वेध माझा ऑनलाइन । कराडच्या कोयना कॉलनीतील प्रियांका प्ले हाऊस कराड नगर पालिकेच्या कोणत्याही परवानगीशिवाय चालवले जात असल्याचे निदर्शनास आले आहे, तरी आपल्या मालकी हक्काचे दस्तऐवज व इतर परवानग्याचा लेखी खुलासा सात दिवसात सादर करा, अन्यथा कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे कराड पालिकेने प्रियांका प्ले हाऊसच्या चालक विमल ठक्कर व गृह निर्माण संस्थेस पत्राद्वारे कळवले आहे.
कोयना कॉलनीतील बेमुदत आंदोलनाचा आजचा नववा दिवस. कोयना गृहनिर्माण संस्थेची आदर्श उपविधी व कोणत्याही शासकीय परवानगीशिवाय अनेक वर्षांपासून येथील कोयना कॉलनीत बेकायदेशीरपणे प्रियांका प्ले हाऊस सुरू आहे. याचा आम्हा स्थानिक नागरिकांना प्रचंड त्रास होत आहे. त्यामुळे प्रियांका प्ले हाऊस बंद करून येथून स्थलांतरीत करण्यात यावे, या मागणीसाठी येथील मूळ निवासी, गृहनिर्माण संस्थेचे सदस्य व वारसदार बेमुदत धरणे आंदोलनास बसले आहेत. आपल्या संविधानिक मागणीची निवेदने मुख्यमंत्री महोदयांपासून प्रशासनाच्या सर्व विभागांना देण्यात आली आहेत.
या आंदोलनाची पोलीस उपविभागीय अधिकारी अमोल ठाकूर यांनी दखल घेत कारवाईचा अल्टीमेटम दिला आहे. तर कराड पालिकेचे मुख्याधिकारी खंदारे यांनी या आंदोलनाची दखल घेतली. दि.१६ जून रोजी प्रियांका प्ले हाऊसच्या चालक विमल ठक्कर यांना पुराव्यासह लेखी खुलासा सादर करण्याठी सात दिवसाचा अल्टीमेट दिला असून कायदेशीर कारवाईचा इशारा दिला आहे.
ठक्कर काय पुरावे सादर करणार ?
एवढे वर्ष कोणत्याही सक्षम प्राधिकरणाच्या परवानगी अथवा ना हरकत दाखल्याशिवाय प्ले हाऊस कसे काय चालवू शकता? या पोलीस प्रशासनाच्या प्रश्नावर निरुत्तर झालेले तसेच कोणत्याही परवानग्या, ना हरकत दाखले सादर करण्यास अपयशी ठरलेले ठक्कर पालिकेला नेमका काय पुरावा व खुलासा सादर करणार याकडे लक्ष लागू राहिले आहे.
No comments:
Post a Comment