Monday, June 19, 2023

प्रियांका प्ले हाऊसला कराड पालिकेचा अल्टीमेटम ; सात दिवसात इतर परवानग्यासह खुलासा सादर करा ;प्ले हाऊसच्या अडचणीत वाढ

वेध माझा ऑनलाइन । कराडच्या कोयना कॉलनीतील प्रियांका प्ले हाऊस कराड नगर पालिकेच्या कोणत्याही परवानगीशिवाय चालवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, तरी आपल्या मालकी हक्काचे दस्तऐवज व इतर परवानग्याचा लेखी खुलासा सात दिवसात सादर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कराड पालिकेने प्रियांका प्ले हाऊसच्या चालक विमल ठक्कर व गृह निर्माण संस्थेस पत्राद्वारे कळवले आहे.

कोयना कॉलनीतील बेमुदत आंदोलनाचा आजचा नववा दिवस. कोयना गृहनिर्माण संस्थेची आदर्श उपविधी व कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय अनेक वर्षांपासून येथील कोयना कॉलनीत बेकायदेशीरपणे प्रियांका प्ले हाऊस सुरू आहे. याचा आम्हा स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे प्रियांका प्ले हाऊस बंद करून येथून स्थलांतरीत करण्यात यावे, या मागणीसाठी येथील मूळ निवासी, गृहनिर्माण संस्थेचे सदस्य व वारसदार बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. आपल्या संविधानिक मागणीची निवेदने मुख्यमंत्री महोदयांपासून प्रशासनाच्या सर्व विभागांना देण्यात आली आहेत.

या आंदोलनाची पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांनी दखल घेत कारवाईचा अल्टीमेटम दिला आहे. तर कराड पालिकेचे मुख्याधिकारी खंदारे यांनी या आंदोलनाची दखल घेतली. दि.१६ जून रोजी प्रियांका प्ले हाऊसच्या चालक विमल ठक्कर यांना पुराव्यासह लेखी खुलासा सादर करण्याठी सात दिवसाचा अल्टीमेट दिला असून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.

ठक्कर काय पुरावे सादर करणार ?
एवढे वर्ष कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या परवानगी अथवा ना हरकत दाखल्याशिवाय प्ले हाऊस कसे काय चालवू शकता? या पोलीस प्रशासनाच्या प्रश्नावर निरुत्तर झालेले  तसेच कोणत्याही परवानग्या, ना हरकत दाखले सादर करण्यास अपयशी ठरलेले ठक्कर पालिकेला नेमका काय पुरावा व खुलासा सादर करणार याकडे लक्ष लागू राहिले आहे.

कराड एसटी आगाराचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते गौरव ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडुन महाराष्ट्रातील आयडॉल बसस्थानकाची निर्मीती करण्यात आली आहे. कराड येथील एसटी आगारातील अधिकारी, कर्मचारी यांनी सामुहीक प्रयत्नातुन उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील २५० एसटी आगारामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराड येथील एसटी आगाराच्या व्यवस्थापिका शर्मिष्ठा पोळ आणि आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांचा सत्कार करण्यात आला. 

  कऱ्हाडमध्ये जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात अनेक कामे करण्यात आली. त्याअंतर्गत सुमारे ११ कोटी रुपये खर्च करुन कराड येथे आमदार पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतुन येथील एसटी बसस्थानक राज्यातील आयडॉल बसस्थानक करण्यात आले. त्या बसस्थानकातुन नेहमीच प्रवाशांच्या सेवेचे चांगले काम केले जाते. परिवहन महामंडळाने २०२२-२०२३ या कालावधीत मूल्यांकन फल निष्पत्तीची राज्यातील २५० आगारांची माहिती संकलीत केली. त्यामध्ये असलेल्या २० परिमाणके तपासण्यात आली. त्यातील सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांपैकी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून नऊ आगारांची निवड करण्यात आली आहे. त्या नऊ आगारांपैकी येथील एसटी आगाराने सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सामुहिक प्रयत्नातुन परिमाणके पुर्ण केली.त्यामध्ये केवळ ७८ बसेसव्दारे ९९.६४ लाख किलोमीटरचा प्रवास, ४७.४४ कोटी उत्पन्न आणि १३०.९१ लाख प्रवाशांची वाहतुक करुन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. त्याबद्ल मुंबई येथील एसटी महामंडळाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते येथील एसटी आगाराच्या व्यवस्थापिका सौ. पोळ, आगार व्यवस्थापक श्री. डुबल यांचा सत्कार करण्यात आला.

ठाकरे गटाला राष्ट्रवादी देणार जोर का झटका !! विधान परिषद विरोधी पक्षनेते पदावर करणार दावा ; पहा कोणाची नावे आहेत पुढे...

वेध माझा ऑनलाइन । विधान परिषदेच्या आमदार मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे विधान परिषदेमधील ठाकरे गटाचे संख्याबळ कमी झाले आहे. याआधी विप्लव बाजोरिया यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता. ठाकरे गटाचे दोन आमदार शिंदे गटात गेल्याने उद्धव ठाकरेंची  शिवसेना आणि राष्ट्रवादि यांचे संख्याबळ सारखे झाले आहे. यानंतर आता राष्ट्रवादीने विधान परिषदेच्या विरोधी पक्षनेते पदावर दावा केला आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे गटाच्या अडचणी वाढू शकतात.

राष्ट्रवादीचे नरहरी झिरवाळ  यांनी सोमवारी याबाबत भूमिका स्पष्ट केली. तर आमदार अमोल मिटकरी यांनी एकनाथ खडसे हे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते झाले पाहिजेत, असे म्हटले आहे. शिवसेना ठाकरे गटाची सदस्य संख्या एक ने कमी झाली, आता ज्याचे सदस्य जास्त त्याच्याकडे विरोधी पक्षनेते पद असावे, असे मिटकरी यांनी म्हटले आहे त्यामुळे राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना धक्का देणार का? अशी चर्चा रंगली आहे.

नरहरी झिरवाळ यांनी बोलताना सांगितले की, विरोधी पक्षनेते पदावर आम्ही दावा करणार आहोत. अमोल मिटकरी आणि नरहरी झिरवाळ यांच्या दाव्यानंतर ठाकरे गटाचे अंबादास दानवे यांचं विधान परिषदेचं विरोधी पक्षनेतेपद धोक्यात येण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस याबाबत काय भूमिका घेणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

विधान परिषदेत ठाकरे गटाकडे 10 तर शिंदे गटाकडे एक आमदार होता.तसेच राष्ट्रवादीकडे 9 तर काँग्रेसकडे 8 आमदार  असून 5 अपक्ष आमदार आहेत.त्यापैकी किशोर दराडे यांनी ठाकरेंना तर सत्यजीत तांबे यांचा काँग्रेसला पाठिंबा आहे. दराडे यांनी पाठिंबा बदलला तर मात्र गेम बदलू शकतो.दरम्यान, मनिषा कायंदे यांनी शिंदे गटात प्रवेश केल्यामुळे आता विधान परिषदेत ठाकरे गटाचे आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी 9 आमदार आहेत.

बाजारातून ८८ हजार कोटींच्या ५०० रुपयांच्या नोटा गायब ! ; वाचा...आर.बी. आय. चे स्पष्टीकरण -


वेध माझा ऑनलाइन । आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी काही प्रश्न विचारल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाले होते. प्रतिसादात नवीन डिझाईन असलेल्या ५०० रुपयांच्या लाखो नोटा गायब झाल्याचे सांगण्यात आले.

बाजारातून ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्याच्या वृत्ताचे आरबीआयने खंडन केले असून, केंद्रीय बँकेने याबाबत स्पष्टीकरण जारी केले आहे. अर्थव्यवस्थेतून मोठ्या प्रमाणात ५०० रुपयांच्या नोटा गायब झाल्या आहेत. त्यांची किंमत ८८,०३२.५० कोटी रुपये आहे, असा एका आरटीआय अहवालाचा हवाला देत मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला होता. परंतु आरटीआयमधून मिळालेल्या माहितीचा चुकीचा अर्थ लावल्यामुळे असे झाल्याचे केंद्रीय बँकेने प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे. देशातील तीन प्रिंटिंग प्रेसमधून ५०० रुपयांच्या नोटांबाबत आरटीआय अंतर्गत दिलेल्या माहितीचा चुकीचा अर्थ लावला गेला आहे. रिझर्व्ह बँकेला प्रिंटिंग प्रेसमधून दिलेली प्रत्येक नोट मोजली जाते, असे केंद्रीय बँकेने म्हटले आहे. यासाठी मजबूत यंत्रणा आहे. आरबीआयने लोकांना अशा प्रकरणांत केवळ मध्यवर्ती बँकेने दिलेल्या माहितीवर विश्वास ठेवण्याचा सल्ला दिला आहे.

यापूर्वी आरटीआय कार्यकर्ते मनोरंजन रॉय यांनी काही प्रश्न विचारल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांमध्ये व्हायरल झाले होते. प्रतिसादात नवीन डिझाईन असलेल्या ५०० रुपयांच्या लाखो नोटा गायब झाल्याचे सांगण्यात आले. त्याची किंमत ८८,०३२.५ कोटी रुपये आहे. देशातील तीन प्रिंटिंग प्रेसने ५०० रुपयांच्या ८८१०.६५ दशलक्ष नोटा नवीन डिझाइनसह छापल्याचा दावा करण्यात आला होता, परंतु रिझर्व्ह बँकेला या नोटांपैकी केवळ ७२६० दशलक्ष नोटा मिळाल्या. एकूण ५०० रुपयांच्या १७६०.६५ दशलक्ष नोटा गहाळ झाल्या, ज्यांचे मूल्य ८८,०३२.५ कोटी रुपये आहे. RBI ची छापखाने बंगळुरू, देवास आणि नाशिक येथे आहेत.

धक्कादायक! ३० वर्षीय महिलेची प्रियकराने ऑटोरिक्षात केली हत्या, मुंबईतील घटनेनं खळबळ ;

 वेध माझा ऑनलाइन । मुंबईच्यासाकीनाका परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. इथे एका ३० वर्षीय महिलेची तिच्या प्रियकराने ऑटोरिक्षात हत्या केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हे जोडपे रिक्षातून प्रवास करत होते. मुंबईतील साकीनाका परिसरातील खैरानी रोडवर ही घटना घडली. महिलेशी वाद झाल्यानंतर आरोपीने महिलेचा गळा चिरून ऑटोमध्ये बसून तिथून पळ काढला. पण पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले असल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. 

मुंबईतील या धक्कादायक घटनेनंतर राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. अलीकडेच मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये एका तरूणीवर अत्याचार केल्याची घटना समोर आली होती. 

साकीनाका येतील घटनेचा दाखला देत राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या नेत्या आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवर प्रश्न उपस्थित केला आहे. "साकीनाका, मुंबई येथे एका महिलेचा भररस्त्यात गळा चिरून खून करुन आरोपी पसार झाला. ही अतिशय संतापजनक घटना आहे. राज्यातील कायदा आणि सुव्यवस्था ढासळली असून महिला सुरक्षित नाहीत. गुन्हेगार मोकाट असून नागरिक दहशतीखाली आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांनी यासंदर्भात वैयक्तिक लक्ष घालून तपास यंत्रणा सक्रिय करणे आवश्यक आहे. गुन्हेगारांना कायद्याची जरब बसणे गरजेचे आहे", असे सुप्रिया सुळे यांनी ट्विटच्या माध्यमातून म्हटले. 



ज्यांना बौद्धिक उंची नाही असे लोक आमच्याबद्दल गैरसमज पसरवत आहेत ; उदयनराजेंची शिवेंद्रराजेंवर टीका

वेध माझा ऑनलाइन । माझे आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे सलोख्याचे सम्बन्ध आहेत पण ज्यांना बौद्धिक उंची नाही असे लोक विनाकारण आमच्या दोघांमध्ये गैरसमज पसरवत आहेत अशा भाषेत खा उदयनराजे भोसले यांनी शिवेंद्रराजे भोसले यांच्यावर टीका केली

शिवेंद्रराजे यांनी काल टीका करताना उदयनराजे व पालकमंत्री यांच्यात इगो वॉर सुरू असून त्यात सातारकर विनाकारण अडकले आहेत अशी टीका केली होती त्यावर उत्तर देताना जलमंदिर येथे ते माध्यमांशी बोलत होते

उदयनराजे म्हणाले,  यशवंतराव चव्हाण किसनवीर यांची स्मारके आहेत मग बाळासाहेब देसाई यांचेही स्मारक व्हावे त्यांचे कार्य मोठे आहे आमचा त्याला विरोध नाही पण या विषयाबाबत पालकमंत्री अद्याप मला चर्चा करण्यासाठी भेटले नाहीत स्मारकाबाबत जे होईल ते कायद्याने होईल त्यांचे आणि माझे सलोख्याचे सम्बन्ध आहेत पण ज्यांची बौद्धिक उंची कमी आहे असे लोक आमच्या दोघात गैरसमज पसरवत आहेत या स्मारकाला माझा विरोध असल्याचे भासवत आहेत शिवतीर्थ परिसर हा ऐतिहासिक आहे त्याचे पावित्र्य महत्वाचे आहे त्याठिकाणी सुशोभीकरण अधिक कसे करता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही राजे म्हणाले

सातारा जिल्ह्यातील 14 कृषी सेवा केंद्राचे परवाने कायमचे रद्द ; सातारा कृषी विभागाची कारवाई

वेध माझा ऑनलाइन । सातारा जिल्ह्यातील 14 कृषी सेवा केंद्राचे परवाने सातारा कृषी विभागाने कायमचे रद्द केल्याचे आज कृषी विकास अधिकारी विजय माईंकर यांनी माध्यमांना सांगितले आहे

यामध्ये 9 खत विक्रेते आहेत 3 बियाणे विक्रेते आहेत तर 2 कीटक नाशक विक्रेते यांचा समावेश आहे भरारी पथकाच्या वतीने सध्या कृषी केंद्र तपासणी सुरु आहे अशा प्रकारच्या केंद्रातून संबंधित अवजारांची जादा दराने विक्री करण्यासारखे गैरप्रकार आढळून आल्यास कठोर कारवाई करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी दुडी यांनी या पार्शवभूमीवर दिला आहे