Monday, July 3, 2023

सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन खासदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवा ; सुप्रिया सुळे यांनी शरद पवारांकडे मागणी

वेध माझा ऑनलाईन। अजित पवारांच्या शपथविधीसाठी उपस्थित राहिलेल्या राष्ट्रवादीच्या सुनिल तटकरे आणि प्रफुल्ल पटेल या दोन खासदारांना पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्र ठरवा अशी मागणी खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. सुप्रिया सुळे यांनी यासंबंधी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवारांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये ही मागणी केली आहे.

खासदार सुनिल तटकरे आणि खासदार प्रफुल्ल पटेल यांनी पक्षाच्या अध्यक्षांना अंधारात ठेऊन त्यांना कोणतीही कल्पना न देता शपथविधीस कार्यक्रमाला उपस्थिती लावली आणि पक्षविरोधी कारवायात सहभाग नोंदवला असा आरोप खासदार सुप्रिया सुळे यांनी केला. तसेच या दोन्ही खासदारांवर दहाव्या अनुसूचीनुसार, पक्षांतरबंदी कायद्याखाली अपात्रतेची कारवाई करावी अशीही मागणी त्यांनी केली.

No comments:

Post a Comment