वेध माझा ऑनलाईन। सध्या अजितदादांबरोबर असणारे अनेक राष्ट्रवादीचे आमदार पुन्हा शरद पवार व जयंत पाटील यांच्या संपर्कात आहेत येत्या 2 दिवसात या सगळंच चित्र स्पष्ट होईल अशा शब्दात राज्याचे माजी गृहमंत्री आ अनिल देशमुख यानी नुकत्याच राज्याच्या राजकीय घडामोडी विषयी घडलेल्या घडामोदींबाबत भाष्य केलं कराडच्या सर्किट हाऊस येथे आ पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी कमराबन्द चर्चा करण्यासाठी थांबले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला त्यावेळी त्यांनी हे विधान केले
ते म्हणाले मला ईडीने विनाकारण फसवून अडकवले तसे कोर्टाने आपले म्हणणेही मांडले कोणत्याही पुराव्याशिवाय माझ्यावर ईडीने कारवाई केली निववळ ऐकीव माहितीवर ही कारवाई करण्यात आली होती अनेक राज्यात ईडी च्या कारवाई बाबत अशी स्थिती आहे
राज्यातल्या राजकीय घडामोडी बद्दल बोलताना ते म्हणाले शरद पवार व महाविकास आघाडीचे सगळेच घटक एक होऊन भाजपच्या विरोधात रान उठवणार आहेत अजितदादांनी केलेल्या बंडा मुळे राष्ट्रवादी फुटली आहे अशी स्थीती असताना दादां बरोबर फुटलेले अनेक राष्ट्रवादी चे आमदार पुन्हा पवार साहेब व जयंत पाटील यांच्या संपर्कात असल्याचे महत्वाचे विधानही त्यांनी यावेळी केले येत्या 2 दिवसात राज्यातील सध्याच्या राजकीय घडामोडीविषयी सम्पूर्ण चित्र स्पष्ट होईल असेही ते ठामपणे म्हणाले
No comments:
Post a Comment