राहुल गांधी भेटले नाहीत'
टाइम्स ऑफ इंडियाशी बोलताना पृथ्वीराज चव्हाण यांनी ही प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, "मी जेव्हाही दिल्लीत राहतो तेव्हा माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांना भेटतो. त्यांची तब्येत आता पूर्वीसारखी नसली तरी ते नेहमी बोलायला-भेटायला तयार असतात. जेव्हा मी सोनिया गांधींना भेटण्यासाठी वेळ मागितली, तेव्हा त्याही मला भेटल्या. पण जवळपास 4 वर्षे झाली, या काळात मी राहुल गांधींना भेटू शकलो नाही", असं चव्हाण म्हणाले. 


'आत्मपरीक्षणास तयार नाहीत'
उदयपूर येथे झालेल्या काँग्रेसच्या नवसंकल्प शिबिराबाबत बोलताना पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, "काँग्रेस अध्यक्षांनी पक्षाशी संबंधित प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी चिंतन शिबिराचे आयोजन केले होते. मात्र पक्षातील काही नेत्यांच्या बोलण्यातून त्यांना आत्मपरीक्षणाची गरज नसल्याचे जाणवले. चिंतन शिबिरात प्रामाणिक आत्मपरीक्षण व्हायला हवे होते, असे माझे मत आहे. एखाद्याला लक्ष्य करण्यापेक्षा, अशा चुका पुन्हा होणार नाहीत याची काळजी घेतली पाहिजे," असेही ते म्हणाले.

कराड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारूप प्रभाग रचना जाहिर...

वेध माझा ऑनलाइन - कराड तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी गट व गणांची प्रारूप रचना गुरूवारी प्रसिद्ध करण्यात आली. यात कराड तालुक्यात दोन जिल्हा परिषद गट व दोन पंचायत समिती गणांची वाढ झाल्याने जिल्हा परिषदेचे चौदा गट व पंचायत समितीचे अठ्ठावीस गण झाले आहेत.

जिल्हा परिषद गट व पंचायत समिती गण त्यामधील समाविष्ट गावे पुढीलप्रमाणे ः
पाल गट ः
पाल गण ः पाल, भगतवाडी, हरफळवाडी, करंजोशी, शिरगाव, वाजेवाडी, आदर्शनगर, वडगाव उंब्रज, भांबे, मरळी, धावरवाडी

इंदोली गण ः इंदोली, मस्करवाडी, चोरजवाडी, डफळवाडी, सावरघर, साबळेवाडी, कोरीवळे, चेारे, साखरवाडी, हिंगनोळे, भोसलेवाडी, पेरले

उंब्रज गट ः
उंब्रज गण ः उंब्रज, गोडवाडी, नाणेगाव बुद्रुक, कळंत्रेवाडी

कोर्टी गण ः कोर्टी, भुयाचीवाडी, कवठे, नवीन कवठे, धनकवडी, वडोली भिकेश्‍वर, कालगाव, खराडे, चिंचणी, कोणेगाव, बेलवाडी

मसूर गट ः
किवळ गण ः हेळगाव, पाडळी हेळगाव, गायकवाडवाडी, बानुगडेवाडी, गोसावेवाडी, हणबरवाडी, कचरेवाडी, निवडी, किवळ, घोलपवाडी, खोडजाईवाडी, चिखली, वाण्याचीवाडी

मसूर गण ः मसूर, यादववाडी, माळवाडी, वाघेश्‍वर, कांबिरवाडी, शामगाव, अंतवडी, रिसवड,

कोपर्डे हवेली गट ः
वाघेरी गण ः वाघेरी, करवडी, पार्ले, वडोली निळेश्‍वर, पाचुंद, मेरवेवाडी, सुर्लीे, शहापूर, राजमाची, कामठी

कोपर्डे हवेली गण ः कोपर्डे हवेली, उत्तर कोपर्डे (यादववाडी), नडशी, यशवंतनगर, पिंपरी, शिरवडे, ब्रि, शिरवडे

चरेगाव गट ः
तळबीड गण ः तळबीड, वहागाव, खोडशी, बेलवडे हवेली, घोणशी

चरेगाव गण ः भवानवाडी, अंधारवाडी, मांगवाडी, शिवडे, हनुमानवाडी, चरेगाव, शितळवाडी, खालकरवाडी, तासवडे, वराडे

तांबवे गट ः
तांबवे गण ः तांबवे, उत्तर तांबवे, गमेवाडी, पाठरवाडी, आरेवाडी, डेळेवाडी, साजूर, भोळेवाडी