शिवेंद्रराजे यांनी काल टीका करताना उदयनराजे व पालकमंत्री यांच्यात इगो वॉर सुरू असून त्यात सातारकर विनाकारण अडकले आहेत अशी टीका केली होती त्यावर उत्तर देताना जलमंदिर येथे ते माध्यमांशी बोलत होते
उदयनराजे म्हणाले, यशवंतराव चव्हाण किसनवीर यांची स्मारके आहेत मग बाळासाहेब देसाई यांचेही स्मारक व्हावे त्यांचे कार्य मोठे आहे आमचा त्याला विरोध नाही पण या विषयाबाबत पालकमंत्री अद्याप मला चर्चा करण्यासाठी भेटले नाहीत स्मारकाबाबत जे होईल ते कायद्याने होईल त्यांचे आणि माझे सलोख्याचे सम्बन्ध आहेत पण ज्यांची बौद्धिक उंची कमी आहे असे लोक आमच्या दोघात गैरसमज पसरवत आहेत या स्मारकाला माझा विरोध असल्याचे भासवत आहेत शिवतीर्थ परिसर हा ऐतिहासिक आहे त्याचे पावित्र्य महत्वाचे आहे त्याठिकाणी सुशोभीकरण अधिक कसे करता येईल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे असेही राजे म्हणाले
No comments:
Post a Comment