Monday, June 19, 2023

कराड एसटी आगाराचा मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते गौरव ; काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन । महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाकडुन महाराष्ट्रातील आयडॉल बसस्थानकाची निर्मीती करण्यात आली आहे. कराड येथील एसटी आगारातील अधिकारी, कर्मचारी यांनी सामुहीक प्रयत्नातुन उत्कृष्ट कामगिरी करुन राज्यातील २५० एसटी आगारामध्ये दुसरा क्रमांक पटकावला आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कराड येथील एसटी आगाराच्या व्यवस्थापिका शर्मिष्ठा पोळ आणि आगार व्यवस्थापक कुलदीप डुबल यांचा सत्कार करण्यात आला. 

  कऱ्हाडमध्ये जेष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षात अनेक कामे करण्यात आली. त्याअंतर्गत सुमारे ११ कोटी रुपये खर्च करुन कराड येथे आमदार पृथ्वीराज चव्हाण हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या संकल्पनेतुन येथील एसटी बसस्थानक राज्यातील आयडॉल बसस्थानक करण्यात आले. त्या बसस्थानकातुन नेहमीच प्रवाशांच्या सेवेचे चांगले काम केले जाते. परिवहन महामंडळाने २०२२-२०२३ या कालावधीत मूल्यांकन फल निष्पत्तीची राज्यातील २५० आगारांची माहिती संकलीत केली. त्यामध्ये असलेल्या २० परिमाणके तपासण्यात आली. त्यातील सर्वात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या आगारांपैकी एसटीच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून नऊ आगारांची निवड करण्यात आली आहे. त्या नऊ आगारांपैकी येथील एसटी आगाराने सर्व अधिकारी, कर्मचारी यांच्या सामुहिक प्रयत्नातुन परिमाणके पुर्ण केली.त्यामध्ये केवळ ७८ बसेसव्दारे ९९.६४ लाख किलोमीटरचा प्रवास, ४७.४४ कोटी उत्पन्न आणि १३०.९१ लाख प्रवाशांची वाहतुक करुन राज्यात दुसरा क्रमांक पटकावला. त्याबद्ल मुंबई येथील एसटी महामंडळाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते येथील एसटी आगाराच्या व्यवस्थापिका सौ. पोळ, आगार व्यवस्थापक श्री. डुबल यांचा सत्कार करण्यात आला.

No comments:

Post a Comment