वेध माझा ऑनलाईन। राष्ट्रवादी काँग्रेसच्या संघटनात्मक धोरणासंदर्भात सूचना करायची होती. आम्ही सुचित करु ईच्छितो की संघटनात्मक दृष्टीनं नियुक्ती करण्यास सुरुवात केली आहे. पक्षाच्या मागच्या दिल्लीच्या 21 जूनच्या कार्यक्रमात मला राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षाची जबाबदारी दिली होती. मात्र सप्टेंबर 2022 मध्ये राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं होतं त्यानंतर पक्षाच्या वर्किंगमध्ये उपाध्यक्ष नियुक्त झालो होतो. तेव्हा मी काही नियुक्त्या जाहीर केल्या होत्या, यात जयंत पाटील यांची हंगामी नियुक्ती केली होती . तात्काळ व्यवस्था असावी त्यासाठी त्यांना जबाबदारी दिली होती, त्यापार्श्वभूमीवर आम्ही जयंत पाटील यांना कळवलं आहे, त्यांना मुक्त करतोय. सुनिल तटकरे यांना नवे प्रदेशाध्यक्ष नियुक्त करतो, अशी माहिती प्रफुल पटेल यांनी दिली.
अजित पवार यांच्याकडून संघटनात्मक बदल सुरु केले आहेत. संघटनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. जयंत पाटील यांना प्रदेशाध्यक्ष पदावरुन मुक्त कऱण्यात येत आहे. सुनील तटकरे नवीन प्रदेशाध्यक्ष असतील. पक्षाच्या पुढील नियुक्तीचे संपूर्ण अधिकार सुनील तटकरे यांच्याकडे राहतील, असे प्रफुल पटेल म्हणाले.
तटकरे यांनी आत्ताच पद स्विकारत कामाला लागावं. हॅंडओव्हरची प्रक्रिया करावी अशी सूचना केली आहे. प्रदेशअध्यक्ष नात्याने बाकी नियुक्त्याच्या अधिकार सुनिल तटकरे करु शकतील. पक्षाच्या धोरणाधिकारे आम्ही हे ठरवलं आहे. निवडणूक आयोग, विधानसभा अध्यक्षांकडे काही गोष्टी कारवाई केल्या आहेत. माझं म्हणणं एक आहे, कुठल्याही व्यक्तीची बडतर्फीची प्रक्रिया स्पीकरकडे असते. त्यामुळे बाकी इतर गोष्टींकडे गेल्यावर काही होऊ शकणार नाही, असे प्रफुल पटेल यांनी सांगितलेय.
अजित पवार यांना आमदारांनी विधिमंडळाचा नेता म्हणून नियुक्त केलं आहे. अधिकृतपणे ते विधिमंडळ पक्षाच्या नेत्याची जबाबदारी सांभाळतील. आम्ही प्रतोद म्हणून अनिल पाटील यांना जबाबदारी कायम ठेवली आहे. तसं मी विधानसभा अध्यक्षांना कळवलं आहे. आम्ही सर्व अधिकृतपणे सर्व पार पाडलं आहे. विधानसभा सत्र होणार आहे, अशात ह्या नियुक्त्या केल्या आहेत, असे प्रफुल पटेल यांनी सांगितले.
अजित पवार काय म्हणाले ?
रविवारी सुनिल तटकरेंची नेमणूक केली, त्यात काही निर्णय घेतले आहेत ते सांगितलेच. एकाला प्रतोद आणि विरोधी पक्षनेते नेमलेलं आहे. मात्र हे काम विधानसभा अध्यक्षांचं असतं. ज्याची संख्या जास्त असते त्याची नेमणूक करत असतात. मात्र आमच्या आमदारांमध्ये भीती निर्माण व्हावी त्यासाठी केला जात आहे. यासंदर्भात बहुसंख्य आमदार आमच्याबरोबर आहेत. आम्ही पुढेही काम करत राहू, एनसीपीच्या बळकटीसाठी काम करत राहू, असे अजित पवार म्हणाले.
सुनिल तटकरे यांच्याकडून नेत्यांच्या नियुक्त्या -
मला प्रदेशाध्यक्षपदाचं नियुक्तीचं पत्र दिलं आहे,. पक्ष सत्तेत नव्हता तेव्हा आम्ही पक्ष मजबूत केला. 5 तारखेला आम्ही एमईटी कॉलेजमध्ये सर्व कार्यकर्त्यांची बैठक बोलवली आहे. विविध स्तरावरचे पदाधिकारी यासाठी उपस्थित राहतील असा विश्वास आहे, असे तटकरे म्हणाले. यावेळी तटकरे यांनी काही नियुक्त्या केल्या. महिला अध्यक्षपदी रुपाली चाकणकर, युवक कांग्रेसपदी सूरज चव्हाण तर प्रदेश प्रवक्ते म्हणून अमोल मिटकरी, आनंद परांजपे, सूरज चव्हाण... असे सुनिल तटकरे यांनी सांगितले.
No comments:
Post a Comment