वेध माझा ऑनलाइन - राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांमध्ये वाढत होत असल्याचं दिसून आलं आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याचे आरोग्य सचिव प्रदीप व्यास यांनी जिल्हाधिकाऱ्यांना मास्क सक्ती करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु यानंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
"आपल्याकडे मुबई, पुणे, पालघर, रायगड, ठाणे या जिल्ह्यांमध्ये थोड्याप्रमाणात कोरोनाबाधितांची संख्या वाढतेय. या पार्श्वभूमीवर केंद्राच्या आरोग्य विभागाकडून पत्रक आलं आहे. या जिल्ह्यातील लोकांसाठी उपाययोजना कराव्या लागतील आणि कोरोनाबाधितांची संख्या वाढू नये म्हणून उपाययोजना कराव्या लागतील. त्याबाबती टास्क फोर्सची एक बैठक झाली. यात बंदीस्त ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करावं, असं ठरवण्यात आलं. तो आवाहनाचा मुद्दा आहे, त्यात मास्कसक्ती नाही," असं स्पष्टीकरण टोपे यांनी दिलं. इंग्रजीत मस्ट हा शब्द वापरल्यानं तो सक्तीचा असा होत नाही, मॅंडेटरी असा होत नसल्याचंही ते म्हणाले.
"जरी रुग्णसंख्या वाढत असली तरी रुग्णालयात दाखल होणाऱ्यांची संख्या नगण्य आहे. त्यामुळे याबाबचे रुग्ण फ्लू आजारासारखे पॉझिटिव्ह होतायत आणि बरे होतायत. पॅनिक होण्याची परिस्थिती नाही. जे पॉझिटिव्ह होतायत ते त्यांच्या इम्युनिटीनेच बरे होतायत असं मला दिसून येतंय," असंही त्यांनी स्पष्ट केलंय. पंधरा वीस दिवस आपल्याला परिस्थिती पाहता येईल, त्यानंतर परिस्थिती आणि संख्या पाहून मास्कसक्ती करायची का हे ठरवलं जाणार असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय.
दरम्यान, राज्यात बंदिस्त ठिकाणी मास्कसक्ती करण्यात आली असून सार्वजनिक ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. अशी माहिती मिळत आहे... महाराष्ट्रात बंदिस्त ठिकाणी मास्क सक्ती करण्याचं आरोग्य सचिवांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटलं आहे. मात्र यावरुन प्रशासन आणि मंत्री यांच्यात मात्र समन्वय नसल्याचं समोर आलं आहे... राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मात्र माध्यमांशी बोलताना कोरोना मास्क वापरण्याबद्दल 'मस्ट' शब्द वापरला असला तरी त्याचा अर्थ 'बंधनकारक' असा नाही, असं म्हणत आरोग्य सचिवांच्या आदेशावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे... आरोग्य सचिवांचं पत्र आणि आरोग्यमंत्र्यांच्या वक्तव्यामुळं नागरिकांचा मात्र गोंधळ उडण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment