वेध माझा ऑनलाइन - पंजाबराव पाटील हे बळीराजा शेतकरी संघटनेचे स्वयंघोषित बोगस अध्यक्ष आहेत त्यांच्या पदाला कोणताही कायदेशीर आधार नाही त्यांच्या कडे बळीराजा संघटनेची कसलीही अधिकृत कागदपत्रे नसताना त्यांनी आजपर्यंत शेतकऱ्यांची संघटनेच्या नावाखाली फसवणूक केली आम्ही बळीराजा शेतकरी संघटनेचे अधिकृत रजिष्ट्रेशन केले आहे त्यामुळे प्रदेशाध्यक्ष म्हणून सर्वत्र फिरत असलेले बी जी पाटील आणि स्वयंघोषित अध्यक्ष पंजाबराव पाटील यांच्याविरोधात आम्ही महाराष्ट्रभर तकारारी करणार आहोत असे बळीराजा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला यांनी पत्रकाद्वारे कळवले आहे
बळीराजाचे पंजाबराव पाटील यांनी प्रदेशाध्यक्ष साजिद मुल्ला यांच्या सहित काही जणांची संघटनेतून हकालपट्टी करत असल्याचे आज जाहीर केले होते त्याबाबत मुल्ला यांनी सविस्तर खुलासा करताना पंजाबराव पाटील यांच्यासह संघटनेविषयी अनेक खुलासे करत पत्रकाद्वारे पोलखोल केली आहे
मुल्ला यांनी पत्रकात पुढे म्हणाले आहे की...
बळीराजा शेतकरी संघटना रजिस्टर आहे असे खोटे सांगून अनेकांना यामध्ये सामील करुन घेतले गेले मात्र आमच्या लक्षात ही बाब आल्यानंतर आम्ही ही संघटना रितसर रजिस्टर करून घेतली जेणे करून यामध्ये सामील झालेल्या कार्यकर्त्यांना भविष्यात अडचण येऊ नये...ते अजूनही जर म्हणत असतील की आमची संघटना रजिस्टर आहे तर त्यांनी ती कागदपत्रे दाखवावीत असे आव्हान देखील मुल्ला यांनी केले आहे
भविश्यात शेतकऱ्यांनी या बोगस लोकांपासून सावध रहावे असे आवाहन देखील बळीराजाचे प्रदेशाध्यक्ष मुल्ला यांनी केले आहे रजिस्ट्रेशन नंबर आणि प्रमाण पत्र घेऊन सोमवारी याबाबत कराडला पत्रकार परिषद घेणार आहोत त्यानंतर बोगस कोण कायदेशीर कोण याचा खुलासा होईल असेही मुल्ला यांनी दिलेल्या पत्रकात म्हटले आहे
No comments:
Post a Comment