वेध माझा ऑनलाइन । काँग्रेसमधील अनेक नेते लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा सुरू आहे. आज काँग्रेस नेते आमदार अशोक चव्हाण यांनी आमदारकीचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा सुरू असून ते भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याचीही सुरू आहे. यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रीया दिली आहे.
"अशोक चव्हाण यांनी राजिनामा दिल्याची चर्चा मी तुमच्याकडून ऐकली. पण काँग्रेसमधील अनेक मोठे नेते भाजपच्या संपर्कात आहेत.ज्या प्रकारे काँग्रेस पक्ष काम करत आहे यामुळे जनतेत काम करणाऱ्या नेत्यांची गुदमर होत आहे, त्यामुळे असा ट्रेंड देशभरात सुरू आहे. यामुळे राज्यातील काँग्रेसमधील काही मोठे नेते भाजपमध्ये प्रवेश करतील, मी आता फक्त एवढंच सांगेन आगे आगे देखो होता है क्या, असं मोठं वक्तव्य उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे, यामुळे आता राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या साडेचार वर्षांपासून सुरू असलेली उलथापालथी आणि फोडाफोडीच्या मालिकेने लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा वेग घेतला आहे. गेल्या दीड वर्षांत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली असली तरी काँग्रेस मात्र एकसंध होता. मात्र आज दुपारी काँग्रेसमध्ये भूकंप घडवणारी माहिती समोर आली असून, राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे राज्यातील ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. तसेच त्यांनी आमदारकीचाही राजीनामा दिला आहे.
No comments:
Post a Comment