Monday, July 3, 2023

जयंत पाटील राष्ट्रवादीच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त ; सुनिल तटकरे यांची नवे प्रदेशाध्यक्ष ;प्रफुल्ल पटेल यांनी दिली माहिती ;

 
वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक धोरणासंदर्भात सूचना करायची होती. आम्ही सुचित करु ईच्छितो की संघटनात्मक दृष्टीनं नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या मागच्या दिल्लीच्या 21 जूनच्या कार्यक्रमात मला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. मात्र सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं होतं त्यानंतर पक्षाच्या वर्किंगमध्ये उपाध्यक्ष नियुक्त झालो होतो. तेव्हा मी काही नियुक्त्या जाहीर केल्या होत्या, यात जयंत पाटील यांची हंगामी नियुक्ती केली होती . तात्काळ व्यवस्था असावी त्यासाठी त्यांना जबाबदारी दिली होती, त्यापार्श्वभूमीवर आम्ही जयंत पाटील यांना कळवलं आहे, त्यांना मुक्त करतोय. सुनिल तटकरे यांना नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त करतो, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.

अजित पवार यांच्याकडून संघटनात्मक बदल सुरु केले आहेत. संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त कऱण्यात येत आहे. सुनील तटकरे नवीन प्रदेशाध्यक्ष असतील. पक्षाच्या पुढील नियुक्तीचे संपूर्ण अधिकार सुनील तटकरे यांच्याकडे राहतील, असे प्रफुल पटेल म्हणाले.

तटकरे यांनी आत्ताच पद स्विकारत कामाला लागावं. हॅंडओव्हरची प्रक्रिया करावी अशी सूचना केली आहे. प्रदेशअध्यक्ष नात्याने बाकी नियुक्त्याच्या अधिकार सुनिल तटकरे करु शकतील. पक्षाच्या धोरणाधिकारे आम्ही हे ठरवलं आहे. निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षांकडे काही गोष्टी कारवाई केल्या आहेत. माझं म्हणणं एक आहे, कुठल्याही व्यक्तीची बडतर्फीची प्रक्रिया स्पीकरकडे असते. त्यामुळे बाकी इतर गोष्टींकडे गेल्यावर काही होऊ शकणार नाही, असे प्रफुल पटेल यांनी सांगितलेय.

अजित पवार यांना आमदारांनी विधिमंडळाचा नेता म्हणून नियुक्त केलं आहे. अधिकृतपणे ते विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची जबाबदारी सांभाळतील. आम्ही प्रतोद म्हणून अनिल पाटील यांना जबाबदारी कायम ठेवली आहे. तसं मी विधानसभा अध्यक्षांना कळवलं आहे. आम्ही सर्व अधिकृतपणे सर्व पार पाडलं आहे. विधानसभा सत्र होणार आहे, अशात ह्या नियुक्त्या केल्या आहेत, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले. 

अजित पवार काय म्हणाले ?
रविवारी सुनिल तटकरेंची नेमणूक केली, त्यात काही निर्णय घेतले आहेत ते सांगितलेच. एकाला प्रतोद आणि विरोधी पक्षनेते नेमलेलं आहे. मात्र हे काम विधानसभा अध्यक्षांचं असतं. ज्याची संख्या जास्त असते त्याची नेमणूक करत असतात. मात्र आमच्या आमदारांमध्ये भीती निर्माण व्हावी त्यासाठी केला जात आहे. यासंदर्भात बहुसंख्य आमदार आमच्याबरोबर आहेत. आम्ही पुढेही काम करत राहू, एनसीपीच्या बळकटीसाठी काम करत राहू, असे अजित पवार म्हणाले.  

सुनिल तटकरे यांच्याकडून नेत्यांच्या नियुक्त्या -
मला प्रदेशाध्यक्षपदाचं नियुक्तीचं पत्र दिलं आहे,. पक्ष सत्तेत नव्हता तेव्हा आम्ही पक्ष मजबूत केला. 5 तारखेला आम्ही एमईटी कॉलेजमध्ये सर्व कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. विविध स्तरावरचे पदाधिकारी यासाठी उपस्थित राहतील असा विश्वास आहे, असे तटकरे म्हणाले. यावेळी तटकरे यांनी काही नियुक्त्या केल्या. महिला अध्यक्षपदी रुपाली चाकणकर, युवक कांग्रेसपदी सूरज चव्हाण तर प्रदेश प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी, आनंद परांजपे, सूरज चव्हाण... असे सुनिल तटकरे यांनी सांगितले. 



अखेर सुनील तटकरे व प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादीतुन हकालपट्टी ; शरद पवारांनी घेतला निर्णय

वेध माझा ऑनलाईन। अजित पवारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन खासदारांची पक्षांतरबंदी कायद्याखाली पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांनी हकालपट्टी केली आहे एक पत्र लिहुन सुप्रिया सुळे यांनी या दोघांच्या हकालपट्टीची  मागणी केली होती 

खासदार सुनिल तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या अध्यक्षांना अंधारात ठेऊन त्यांना कोणतीही कल्पना न देता शपथविधीस कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि पक्षविरोधी कारवायात सहभाग नोंदवला असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच या दोन्ही खासदारांवर दहाव्या अनुसूचीनुसार, पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्रतेची कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली.त्यानुसार शरद पवारांनी या दोन्ही खासदारांची पक्षातून हकलपट्टी केली आहे

सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन खासदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवा ; सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांकडे मागणी

वेध माझा ऑनलाईन। अजित पवारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन खासदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी यासंबंधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये ही मागणी केली आहे.

खासदार सुनिल तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या अध्यक्षांना अंधारात ठेऊन त्यांना कोणतीही कल्पना न देता शपथविधीस कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि पक्षविरोधी कारवायात सहभाग नोंदवला असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच या दोन्ही खासदारांवर दहाव्या अनुसूचीनुसार, पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्रतेची कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली.

साताऱ्यात शरद पवार म्हणाले...अजितदादा म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे ;

वेध माझा ऑनलाईन । राष्ट्रवादी चे राज्याचे अध्यक्ष आमदार जयंत पाटील हेच आहेत अजित पवार म्हणजे राष्ट्रवादी पक्ष नव्हे अजितदादां व त्यांच्या सहकाऱ्यांना अपात्र करायचं की नाही हे जयंत पाटील व सहकारी ठरवतील मात्र आमचा पक्ष फोडणार्यांना आम्ही आता धडा शिकवणार आहोत अजितदादांना अपात्र करण्याच्या भानगडीत आम्ही पडणार नाही किंवा त्यांच्यावर कोणतीही कारवाईही करणार नाही आम्ही जनतेत जाणार आहोत आज गुरुपौर्णिमेच्या दिवशी स्व चव्हाण साहेबांच्या समधीस अभिवादन करून आम्ही त्याची सुरुवात केली आहे ते साताऱ्यात बोलत होते

दरम्यान, रामराजेही अजित पवारांसोबत गेल्याबाबत विचारणा केली असता शरद पवारांनी त्यावर खोचक प्रतिक्रिया दिली. “आज ते इथे उपस्थित नाहीत याबद्दल समाधान आहे. अनेक कार्यकर्त्यांनी मला आज त्यांच्याबद्दल सांगितलं. त्यांची जी मतं मी आज ऐकली, ते ऐकल्यावर कार्यकर्ते माझ्यावर अधून-मधून नाराज का होते, ते मला कळलंय”, असं सूचक विधान शरद पवारांनी यावेळी केलं.

सध्या अजितदादांबरोबर असणारे अनेक राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात ; माजी गृहमंत्री आ अनिल देशमुखांचे महत्वाचे विधान...

वेध माझा ऑनलाईन। सध्या अजितदादांबरोबर असणारे अनेक राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत येत्या 2 दिवसात या सगळंच चित्र स्पष्ट होईल अशा शब्दात राज्याचे माजी गृहमंत्री आ अनिल देशमुख यानी नुकत्याच राज्याच्या  राजकीय घडामोडी विषयी घडलेल्या घडामोदींबाबत भाष्य केलं कराडच्या सर्किट हाऊस येथे आ पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी कमराबन्द चर्चा करण्यासाठी  थांबले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे विधान केले

ते म्हणाले मला ईडीने विनाकारण फसवून अडकवले तसे कोर्टाने आपले म्हणणेही मांडले कोणत्याही पुराव्याशिवाय माझ्यावर ईडीने कारवाई केली निववळ ऐकीव माहितीवर ही कारवाई करण्यात आली होती अनेक राज्यात ईडी च्या कारवाई बाबत अशी स्थिती आहे 

 राज्यातल्या राजकीय घडामोडी बद्दल बोलताना ते म्हणाले शरद पवार व महाविकास आघाडीचे सगळेच घटक एक होऊन भाजपच्या विरोधात रान उठवणार आहेत अजितदादांनी केलेल्या बंडा मुळे राष्ट्रवादी फुटली आहे अशी स्थीती असताना दादां बरोबर फुटलेले अनेक राष्ट्रवादी चे आमदार पुन्हा पवार साहेब व जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचे महत्वाचे विधानही त्यांनी यावेळी केले येत्या 2 दिवसात राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडीविषयी सम्पूर्ण चित्र स्पष्ट होईल असेही ते ठामपणे म्हणाले

Sunday, July 2, 2023

आपले सहकारी शिंदे-फडणवीस सरकारला बळी पडले -शरद पवार

वेध माझा ऑनलाईन । राज्यात जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारे शिंदे फडणवीस सरकार सध्या राज्यात आहे आणि आपले काही सहकारी त्यांना बळी पडले आहेत मात्र काळजी करू नका 6 महिन्यातच पुन्हा जनतेच्या समोर जाण्याची वेळ येणार आहे त्यावेळी सुज्ञ जनता या लोकांना त्यांची योग्य जागा दाखवतील असा आशावाद राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराड येथे व्यक्त केला

काल अचानकपणे अजितदादांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर   फुटलेली राष्ट्रवादी पार्टी राज्याच्या समोर आली आणि राज्यातल्या या घडामोडीने एकच खळबळ उडाली त्यांनतर याच पार्शवभूमीवर राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्याच्या दौऱ्यासाठी बाहेर पडले आहेत व फुटलेली राष्ट्रवादी जनतेत जाऊन पुन्हा बांधणार असे सांगून त्यांची सुरुवात कराडच्या स्व चव्हाण साहेबांच्या समधीस्थळी अभिवादन करून आपण करणार आहेत असेही त्यांनी जाहिर केले होते त्या अनुषंगाने कराड येथे आले असता ते जनतेला संबोधित करत होते

पवार पुढे म्हणाले राज्यात जातीयवादी सरकार आहे गांधी नेहरू यांचा विचार बाजूला ठेवत हे सरकार जाती जातीत तेढ निर्माण करत राज्याला अधोगतिकडे नेत आहेत तरी दुर्दैवाने आपले काही सहकारी त्यांना बळी पडले आहेत मात्र हे फार काळ चालणार नाही चार सहा महिन्यात पुन्हा लोकांसमोर जाण्याची वेळ येईल तेव्हा जनता या सर्वांना आपली जागा दाखवतील आज गुरुपौर्णिमा आहे यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने व जनतेच्या ताकदिवर आपण पुन्हा एकजूट होऊन मजबुतीने या सरकारला त्याची जागा दाखवू असा विश्वास व्यक्त करत शरद पवार यांनी आपले मनोगत संपवताना पुढील प्रवासासाठी परवानगी द्या अस म्हणत भाषण संपवले
आज राज्यात