Sunday, August 10, 2025

फडणवीसांनी दिले शरद पवारांना उत्तर ; म्हणाले... हा राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम ;

वेध माझा ऑनलाइन
आजपर्यंत राहुल गांधी यांनी अनेकदा ईव्हीएम मशीनबाबत शंका उपस्थित केली असली तरी शरद पवार तसं कधीच बोलले नव्हते. किंबहुना शरद पवार साहेबांनी अनेकदा स्पष्ट भूमिका घेतली होती की, ईव्हीएमला दोष देणे अयोग्य आहे. मात्र, आता राहुल गांधी यांच्या भेटीनंतर शरद पवार अचानक मतदानप्रक्रियेतील फेरफाराविषयी बोलू लागले आहेत. हा राहुल गांधी यांच्या भेटीचा परिणाम दिसतोय, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले. ते शनिवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. शरद पवार यांनी आजच एका पत्रकार परिषदेत खळबळजनक गौप्यस्फोट केला होता. महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीपूर्वी  दिल्लीत दोन जण आपल्याला भेटायला आले होते. या दोघांनी आपल्याला 160 मतदारसंघांमध्ये हमखास विजय मिळवून देतो, असे सांगितले होते. मात्र, आम्ही पारदर्शकपणे निवडणूक प्रक्रियेला सामोरे जाण्याचा निर्णय घेतल्याचे शरद पवार यांनी सांगितले. त्यांच्या या वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडाली होती. या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना पवारांच्या सर्व आरोपांचे खंडन केले.

विरोधकांनी कितीही संभ्रम निर्माण केला तरी भारताइतक्या पारदर्शक आणि मुक्त पद्धतीने निवडणुका कुठेच होत नाहीत. ईव्हीएम आणि निवडणूक आयोग यांच्यावर आरोप करणारी मंडळी जनतेत बोलतात. पण निवडणूक आयोगाने बोलावल्यावर जात नाहीत. शपथपत्र द्यायला तयार नाहीत. सांगतात आम्ही संसदेत शपथ घेतली आहे. पण संसदेतील शपथ सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयात चालते का? त्यांना माहिती आहे की, आपलं खोटं पकडलं गेलं तर उद्या तुमच्यावर फौजदारी कारवाई होऊ शकते. त्यामुळे रोज खोटं बोलायचं आणि पळून जायचं, असे हे पळपुटे लोक आहेत, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली.

नागपूरमध्ये शरद पवारांनी केला मोठा गौप्यस्फोट :

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी नागपूरमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी शरद पवार यांनी मोठा गौप्यस्फोट केला. विधानसभा निवडणुकीपूर्वी दोन लोकांनी भेट घेतली होती त्यांनी 160 जागा जिंकवण्याची गॅरंटी दिली होती. निवडणूक आयोगाबाबत शंका नसल्यानं त्याकडे दुर्लक्ष केलं, असं शरद पवार म्हणाले. त्या दोन लोकांची भेट राहुल गांधी यांच्यासोबत देखील घालून दिली होती. आम्ही दोघांनी जनतेत जाऊन जो कौल मिळेल तो स्वीकारण्याचं ठरवलं त्या माणसांकडे दुर्लक्ष करण्याचा निर्णय घेतला, असं शरद पवार म्हणाले. 

शरद पवार म्हणाले की, मला आठवतंय विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी दिल्लीमध्ये मला काही लोक भेटायला आले. दोन लोक, त्यांची नावे, पत्ते आत्ता माझ्याकडे नाहीत. मी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. त्यांनी मला सांगितलं, महाराष्ट्रात विधानसभेच्या 288 जागा आहेत, आम्ही तुम्हाला 160 जागा जिंकून देण्याची गॅरंटी देतो.  मला आश्चर्य वाटलं. स्पष्ट सांगायचं म्हणजे, त्यांनी जे जे गॅरंटीचं सांगितलं. निवडणूक आयोग या संस्थेबद्दल मला यत्किंचितही शंका नव्हती. असे लोक भेटत असतात, पण त्यांच्याकडे मी त्यावेळी दुर्लक्ष केलं. हे झाल्यानंतर त्या लोकांची आणि राहुल गांधी यांची भेट मी घालून दिली. त्या लोकांना जे काही म्हणायचं होतं ते राहुल गांधींच्या समोर म्हंटलं. राहुल गांधी आणि माझं मत या कामात आपण लक्ष देऊ नये असं झालं. हा आपला रस्ता नाही. आपण लोकांमध्ये जाऊ, लोकांचा जो निर्णय असेल तो स्विकारु असं ठरवलं.

युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष शिवराज मोरे यांचे जिल्ह्यात जल्लोषात स्वागत ;

 वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्ष पदी शिवराज मोरे यांची निवड झाल्यानंतर कराड मध्ये प्रथमच आगमन झाले. शिरवळ पासून  कराड या दरम्यानच्या प्रवासात टप्प्याटप्प्यावर त्यांचे जोरदार हार घालून जल्लोषी स्वागत करण्यात आले. शिवराज दादा आगे बढो हम तुम्हारे साथ है, एकच वादा शिवराज दादा अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी काँग्रेस एकसंघाची हाक दिली.
तासवडे टोल नाका येथे कराड उत्तर काँग्रेस कमिटीकडून शिवराज मोरेंचे जोरदार स्वागत करण्यात आले. 

शिवराज मोरे यांचे कराड शहरात आगमन होताच त्यांनी कोल्हापूर नाका येथे महात्मा गांधीजींच्या पुतळ्यास अभिवादन करून दत्त चौक येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकास अभिवादन केले. यानंतर शिवराज मोरे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा जोतिबा फुले यांच्या स्मारकास अभिवादन केले यानंतर महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांच्या स्मृतीस्थळास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सद्याच्या काँग्रेसच्या आव्हानात्मक परिस्थितीत कार्यकर्त्यांमध्ये नैराश्याचे वातावरण होते मात्र शिवराज मोरेंची झालेली निवड व त्यांचे कराड मधील आगमनाने वेगळाच माहोल तयार झाला. जोशाने भरलेले कार्यकर्ते गाड्यांची मोठी रॅली चौकाचौकात क्रेनला लटकणारे मोठ मोठाले हार आणि आमचा नेता शिवराज दादा अशा घोषणाबाजी करण्यात आल्या.

Wednesday, August 6, 2025

कराडमधील वार्ड क्रमांक दोन मध्ये विनायक कदम यांनी राबवली रस्त्यातील खड्डे बुजवण्याची मोहीम - तेथील रहिवाश्यांनी व्यक्त केले समाधान ;

वेध माझा ऑनलाइन
अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक युवा नेते विनायक कदम यांच्या प्रयत्नाने व कराड नगरपरिषद प्रशासनाच्या सहकार्याने वार्ड क्रमांक 2 मधील रस्त्यातील खड्याना बुजवण्याची मोहीम नुकतीच राबविण्यात आली विनायक कदम यांनी स्वतः त्याठिकाणी थांबून ही कामे त्यांनी करून घेतली त्यानिमित्ताने त्यांच्या वार्ड क्रमांक 2 मधील लोकांकडून समाधान व्यक्त करण्यात आले आहे
सामाजिक कार्यकर्ते विनायक कदम हे भाजप व आमदार डॉ अतुल भोसले यांचे कट्टर समर्थक मानले जातात ते विविध सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर दिसतात त्यांचा लोकसंपर्क मोठा आहे त्यांनी कोरोनात केलेल्या कामाची नेहमीच मोठी चर्चा होत असते नुकतेच त्यांनी वार्डातील नवमतदार नोंदणीचा यशस्वि कार्यक्रम घेत पक्ष नेतृत्वाकडून वाहवा मिळवली 
त्यांनी वार्डातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त व्हावा यासाठी पालिकेत जाऊन मागच्या आठवड्यात निवेदन दिले होते त्यानंतर पालिकेने तत्काळ त्याठिकाणच्या कुत्र्यांची धरपकड करत त्यांची नसबंदि केली होती 
नुकतीच त्यांनी वार्ड क्रमांक 2 मधील रस्त्यात असणारे खड्डे बुजवण्याची मोहीम राबवली आहे त्याठिकाणी असलेल्या खड्ड्यामुळे तेथिल  लहान मुले महिला व वयस्कर लोकांना रस्त्याच्या बिकट अवस्थेमुळे व तेथील खड्यामुळे येता जाताना चांगलीच कसरत करावी लागत होती किरकोळ अपघात देखील त्याठिकाणी होत होते त्यामुळे वादविवादाला त्याठिकाणी अनेकांना तोंड द्यावे लागत होते
मात्र आज विनायक कदम यांनी त्याठिकाणी सुरू केलेल्या रस्त्यातील खड्डे बुजवण्याच्या मोहिमेमुळे तेथील रहिवाश्यानी समाधान व्यक्त केले आहे 

कराडमध्ये गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी साकारली पंचशील अभ्यासिका : शहराच्या वाचन चळवळीसाठी आणखी अभ्यासिका उभारणार - राजेंद्रसिंह यादव

वेध माझा ऑनलाइन।
येथील बुधवार पेठेत छोट्या घरांमध्ये राहणाऱ्या मुलांना अभ्यासासाठी शिवसेना नेते व यशवंत विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून नगरपालिकेच्या जागेत पंचशील अभ्यासिका बांधण्यात आली आहे. या अभ्यासिकेच्या उद्घाटनप्रसंगी बोलताना राजेंद्रसिंह यादव यांनी शहराची वाचन चळवळ वृद्धिंगत होण्यासाठी जिथे जागा मिळेल तिथे आणखी अभ्यासिका बांधण्याची घोषणा केली.

बुधवार पेठेतील नागरिक आणि पालकांनी या अभ्यासिका उभारणीबद्धल यादव यांचे कौतुक केले आहे. या अभ्यासिकेसाठी २५ लाख १७ हजार ८८४ रुपये खर्च आला आहे.
मा. नगरसेवक निशांत ढेकळे, माजी सभापती विजय वाटेगावकर, सौ. स्मिता हुलवान, विनोद भोसले, प्रीतम यादव,राहुल खराडे, राजाभाऊ डुबल,शांताराम थोरवडे, किशोर आठवले, राजकुमार लादे सर, राहुल भोसले, प्रभाकर थोरवडे, सुरेश लादे,सुरेश लादे, राहुल भोसले, विजय काटरे, गौतम लादे, मिलींद कांबळे, विजय लादे, दिलीप काटरे, योगेश लादे, प्रवीण लादे,आप्पासाहेब गायकवाड, युवा नेते संदीप पवार, शिवसेना उपजिल्हा प्रमुख सुलोचना पवार व शिवसेना शहर शाखेचे पदाधिकारी आदी मान्यवर उपस्थित होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका आणि संघटित व्हा, असा मंत्र दिला. शिक्षण हेच माणसाच्या परिवर्तनाचे प्रमुख शस्त्र आहे. गोरगरीब मुलांना शिक्षण घेताना अभ्यास करण्यासाठी पोषक वातावरण हवे असते. बुधवार पेठ दाट लोकवस्तीचा भाग आहे. येथील घरे छोटी आहेत. त्यामुळे मुलांना अभ्यासासाठी अभ्यासिका बांधली आहे. तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी कराडच्या विकासासाठी शेकडो कोटी रुपयांचा निधी दिला. यापुढेही महायुतीच्या माध्यमातून आणखी शेकडो कोटी शहराच्या विकासासाठी येतील, असे राजेंद्रसिंह यादव यांनी सांगितले.
कराड शहराच्या विकासाच्या फेज टू संकल्पने अंतर्गत अनेक विकासकामे प्रस्तावित आहेत. त्याची सुरुवात पंचशील अभ्यासिकेच्या लोकार्पणाने झाली आहे, असे यादव म्हणाले.

जनता यादव यांच्या पाठीशी ; 
राजकुमार लादे यांची ग्वाही ; 

बुधवार पेठ परिसरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक सुशोभीकरण, महात्मा फुले पुतळा सुशोभीकरण, अण्णाभाऊ साठे समाजमंदिर, पंचशील अभ्यासिका अशी अनेक विकासकामे यादव यांनी मंजूर केली आहेत. या भागातील जनता गटतट विसरून त्यांच्या पाठीशी राहिल, अशी ग्वाही राजकुमार लादे यांनी यावेळी दिली.

दरम्यान, बुधवार पेठेतील नगरपरिषद शाळा क्रमांक १० येथे ७ लाख ६९ हजार ६६४ रुपयेचे सिमेंट ब्लॉक बसवणे या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले.

Tuesday, August 5, 2025

कराड विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत भैरवनाथ पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठीच्या वाढीव खर्चास मंजुरी ; १७.१६ कोटी रुपयांच्या निधीस सरकारने दिली मान्यता ;

वेध माझा ऑनलाइन
कराड विमानतळाच्या विस्तारीकरणांतर्गत येथील भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठीच्या सुधारित वाढीव खर्चास मंजुरी मिळावी, यासाठी भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ.डॉ. अतुलबाबा भोसले गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते. त्यांच्या प्रयत्नांना यश लाभले असून, भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी रुपयांच्या सुधारीत खर्चाच्या निधीस भाजपा-महायुती सरकारने मान्यता दिली आहे. शासनाच्या या निर्णयामुळे लवकरच या पाईपलाईनचे स्थलांतर होऊन, विमानतळ विस्तारीकरण कामाला गती मिळण्यास मदत होणार आहे.

कराड हे पश्चिम महाराष्ट्रातील मध्यवर्ती ठिकाण असून, याठिकाणी दिवंगत यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकारातून विमानतळ उभा राहिले. या विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी भाजपा-महायुती सरकार विशेष प्रयत्नशील आहे. याचाच भाग म्हणून सन २०२३ मध्ये राज्याचे तत्कालीन उपमुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांच्या विशेष पुढाकारामुळे कराडच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी राज्य शासनाने २२१.५१ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला. 

पण या निधीमध्ये भैरवनाथ पाणी योजनेच्या पाईपलाईनच्या स्थलांतरासाठी २०१२ च्या शासन निर्णयात नमूद केलेली ८ कोटी ५० लाखांची तरतूद तशीच ठेवण्यात आली होती. वास्तविक या खर्चात संबंधित पाईपलाईनचे स्थलांतर शक्य नसल्याने, स्थलांतराअभावी विमानतळ विस्तारीकरण कामात अडथळा निर्माण झाला होता. त्यामुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामाला गती देण्यासाठी, भैरवनाथ पाणी योजनेच्या पाईपलाईनच्या स्थलांतरासाठी सुधारित वाढीव खर्चास मंजुरी मिळावी यासाठी आमदार डॉ. अतुलबाबा भोसले गेल्या अनेक महिन्यांपासून प्रयत्नशील होते. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन वस्तुस्थितीबाबत चर्चा केली होती. 

आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्या मागणीची दखल घेत, शासनाने भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठी १७.१६ कोटी रुपयांच्या सुधारीत खर्चाच्या निधीस प्रशासकीय व वित्तीय मान्यता दिली आहे. याबाबतचा शासन आदेश ४ ऑगस्ट रोजी सामान्य प्रशासन विभागाकडून प्रकाशित करण्यात आला आहे. 

भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजनेच्या पाईपलाईन स्थलांतरासाठी सुधारित खर्चाला मंजुरी मिळाल्यामुळे कराड विमानतळाच्या विकासाला गती मिळणार असून, पायाभूत सुविधांच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा ठरणार आहे. या निर्णयाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री ना. मुरलीधर मोहोळ, उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे, ना. अजित पवार व आ.डॉ. अतुलबाबा भोसले यांच्यासह भाजपा-महायुती सरकारचे आभार व्यक्त केले जात आहेत.

आज सहकार महर्षी स्व जयवंतराव भोसले यांची पुण्यतिथी ; कराड व वाळव्यामध्ये विविध स्थानिक कार्यक्रमांचे आयोजन ;

वेध माझा ऑनलाइन।
कृष्णाकाठच्या सहकार, आरोग्य आणि शैक्षणिक विकासाचे प्रणेते सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले (आप्पासाहेब) यांची आज १२ वी पुण्यतिथी आहे. यानिमित्त आज वाळवा व कराड तालुक्यात विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत

स्व. जयवंतराव भोसले यांनी सहकार, शिक्षण आणि आरोग्य यांना केंद्रबिंदू मानून कृष्णाकाठी विकासाचे नवे पर्व सुरू केले. कृष्णा कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी शेतकऱ्यांच्या जीवनात समृद्धी आणली. तसेच कृष्णा परिवारातील अनेकविध संस्थांच्या माध्यमातून आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन यशस्वी कारकीर्द घडवित आहेत. कृष्णा रूग्णालयाच्या माध्यमातून कराडसह संपूर्ण सातारा जिल्हा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी जिल्ह्याच्या परिसरातील रूग्णांना अद्ययावत अशा स्वरूपाच्या वैद्यकीय सुविधा उपलब्ध होत आहेत.
त्यांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी मंगळवारी (ता. ५) कराडसह वाळवा तालुक्यात ठिकठिकाणी त्यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले तसेच स्थानिक पातळीवर विविध कार्यक्रमांचे आयोजन देखील करण्यात आले आहे.