Monday, February 12, 2024

अशोक चव्हाणांचा राजीनामा ; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय दिली प्रतिक्रिया ? वाचा सविस्तर;

वेध माझा ऑनलाइन । काँग्रेसमधील अनेक नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आज काँग्रेस नेते आमदार अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा सुरू असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे. 

"अशोक चव्हाण यांनी राजिनामा दिल्याची चर्चा मी तुमच्याकडून ऐकली. पण काँग्रेसमधील अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत.ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष काम करत आहे यामुळे जनतेत काम करणाऱ्या नेत्यांची गुदमर होत आहे, त्यामुळे असा ट्रेंड देशभरात सुरू आहे. यामुळे राज्यातील काँग्रेसमधील काही मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, मी आता फक्त एवढंच सांगेन आगे आगे देखो होता है क्या, असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. 
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेली उलथापालथी आणि  फोडाफोडीच्या मालिकेने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा वेग घेतला आहे. गेल्या दीड वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी काँग्रेस मात्र एकसंध होता. मात्र आज दुपारी काँग्रेसमध्ये भूकंप घडवणारी माहिती समोर आली असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे. 

Sunday, February 11, 2024

कॉग्रेस नेते अशोक चव्हाण 11 आमदारांना घेवून लवकरच भाजप मध्ये प्रवेश करणार? घडामोडींना वेग ?

वेध माझा ऑनलाइन। महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडवणारी बातमी समोर आली आहे. काँग्रेस नेते व राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते अशोक चव्हाण यांनी काँग्रेसच्या सदस्यत्व पदाचा राजीनामा दिला आहे ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चा आहेत. अशोक चव्हाण यांच्यासोबत त्यांचे ११ समर्थक आमदार सुद्धा भाजपच्या वाटेवर असून आजच अशोक चव्हाण यांचा भाजप प्रवेश होण्याची शक्यता आहे. अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये गेल्यास आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेस पक्षाला हा सर्वात मोठा हादरा म्हणावा लागेल

अशोक चव्हाण यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांची भेट घेतली असून त्यानंतर त्यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्याच्या चर्चा सुरू आहे. अशोक चव्हाण यांचा मोबाईल फोन सध्या नॉट रिचेबल आहे.  गेल्या काही महिन्यापासून अशोक चव्हाण हे भाजपच्या वाटेवर आहेत अशा चर्चा सुरु होत्याच. राज्यात महाविकास आघाडी सरकार जाऊन शिंदे फडणवीस यांचे सरकार आले तेव्हा सुद्धा बहुमत चाचणीवेळी अशोक चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे काही आमदार सभागृहात उपस्थित नव्हते. भाजपला मदत करण्याासाठीच या आमदारांनी बहुमत चाचणीला येणे टाळल्याची चर्चा त्यावेळी सुरु होती. त्यातच दुसरीकडे भाजपच्या प्रदेश कार्यालयात सुद्धा नेत्यांची मोठी लगबग सुरु आहे. बड्या नेत्याच्या पक्षप्रवेशासाठीच ही लबबग सुरु आहे असं बोललं जात आहे.

धनगर आरक्षणासाठी 17 फेब्रुवारीला 50 लाख धनगर बांधव मुंबईत येणार; सरकारला इशारा

वेध माझा ऑनलाइन। बीडमध्ये धनगर आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी इशारा मेळावा घेण्यात आला आणि याच इशारा मेळाव्यामध्ये धनगर आरक्षणाच्या पुढील आंदोलनाची दिशा ठरवण्यात आली. येत्या 17 फेब्रुवारीला आरक्षणासाठी 50 लाख धनगर बांधव हे चौंडी येथून मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी जाणार आहेत. तसा निर्णय बीड येथे झालेल्या इशारा मेळाव्यात घेण्यात आला आहे.

50 लाख धनगर बांधव मेंढ्यासह मुंबईला जाणार
अनेक वेळा आंदोलन मोर्चा काढून देखील सरकार धनगर समाजाला आरक्षण देत नाही, त्यामुळे बीडमध्ये सरकारला इशारा देण्यासाठी धनगर समाज बांधवांनी मेळावा घेतला. या मेळाव्यामध्ये धनगर समाज बांधव 17 तारखेला चोंडी येथील अहिल्यादेवी होळकर यांचा आशीर्वाद घेऊन मुंबईत मेंढ्यासह दाखल होणार आहेत असा इशारा यशवंत सेनेचे बाळासाहेब दोडतले यांनी सरकारला दिला. धनगर समाज बांधव मुंबईत गेल्यावर मुख्यमंत्र्यांना नाही तर पंतप्रधानांना देखील आरक्षणाची घोषणा करावी लागेल असं दोडतले म्हणाले आहेत

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे धनगर आरक्षणाच्या विरोधात आहेत, त्यांनी जर 20 तारखेच्या आत धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर ते जातीवादी आहेत असं आपण समजायचं आणि धनगर आरक्षण विरोधी सरकार असे बोर्ड गावागावात लावायचे. असे बाळासाहेब दोडकले  म्हणाले आहेत

धनगर आरक्षणासाठी एमआयएम पक्ष रस्त्यावर उतरणार
धनगर आरक्षणाचा प्रश्न गेल्या अनेक वर्षापासून प्रलंबित असून देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्याच कॅबिनेटमध्ये धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न सोडवू असं सांगितलं होतं. मात्र अद्याप देखील धनगर समाजाला आरक्षण मिळाले नाही. त्यामुळे धनगर आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार इम्तेहाज जलील यांनी देखील सरकारकडे मागणी केली आहे. बीडमध्ये झालेल्या इशारा सभेत एमआयएम पक्ष देखील धनगर आरक्षणासाठी रस्त्यावर उतरणार असल्याचं जिल्हाध्यक्ष शेख शफीक यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांची शपथ घेतली आणि ती पूर्ण करून दाखवली असे ते म्हणतात. तर धनगर आरक्षणासाठी उपमुख्यमंत्री अहिल्यादेवी होळकर यांची शपथ घेतील का असा प्रश्न यशवंत सेनेचे अध्यक्ष बाळासाहेब दोडतले यांनी उपमुख्यमंत्र्यांना विचारला. 21 दिवस आंदोलन करून 50 दिवसाचा वेळ सरकारने घेतला तरी देखील अद्याप आरक्षण का दिले नाही असा सवाल देखील त्यांनी उपस्थित केला आहे. तर दुसरीकडे प्रकाश आंबेडकर यांनी देखील धनगर आरक्षणाला पाठिंबा द्यावा अशी साद त्यांनी प्रकाश आंबेडकर यांना घातली. 

येत्या 20 तारखेपर्यंत धनगर समाजाला आरक्षण दिलं नाही तर लोकसभेच्या निवडणुकीवर संपूर्ण धनगर समाज हा बहिष्कार घालणार आहे. तर जो पक्ष धनगर समाजाच्या नेत्याला तिकीट देणार नाही त्या पक्षालादेखील मतदान करणार नसल्याचं या इशारा मेळाव्यातून सरकारला सांगण्यात आलं. आतापर्यंत अनेक वेळा आंदोलन करून देखील राज्य सरकारने आपल्या तोंडावर काठी मारली आहे, आता मेंढपाळाची काठी राज्य सरकारच्या तोंडावर बसणार असल्याचं धनगर बांधवांकडून सांगण्यात आलंय.

राष्ट्रवादी पक्ष अजित पवार गटाला दिल्यानंतर शरद पवार पहिल्यांदा बोलले ...काय म्हणाले...वाचा बातमी ...

वेध माझा ऑनलाइन। केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्ह अजित पवारांच्या गटाला दिल्यानंतर शरद पवार यांनी आज प्रथमच त्यावर भाष्य केलं. निवडणूक आयोगाचा हा निकाल आश्चर्यकारक आहे परंतु आम्ही सुप्रीम कोर्टात गेलो आहोत आणि आम्हाला लवकर न्याय मिळेल, असा विश्वास शरद पवारांनी व्यक्त केला. तसेच चिन्ह मर्यादीत काळासाठी उपयुक्त असतं असेही त्यांनी सांगितलं.

पुण्यातील एका कार्यक्रमाला संबोधित केल्यानंतर शरद पवार यांनी मीडियाशी संवाद साधला, त्यांनी पत्रकारांच्या विविध प्रश्नांना उत्तरे दिली. यावेळी शरद पवार म्हणाले, माझा व्यक्तिगत अनुभव असा आहे, मी पहिली निवडणूक बैलजोडीवर लढलो, नंतर आमचं चिन्ह गेलं.आम्ही चरख्यावर लढलो, नंतर आमचं चिन्ह गेलं, आम्ही हातावर लढलो.नंतर आमचं चिन्ह गेल्यावर आम्ही घड्याळावर लढलो. त्यामुळे लोकांच्या दृष्टीने चिन्ह हे मर्यादित कामासाठी उपयुक्त असतं पण या पद्धतीने निवडणूक आयोगाचा निकाल आश्चर्यकारक आहे. निवडणूक आयोगानं आमचं पक्षचिन्ह काढून घेतलं नाही तर आमचा पक्ष दुसऱ्याला दिला. ज्यांनी पक्ष स्थापन केला, उभारला त्यांच्या हातून पक्ष काढून दुसऱ्याच्या हातात दिला हे देशात घडलं नव्हतं, ते सुद्धा निवडणूक आयोगाने करून दाखवलं असं शरद पवार यांनी सांगितलं.

मी निवडणुकीला उभा राहणार नाही- 
दरम्यान, काहीजण भावनिक करतील, शेवटची निवडणूक आहे असं म्हणतील परंतु त्यांना बळी पडू नका असं विधान अजित पवारानी शरद पवार याना उद्देशून केलं होते, त्यावर सुद्धा पवारांनी उत्तर दिले. मी निवडणुकीला उभं राहणार नाही हे मी यापूर्वीच जाहीर केलं आहे. त्यामुळं भावनिक बोलायची गरज नाही. बारामतीचे लोक हुशार आणि समजदार आहेत. बारामतीत कामे कोणी केली आणि बारामतीची प्रतिष्ठा कुणी वाढवली आहे हे त्यांना माहिती आहे, त्यामुळं ते योग्य निर्णय घेतली, असं शरद पवार म्हणाले.

Saturday, February 10, 2024

पुण्यात दिवसा ढवळ्या बंदुकीचा थरार ; आर्थिक वादातून पार्टनरला घातल्या गोळ्या ;

वेध माझा ऑनलाइन। पुण्यात कुख्यात गुंड शरद मोहोळच्या झालेल्या दिवसाढवळ्या हत्येनंतर सुरु झालेला बंदुकीचा थरकाप सुरुच आहे. कोथरूडनंतर आता पुण्यातील औंध भागात आर्थिक वादातून पार्टनरवर गोळीबार करून स्वतःवरही गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. अनिल ढमाले अस आत्महत्या करणाऱ्याचे नाव आहे. आर्थिक वादातून हा गोळीबार करण्यात आल्याचे म्हटले जात आहे. गोळीबारात जखमी झालेल्या आकाश जाधवची प्रकृती गंभीर आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहेत.

गोळीबार करण्यात आलेला पार्टनर आकाश जाधव या गोळीबारात गंभीर जखमी झाला आहे. औंधमधील ज्युपिटर चौकात हा प्रकार घडला. याच चौकात आकाश जाधवचे ज्वेलरी शॉप होते. हे शॉप त्याने अनिल ढमालेला चालवण्यासाठी दिले होते.  मात्र दोघांमधे गेल्या काही दिवसांपासून पैशाच्या व्यवहारावरुन वाद सुरु होते. 

आज (10 फेब्रुवारी) आकाशने अनिल ढमालेला दुकानात बोलावून घेतले. त्यानंतर दोघेही एकाच दुचाकीवरून बँकेत जाण्यासाठी निघाले. यावेळी दुचाकीच्या मागे बसलेल्या अनिल ढमालेनं दुचाकी चालवत असलेल्या आकाशवर मागून गोळी झाडली. गोळीबार केल्यानंतर त्याने पळ काढला. पळ काढल्यानंतर तो एका रिक्षात जाऊन बसला. रिक्षात बसल्यानंतर अनिलने रिक्षाचालकाला पुणे स्टेशनच्या दिशेने रिक्षा नेण्यास सांगितले. रिक्षातून थोडं अंतर गेल्यानंतर रिक्षाच्या मागील सीटवर बसलेल्या अनिल ढमालेनं स्वतःच्या सुद्धा डोक्यात गोळी मारुन आत्महत्या केली.

राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात कृष्णा विद्यापीठाच्या ‘फार्मासिस्ट’ लघुपटाची निवड

वेध माझा ऑनलाइन। पुणे येथे होणाऱ्या १२ व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात कृष्णा विश्व विद्यापीठातील फार्मसी अधिविभागाच्या ‘फार्मासिस्ट’ या लघुपटाची निवड झाली आहे. या लघुपटाचे दिग्दर्शन कृष्णा विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. बाळकृष्ण दामले यांनी केले आहे.

आरोग्य जागृतीच्या क्षेत्रात काम करणाऱ्या पुणे येथील पी. एम. शाह फाऊंडेशनच्यावतीने दरवर्षी आरोग्य समस्यांवरील चित्रपटांच्या राष्ट्रीय महोत्सवाचे आयोजन केले जाते. यंदाच्या १२ व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवासाठी विविध भारतीय भाषांमधून अनेक विषयांवरचे हजारो लघुपट फाऊंडेशनकडे प्राप्त झाले होते. यामधून कृष्णा विश्व विद्यापीठातील फार्मसी अधिविभागाने तयार केलेल्या ‘फार्मासिस्ट’ या लघुपटाची निवड यंदाच्या महोत्सवासाठी करण्यात आली आहे.

कृष्णा विद्यापीठाच्या दूरस्थ व ऑनलाईन शिक्षण केंद्राचे संचालक डॉ. बाळकृष्ण दामले यांनी दिग्दर्शित केलेल्या या लघुपटात फार्मसी अधिविभागातील प्रा. डॉ. विश्वजीत घोरपडे, प्रा. शिवशरण धडे, प्रा. ज्योत्स्ना गांधी व प्रा. जिशा यांनी भूमिका साकारल्या आहेत. त्यांना फार्मसी अधिविभागाचे अधिष्ठाता डॉ. नामदेव जाधव यांचे मार्गदर्शन लाभले. पुणे येथील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात २३ व २४ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या १२ व्या राष्ट्रीय आरोग्य चित्रपट महोत्सवात या लघुपटाचे प्रदर्शन करण्यात येणार आहे.

या यशाबद्दल कृष्ण विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले, कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिणगारे, कुलगुरु डॉ. नीलम मिश्रा, कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे यांनी लघुपटाच्या संपूर्ण टीमचे अभिनंदन केले आहे. 


मुख्यमंत्री चषकात थरारक फायनल ; सासवडच्या संत सोपान काका बँक संघास विजेतेपद; महिलांमध्ये पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघास विजेतेपद ; सामन्यांचे यशस्वी नियोजन ; शिंदे गटाचे नेते रणजितनानांची अनेकांनी थोपटली पाठ ;

वेध माझा ऑनलाइन। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त लिबर्टी मजदूर मंडळाच्या क्रीडांगणावर आयोजित केलेल्या मुख्यमंत्री चषक राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेत व्यावसायिक पुरुष गटात अतिशय थरारक आणि रोमहर्षक फायनल प्रेक्षकांना  पाहायला मिळाली. 

मुंबई महापालिका संघाने जवळजवळ जिंकलेला सामना शेवटच्या एका मिनिटात बाजी उलटवत सासवडच्या संत सोपान काका बँक संघाने जिंकत मुख्यमंत्री चषक पटकावला. पृथ्वीराज शिंदे याने जिगरबाज खेळ करत शेवटच्या मिनिटात गुणांची कमाई केल्याने सासवड संघास विजेतेपद मिळाले. ही लढत पाहण्यासाठी आलेल्या हजारो प्रेक्षकांनी पृथ्वीराज शिंदेंच्या खेळाला दाद देताना त्याच्यावर बक्षिसांचा वर्षाव केला.
व्यावसायिक पुरुष गटाची फायनल अपेक्षेनुसार रोमहर्षक ठरली. दोन्ही संघांनी व्यावसायिक खेळाचे प्रदर्शन करत खेळ करत गुण घेतल्याने प्रत्येक क्षणाला विजयाचे पारडे दोन्ही संघांकडे झुकत होते. सामन्याच्या पहिल्या हाफमध्ये संत सोपान काका संघाने गुणांची कमाई करत आघाडी घेतली. मात्र मुंबई महापालिका संघाने शांतपणे चाली करत बरोबरी साधली. पहिल्या हाफमध्ये सामना १९-१९ असा बरोबरीत होता.
दुसऱ्या हाफमध्ये ही दोन्ही संघ एकमेकांवर गुणांची कमाई करत होते. संत सोपान काका संघास काही चुकांचा फटका बसला. त्यामुळे हा संघ पिछाडीवर होता. शेवटच्या पाच मिनिटांत मुंबई संघ विजेतेपद पटकावणार असे वाटत असतानाच पुण्याच्या पृथ्वीराज शिंदेंने चपळदार खेळाने पुणे संघास गुण मिळवून दिले. वेगवान हालचाली करत त्याने गुण मिळवले. त्यांच्या जादुई हालचालींपुढे मुंबई संघाचा प्रतिकार कमी पडला आणि ४०-४५ अशा गुणांनी सासवड संघाने विजेतेपद पटकावले. त्यावेळी मैदानावर उपस्थित हजारो प्रेक्षकांनी जल्लोष करत पृथ्वीराजला खांद्यावर उचलून घेतले. शेवटच्या क्षणापर्यंत थरार पाहावयास मिळाल्याने दोन्ही संघांच्या खेळाडूंचे कौतुक झाले.  संत सोपान काका बँक संघ सासवडने २ लाख २२ हजार २२२ रुपयांचे प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळविले. मुंबई महापालिका संघास उपविजेतेपद मिळाले. मुंबई पोर्ट ट्रस्ट मुंबई संघाने तिसरा आणि इन्कम टॅक्स पुणे संघाने चौथा क्रमांक पटकावला‌. अष्टपैलू खेळाडू म्हणून मुंबईच्या विशाल कुमार, उत्कृष्ट चढाईसाठी पृथ्वीराज शिंदे तर उत्कृष्ट पकडसाठी राजेश बोराडे याला गौरवण्यात आले.

महिलांमध्ये पुण्याच्या राजमाता जिजाऊ संघाने शिवशक्ती मुंबई संघावर एकतर्फी विजय मिळवत विजेतेपद मिळविले. शिवशक्ती मुंबई संघास उपविजेतेपद, द्रोणा स्पोर्ट्स पुणे संघास तिसरा तर एम. डी. स्पोर्ट्स पुणे संघास चौथा क्रमांक मिळाला. अष्टपैलू खेळाडू म्हणून सलोनी गजमले, उत्कृष्ट चढाईसाठी अर्चना जोरे, उत्कृष्ट पकडसाठी रेखा सावंत यांना गौरवण्यात आले.
भाजपचे जिल्हाध्यक्ष धैर्यशील कदम, कराड अर्बन बँकेचे अध्यक्ष दिलीप गुरव, 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक के एन. पाटील, शिवाजी हाउसिंग सोसायटीच्या अध्यक्षा श्रीमती सुनीता जाधव, माजी नगराध्यक्षा एड. विद्याराणी साळुंखे, रणजित नाना पाटील यांच्या हस्ते सामन्यांना प्रारंभ झाला. बक्षीस वितरण दिलीप गुरव, लिबर्टीचे उपाध्यक्ष अरुण जाधव, एड. मानसिंगराव पाटील, रणजित नाना पाटील, सचिन पाटील, सचिव रमेश जाधव यांच्या हस्ते झाले. मुनीर बागवान सावकार, विजय गरुड, दादासाहेब पाटील, एकनाथ बागडी, आशपाक मुजावर, किशोर शिंदे, विजय कुलकर्णी,  राजेंद्र जाधव, एकनाथ बागडी, लिबर्टीचे सर्व संचालक, आजी माजी खेळाडू व क्रीडा प्रेमी नागरिक उपस्थित होते.

रणजित पाटील यांची अनेकांनी थोपटली पाठ...
कबड्डीची मोठी परंपरा असणाऱ्या लिबर्टी मजदूर मंडळाच्या वतीने रणजित पाटील नाना यांच्या पुढाकाराने गेल्या वर्षापासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य कबड्डी स्पर्धा आयोजित करण्यात येत आहेत. नामांकित खेळाडूंचा खेळ पाहावयास मिळत आहे. काल अंतिम सामन्यासाठी हजारो प्रेक्षकांनी उपस्थिती लावली. महिलाही मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. लिबर्टीच्या मैदानावर पूर्वीचे दिवस पाहावयास मिळत होते. स्पर्धेला मिळालेला प्रतिसाद आणि नेटक्या संयोजना बद्धल रणजित पाटील नाना यांची अनेकांनी पाठ थोपटली. खास करून लिबर्टीचे माजी खेळाडूही भारावलेले होते.