Sunday, July 2, 2023

आपले सहकारी शिंदे-फडणवीस सरकारला बळी पडले -शरद पवार

वेध माझा ऑनलाईन । राज्यात जाती जातीमध्ये तेढ निर्माण करणारे शिंदे फडणवीस सरकार सध्या राज्यात आहे आणि आपले काही सहकारी त्यांना बळी पडले आहेत मात्र काळजी करू नका 6 महिन्यातच पुन्हा जनतेच्या समोर जाण्याची वेळ येणार आहे त्यावेळी सुज्ञ जनता या लोकांना त्यांची योग्य जागा दाखवतील असा आशावाद राष्ट्रवादी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कराड येथे व्यक्त केला

काल अचानकपणे अजितदादांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीनंतर   फुटलेली राष्ट्रवादी पार्टी राज्याच्या समोर आली आणि राज्यातल्या या घडामोडीने एकच खळबळ उडाली त्यांनतर याच पार्शवभूमीवर राष्ट्रवादी चे सर्वेसर्वा शरद पवार हे राज्याच्या दौऱ्यासाठी बाहेर पडले आहेत व फुटलेली राष्ट्रवादी जनतेत जाऊन पुन्हा बांधणार असे सांगून त्यांची सुरुवात कराडच्या स्व चव्हाण साहेबांच्या समधीस्थळी अभिवादन करून आपण करणार आहेत असेही त्यांनी जाहिर केले होते त्या अनुषंगाने कराड येथे आले असता ते जनतेला संबोधित करत होते

पवार पुढे म्हणाले राज्यात जातीयवादी सरकार आहे गांधी नेहरू यांचा विचार बाजूला ठेवत हे सरकार जाती जातीत तेढ निर्माण करत राज्याला अधोगतिकडे नेत आहेत तरी दुर्दैवाने आपले काही सहकारी त्यांना बळी पडले आहेत मात्र हे फार काळ चालणार नाही चार सहा महिन्यात पुन्हा लोकांसमोर जाण्याची वेळ येईल तेव्हा जनता या सर्वांना आपली जागा दाखवतील आज गुरुपौर्णिमा आहे यशवंतराव चव्हाण यांच्या आशीर्वादाने व जनतेच्या ताकदिवर आपण पुन्हा एकजूट होऊन मजबुतीने या सरकारला त्याची जागा दाखवू असा विश्वास व्यक्त करत शरद पवार यांनी आपले मनोगत संपवताना पुढील प्रवासासाठी परवानगी द्या अस म्हणत भाषण संपवले

No comments:

Post a Comment