Friday, May 31, 2024

गॅस सिलेंडरच्या किमती झाल्या कमी ; जनतेला मिळाला दिलासा

वेध माझा ऑनलाइन ।
आज जून महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमती कमी झाल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक गॅस सिलिंडर तब्बल ७२ रुपयांनी स्वस्त केला आहे. त्यामुळेच हॉटेलचे जेवण आता स्वस्त होण्याची शक्यता आहे. सलग तिसऱ्या महिन्यात व्यावसायिक सिलेंडरच्या किमती कमी करण्यात आल्या आहेत. तर दुसरीकडे घरगुती गॅस सिलेंडरच्या दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. कंपन्यांनी 14.2 किलोच्या घरगुती सिलिंडरच्या किमती कायम ठेवल्या आहेत.

व्यावसायिक एलपीजी सिलिंडरचे दर सलग तिसऱ्या महिन्यात कमी करण्यात आले आहेत. यापूर्वी, एप्रिल आणि मेच्या सुरुवातीला किंमत कमी केली होती. 1 मे रोजी तेल विपणन कंपन्यांनी 19 किलोच्या व्यावसायिक सिलेंडरची किंमत 19 रुपयांनी कमी केली होती. त्यानंतर आता जून महिन्यात सुद्धा जवळपास ७० रुपयांनी स्वस्त झाल्याने जनतेला सध्याच्या महागाईच्या काळात थोडाफार तरी दिलासा मिळाला आहे

Thursday, May 30, 2024

जितेंद्र आव्हाडांच्या प्रतिमेला कराडात जोड्याने मारले ;

वेध माझा ऑनलाइन ।
महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा फाडल्याने समस्त देशवासीयांच्या भावना दुखावल्या आहेत या कारणाने कराड शहर तसेच कराड उत्तर व दक्षिण भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज कराडच्या दत्त चौकात आमदार जितेंद्र आव्हाड यांचा निषेध करण्यात आला त्यांच्या प्रतिमेला जोड्याने मारण्यात आले

यावेळी शहर अध्यक्ष एकनाथ बागडी 
महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष विक्रम पावसकर युवा मोर्चाचे सुदर्शन पाटसकर तसेच सुनील शिंदे  शंकर शेजवळकर, गणेश यादव शिवप्रतिष्ठानचे सागर आमले ,धनाजी माने भारत जत्रे प्रमोद शिंदे राजू सोनवले ,विनायक भोसले जिल्हाध्यक्ष विद्यार्थी सेना मनसे, विश्वास संकपाळ,रोहित संकपाळ,साहिल नलवडे, केदार डोईफोडे ,रंजीत थोरात, आबासाहेब सोनवणे ,मानसिंग कदम, विवेक भोसले सागर लादे काकासाहेब जाधव, राजू माने , उमेश शिंदे अमोल थोरात शंकर बेले शैलेश शेवाळे निलेश भंडारे, शेखर लोखंडे, बाळासाहेब शिंदे, शहाजी मोहिते, रणजीत थोरात सौरभ शहा, वर्षा सोनवणे, स्वाती पिसाळ, राजश्री कारंडे, भरत देसाई, किसन चौगुले, गणेश कापसे, विशाल कुलकर्णी, दिलीप जाधव, ओंकार ढेरे, सागर माने,दिगंबर वास्के, अंकुश लोहार, गणेश भोसले उपशहर प्रमुख शिवसेना,तसेच महायुतीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. 

Wednesday, May 29, 2024

राजेंद्रसिंह यादव यांच्या आंदोलनाला यश ; मुख्याधिकाऱ्यांची तातडीने कारवाई ; भ्रष्टाचाराविरोधात लढा चालूच ठेवणार ; राजेंद्रसिह यादव ;


वेध माझा ऑनलाईन।
कराड येथील नगरपालिकेतील नगररचना विभागातील पाच अधिकाऱयांकडून मोठा भ्रष्टाचार होत असून नागरिकांना त्रास दिला जात आहे. त्यामुळे त्यांच्या बदल्या करण्यात याव्यात, या मागणीसाठी नगरपालिकेला टाळे ठोकण्याचा इशारा यशवंत विकास आघाडोचे नेते राजेंद्रसिंह यादव यांनी दिला होता. या आंदोलनाची दखल घेत मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी नगररचना विभागातील दोघांना कार्यमुक्त (बडतर्फ) केले. एकाची बदली केली. तर राजपत्रित दोन अधिकाऱयांबाबत तक्रारोचे निवेदन साहाय्यक संचालक नगररचना सातारा यांना पाठवले आहे. हे दोन्ही अधिकारी वैद्यकीय रजेवर गेले आहेत.

बुधवारी सायंकाळी 4 वाजेपर्यंत या अधिकाऱ्यांच्या बदल्या करा अन्यथा पालिकेला टाळे ठोकून या अधिकाऱ्यांची गाढवावरून धिंड काढणार असल्याचा इशारा यादव यांनी दिला होता. दुपारी यादव हे समर्थकांसह पालिकेत दाखल झाले. गाढवही आणण्यात आले होते. त्यामुळे पालिकेत खळबळ उडाली होती. पोलीसही दाखल झाले होते. राजेंद्रसिंह यादव, हणमंत पवार, किरण पाटील, सुधीर एकांडे, गजेंद्र कांबळे, ढेकळे, विनोद भोसले यांच्यासह कार्यकर्ते मोठय़ा संख्येने उपस्थित होते.मुख्याधिकारी शंकर खंदारे यांनी यादव यांना चर्चेसाठी बोलावल्याने सर्वजण मुख्याधिकाऱ्यांच्या दालनात गेले.मुख्याधिकारी खंदारे यांनी यादव यांनी दिलेल्या निवेदनाप्रमाणे आपल्या अधिकारात असणारी कारवाई केली आहे असे सांगितले. कारवाईची माहिती दिली. त्यानंतर राजेंद्रसिंह यादव यांनी पत्रकारांना याबाबतची माहिती दिली.  
स्वानंद शिरगुप्पे व श्री पवार यांच्यावर कारवाई करण्याचे अधिकार मुख्याधिकाऱयांकडे नाहीत. त्यांयाबाबत तक्रारोंचे निवेदन नगररचना सातारा विभागाकडे पुढील कारवाईसाठी त्यांनी पाठवले आहे.  प्रधानमंत्री शहरी आवास योजनेंतर्गत तात्पुरती नियुक्ती असणारे रणजित वाडकर व शहरस्तरीय तांत्रिक तज्ञ निलेश तडाखे यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे आदेश मुख्याधिकाऱयांनी दिले. दोन्ही अधिकाऱ्यांना कामकाजाबाबत तोंडी सुचना दिल्या होत्या. तरीही आपल्या वर्तनात बदल झाला नाही. आपणाबाबत यशवंत विकास आघाडीने तक्रार दाखल केली आहे. त्यामुळे दोघांनाही तात्पुरत्या सेवा कामातून कार्यमुक्त करण्यात येत आहे, असे आदेश मुख्याधिकाऱयांनी बजावून ते पत्र यादव यांना दिले. तर नगरपालिका आस्थापनेवरील वामन संतोष शिंदे यांची बांधकाम विभागातून यशवंतराव चव्हाण स्मृतिसदनमध्ये बदली करण्यात आली. राजपत्रित दोन्ही अधिकारी अगोदरच वैद्यकीय रजेवर गेले आहेत, अशी माहिती मुख्याधिकारी खंदारे यांनी दिल्याची माहिती यादव यांनी पत्रकारांना दिली. 
पालकमंत्री शंभूराज देसाई यांना निवेदन दिले होते. त्यांनी याबाबत जिल्हाधिकाऱयांना सूचना दिल्या आहेत. त्यामुळे या दोन राजपत्रित अधिकाऱ्यांची चौकशी होऊन 4 जूननंतर त्यांच्यावर कारवाई होणार आहे. पालिकेतील अन्य विभागांबाबतही तक्रार असून पालिकेची खातेनिहाय चौकशी व लेखापरीक्षण करण्याची मागणी पालकमंत्री व मुख्यमंत्र्यांकडे केली आहे असेही त्यांनी सांगितले

लढा सुरूच राहिल...
आम्ही केलेल्या मागण्यांवर तातडीने कारवाई झाल्याने टाळे ठोकन्याबाबतचे आंदोलन स्थगित केले आहे. मात्र लढा थांबणार नाही. जोपर्यंत पालिकेला लागलेली भ्रष्टाचाराची किड थांबत नाही, तोपर्यंत लढा देत राहणार असल्याचा इशारा राजेंद्रसिंह यादव यांनी दिला.

मुख्याधिकाऱ्यांची आडगी भूमिका 
या सर्व विषयाबाबत पत्रकारांनी कराडचे मुख्याधिकारी शंकर खंदारे यांना विचारले असता मला माध्यमांशी बोलायचे नाही माझ्या अधिकारात जेवढे आहे तेवढी कारवाई मी केली आहे असे सांगत त्यांनी अधिक बोलणे टाळले

Tuesday, May 28, 2024

शिवशंकर नागरी पतसंस्थेतील तेरा कोटीच्या अपहारप्रकरणी दोघांना अटक ; 5 दिवसांची पोलीस कोठडी ;

वेध माझा ऑनलाइन।
येथील शिवशंकर नागरी पतसंस्थेतील तेरा कोटीच्या अपहारप्रकरणी दोघांना ताब्यात घेवून अटक करण्यात आले. कºहाड शहर पोलिसांनी ही कारवाई केली. दोघांनाही न्यायालयात हजर केले असता त्यांना पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.


शरद गौरीहर मुंढेकर व सुनील आनंदा काशिद (रा. हवेलवाडी-सवादे, ता. कºहाड) अशी पोलिसांनी अटक केलेल्यांची नावे आहेत. विशेष लेखा परिक्षक धनंजय गाडे यांनी गत महिन्यात याबाबतची फिर्याद पोलिसात दिली आहे. पोलिसांनी सांगीतले की, शिवशंकर पतसंस्थेत १ एप्रिल २०२१ ते ३१ मार्च २०२३ अखेरचे वैधानिक लेखा परिक्षण झाले. त्या अहवालानुसार पतसंस्थेत पतसंस्थेत १३ कोटी ९ लाख ९६ हजार रुपयांचा अपहार झाल्याचा ठपका आहे.
याप्रकरणी शरद मुंढेकर, शंकर स्वामी, महादेव बसरगी, दिपक कोरडे, उमेश मुंढेकर, सतिश बेडके, मिलींद लखापती, मनोज दुर्गवडे, वृषाली मुंढेकर, सिंधू जुगे, शंकर घेवारी, सर्जेराव लोकरे, वसंत काळे, श्रीकांत आलेकरी, शिवाजी पिसाळ, महेश शिंदे, प्रेमलता बेंद्रे, महालिंग मुंढेकर, तात्यासासाहेब विभूते, शिवाजी मानकर, चंद्रकांत दुर्गवडे आदी संचालकांसह व्यवस्थापक रविंद्र स्वामी, कर्मचारी नितीन चिंचकर (रा. कालवडे), संग्राम स्वामी, सुभाष बेंद्रे (रा. रविवार पेठ, कºहाड), ज्ञानेश्वरी बारटक्के (रा. रविवार पेठ, कºहाड), दत्तात्रय शिंदे (रा. कोडोली) व सुनिल काशिद (हवेलवाडी-सवादे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी शरद मुंढेकर व सुनील काशिद यांना अटक करण्यात आले आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कड तपास करीत आहेत.

इंस्टाग्रामवर झाली ओळख ; त्यांनतर संबंधित युवतीवर केला अत्याचार ; युवती सांगली जिल्ह्यातील, तर युवक कराडचा ; पोलिसांनी दिली माहिती;

वेध माझा ऑनलाइन। विवाहाचे आमिष दाखवून सांगली जिल्ह्यातील युवतीवर अत्याचार केल्याप्रकरणी कराडातील युवकावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मानस भास्कर देसाई (रा, कराड) असे गुन्हा दाखल झालेल्या युवकाचे नाव आहे. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 
या युवतीची कराड शहरातील मानस देसाई या युवकाशी इंस्टाग्रामवर ओळख झाली. फेब्रुवारी २०२२ पासून मानस देसाई हा संबंधित युवतीला भेटत होता. त्याने तिला विवाह करणार असल्याचे अमिष दाखवले होते त्याने संबंधित युवतीला वेळोवेळी कराडात बोलावून ठिकठिकाणी तिच्यावर अत्याचार केला. या कालावधीत युवतीने त्याच्याकडे लग्नाबाबत विचारणा केली असता त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, नंतर मानस देसाई याने तिला शिवीगाळ दमदाटी करीत ठार मारण्याची धमकी दिली पीडित युवतीने याबाबतची फिर्याद कराड शहर पोलीस ठाण्यात दिली आहे. 

...अन्यथा उद्याच पालिकेला टाळेठोक आंदोलन करणार; त्या अधिकाऱ्यांना काळे फासणार... ; राजेंद्रसिंह यादव यांचा पत्रकार परिषदेत इशारा ;

वेध माझा ऑनलाइन।
कराड नगरपरिषदेतील लोकनियुक्त बॉडीची मुदत सव्वादोन वर्षापुर्वी संपली आहे तेव्हापासून त्याठिकाणी प्रशासक कार्यरत आहे या प्रशासनावर अंकुश नसल्याचे चित्र असल्याने याठिकाणी मनमानी कारभार सुरू आहे प्रशासनातील अधिकाऱ्यांची बेदरकार वृती वाढीस लागली आहे वेळेत लोकांची कामे न होणे लोकांकडून पैशाची मागणी होणे अशा वृत्तीने या अधिकाऱ्यांकडून काम सुरू आहे त्यामुळे कराडकर त्रस्त झाले आहेत या संबंधित अधिकाऱ्यांची उद्या दुपारी 4 वाजेपर्यंत जर बदली झाली नाही... तर... कराड पालिकेला टाळे ठोक आंदोलन करणार... तसेच संबंधित अधिकाऱ्यांना काळे फासणार असल्याचा इशारा यशवन्त विकास आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांनी आज आयोजित पत्रकार परिषदेतून दिला.यावेळी आघाडीचे नगरसेवक उपस्थित होते

यादव म्हणाले... कराडकर नागरिकांना या सगळ्या कारभाराचा त्रास होत आहे त्यामुळे आम्ही ही आक्रमक भूमिका घेतली आहे राज्याचे मुख्यमंत्री जिल्ह्याचे पालकमंत्री तसेच जिल्हाधिकारी यांना या कारभाराबाबत सखोल माहीती देणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले यावेळी आघाडीचे अध्यक्ष राजेंद्रसिह यादव यांनी आपल्याकडे प्रशासनाच्या या गलथान कारभाराचे पुरावे असल्याचे सांगूनकराड नगरपरिषदेच्या एकूणच सर्व खात्याची खातेनिहाय सखोल चौकशी करण्याची मागणी देखील यावेळी यादव यांनी केली 

एकूणच या पत्रकार परिषदेत राजेंद्रसिह यादव यांनी कराड पालिकेच्या अधिकाऱ्यांचा चालू असलेला मुजोरपणा आणि भ्रष्टाचाराची चांगलीच पोलखोल केली खरी...मात्र जाता जाता या सगळ्या कारभारामागचा बोलावता धनी कोण आहे... असा सवाल त्यांनी यावेळी बोलता बोलता केल्याने सर्व उपस्थितांच्या भुवया उंचावल्या... आणि... या अधिकाऱ्यांचा करता- करवीता धनी कोण असावा... ... अशी आता चर्चा सुरू झाली आहे...

शंभूराज देसाई यांचा हस्तक्षेप योग्यच...
दरम्यान, पालकमंत्री ना शंभूराज देसाई हे कराड पालिकेच्या कारभारात हस्तक्षेप करतात असा आरोप यापूर्वी झाला होता त्याचे उत्तर देताना श्री यादव म्हणाले...पालकमंत्री म्हणून त्यांचा तो अधिकार आहे... ना शंभूराज देसाई यांचा कराड पालिकेतील हस्तक्षेप कराडच्या विकासासाठी होत आहे... पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी शहराला भरभरून निधी देत इथल्या विकासासाठी केलेला हस्तक्षेप योग्यच आहे  

Friday, May 24, 2024

दहावीच्या निकालाबद्दल बोर्डाकडून मोठा निर्णय,काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन।
गेल्या कित्येक दिवसांपासून विद्यार्थी हे दहावीच्या निकालाची आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. निकाल कधी लागणार याबद्दल सातत्याने विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जातंय. यंदा 16 लाख 9 हजार 444 विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिलीये. जवळपास सर्वच बोर्डांचे निकाल लागले आहेत.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून पत्रकार परिषद घेण्यात आली. त्यावेळी बोर्डाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी स्पष्ट केले की, यंदा दहावीचा निकाल एक तास अगोदर जाहीर होणार आहे. म्हणजेच आता दहावीचा निकाल एक तास अगोदर विद्यार्थ्यांना मिळणार आहे.

27 मे 2024 रोजी दहावीचा निकाल लागणार असल्याचे सांगितले जातंय. हेच नाही तर महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनी देखील याला दुजोरा दिला. मात्र, अजून तरीही बोर्डाकडून निकालाची तारीख जाहीर करण्यात नाही आली. 27 मे 2024 लाच दहावीचा निकाल सांगितले जात आहे.विशेष म्हणजे यंदाच्या बारावीच्या परीक्षेत मुलींनीच बाजी मारली. निकालाच्या टक्केवारीमध्ये कोकण विभाग अव्वल ठरला तर सर्वाधिक कमी निकाल हा मुंबई विभागाचा लागला. मुलींच्या टक्क्यात देखील मोठी वाढ झाली. 


आदित्य ठाकरे मंत्री बनू शकतात तर मग आमचे अमित ठाकरे का नाही? आदित्य ठाकरे यांनी मंत्री बनल्या नंतर उद्धव ठाकरे यांचं नाव खराब केलं -नितेश राणेंची सडकून टीका:

वेध माझा ऑनलाइन ।
आदित्य ठाकरे मंत्री बनू शकतो तर मग आमचे अमित ठाकरे मंत्री का बनू शकत नाही? असा उपरोधिक सवाल करत भाजप नेते नितेश राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. आदित्य ठाकरे यांनी मंत्री बनल्या नंतर उद्धव ठाकरे यांचं नाव खराब केलं. ठाकरेंचं नाव रसातळाला घेऊन गेलेत, असे म्हणत नितेश राणे आदित्य ठाकरे यांच्यावर सडकून टीका केली. तर आदित्य ठाकरे याच्यापेक्षा अमित ठाकरे हे चांगले काम करतील, असं वक्तव्य करत नितेश राणेंनी विश्वास व्यक्त केला. इतकंच नाहीतर येणाऱ्या ऑक्टोबर महिन्यात आम्ही अमित ठाकरे यांची वाट पाहतोय, असं म्हणत नितेश राणे यांनी सूचक वक्तव्य केले. दरम्यान, नितेश राणे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच चर्चा सुरू झाली आहे.

विधानपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला : वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन ।
महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकांचा जल्लोष संपल्यानंतर आता विधानपरिषद निवडणुकांचा बिगुल वाजला आहे. लोकसभा निवडणुकांचा निकाल 4 जून रोजी लागणार आहे. त्यानंतर, विधानपरिषदेच्या निवडणुका होणार आहेत. विधानपरिषदेच्या 4 जागांसाठीच्या निवडणूक कार्यक्रमाची नव्याने घोषणा करण्यात आली आहे. दोन शिक्षक तर दोन पदवीधर मतदार संघासाठी ही निवडणूक होत आहे. मुंबई आणि कोकण पदवीधर मतदार संघ, तर नाशिक आणि मुंबई शिक्षक मतदार संघात ही निवडणूक होणार आहे. या निवडणुकांसाठी 10 जून ही तारीख जाहीर करण्यात आली होती. मात्र, आता विधानपरिषद निवडणुकांची तारीख बदलण्यात आली आहे. नव्या वेळापत्रकानुसार पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकांसाठी 26 जून रोजी मतदान होणार आहे. 

राज्यातील लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिक्षक व पदवीधर मतदारसंघाची निवडणूक पुढे ढकलण्यात आली होती. आता, या निवडणुकीसाठी नव्याने कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. त्यामध्ये, 2 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांचा समावेश आहे. मुंबई पदवीधर मतदार संघातून संजय पोतनीस तर कोकण पदवीधर मतदार संघातून निरंजन डावखरे यांची मुदत 7 जुलै रोजी संपत आहे. तसेच, मुंबई शिक्षक मतदार संघातून कपिल पाटील आणि नाशिक शिक्षक मतदार संघातून किशोर दराडे यांचीही मुदत संपत आहे. त्यामुळे, येथील 4 जागांसाठी निवडणूक आयोगाकडून विधानपरिषद निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. दरम्यान, लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी संपल्यानंतर लगेचच चारही विधान परिषदेच्या जागांसाठी मतदान होणार होते. यापूर्वी मतदानाची तारीख 10 जून निश्चित झाली होती. मात्र, आता नवीन कार्यक्रमानुसार ह्या निवडणुकात 26 जून रोजी होणार असून 1 जुलै रोजी मतमोजणी होत आहे. 


Thursday, May 23, 2024

पुणे अपघात प्रकरणी सुप्रिया सुळे गप्प का?अग्रवाल कुटुंबाशी संबंध असल्याचा भाजप नेत्याचा आरोप

वेध माझा ऑनलाइन।
पुण्यातील कोरेगाव पार्कमधील कल्याणी नगर येथे हिट अँड रनचा जो प्रकार घडला, त्यावरून महाराष्ट्रातील राजकारण चांगलंच रंगलं आहे. अशातच पुण्यातील अपघाताच्या या प्रकरणावरून भाजप नेते आणि आमदार नितेश राणे यांनी सुप्रिया सुळे यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केल्याचे पाहायला मिळाले.

 पुण्यातील अपघात प्रकरणावर नितेश राणेंनी सुप्रिया सुळेंवर प्रश्नांची सरबत्ती करत जोरदार हल्लाबोल केल्याचे पाहायला मिळत आहे. नितेश राणे म्हणाले, ‘नेहमी बोलणाऱ्या सुप्रिया सुळे ताई गप्प का आहेत? शरद पवार गटातून याबद्दल काहीच प्रतिक्रिया का व्यक्त होत नाही ? प्रत्येक गोष्टीवर देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणाऱ्या सुप्रिया सुळे या पुण्याच्या घटनेवर मात्र गप्प का? सुप्रिया सुळे यांचा या घटनेतील कुटुंबाशी संबंध होते का? त्यांना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे का? कारण आरोपीला जो वकील देण्यात आला आहे, तो पवार साहेबांच्या अतिशय निकटवर्तीय असल्याचे कळतंय’, असं वक्तव्य करत नितेश राणेंनी गंभीर आरोप केला आहे

राष्ट्रवादीतील फुटीवेळी नेमंक काय झालं होतं, शरद पवारांनी सगळंच सांगून टाकल ;

वेध माझा ऑनलाइन।
राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर पक्षात उभी फूट पडली. त्यानंतर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी जडल्या. त्यावेळी अजित पवार आणि त्यांच्यासोबत शरद पवारांची साथ सोडून गेलेल्या राष्ट्रवादीच्या सर्व महत्त्वाच्या नेत्यांनी पवारांनीच भाजपसोबत  जाण्याचं ठरवलं होतं. पण ऐनवेळी माघार घेतली, असा दावा केला आहे. यावर आता शरद पवार यांनी थेट भाष्य केलं आहे. आमच्या सर्वांचं गेली अनेक वर्ष भाजपसोबत जाण्याचं मत होतं, पण या मतातही दोन वेगवेगळी मतं होती, असं शरद पवार म्हणाले आहेत. तसेच, यावेळी बोलताना शरद पवारांनी राष्ट्रवादीतील फुटीवेळी नेमंकी काय झालं होतं, यावरही भाष्य केलं आहे. 

राष्ट्रवादीनं भाजपसोबत जाण्याचा प्रयत्न यापूर्वी किती वेळा केलाय? अनेकदा चर्चा होऊनदेखील भाजपसोबत थेट जाण्याचा मार्ग का नाही निवडला? यावर बोलताना शरद पवारांनी सांगितलं की, "आमच्या सर्वांचं गेली अनेक वर्ष असं मत होतं की, आपण सर्वांनी भाजपसोबत जावं. यात दोन पद्धती होत्या, एक त्यांच्यासोबत आणि एक पार्टनर म्हणून. त्यासोबत काही लोकांचं म्हणणं होतं की, त्या पक्षातच जावं... आता यातच प्रफुल्ल पटेल यांचा खुलासा आलाय. 2004 मध्ये त्यांचा आग्रह होता, त्यांचं प्रामाणिक मत होतं, वाजपेयी सरकारसोबत आपण जावं. पण मी ते मान्य नाही केलं. माझ्या मताप्रमाणेच त्यांचंही मत होतं, पण शेवटी त्यांनी माझ्या मताचा सन्मान ठेवला."


राष्ट्रवादीतील फुटीवेळी नेमकं काय घडलं? 
"सुदैवानं सरकार आमचं सरकार आलं, प्रफुल्ल पटेल यांनी 10 वर्ष मंत्रीपद भूषवलं. पण अलिकडच्या काळात जे काही आमचे लोक निवडून आले. त्यातील मोठा वर्ग असं म्हणत होता की, आपण भाजपसोबत जावं. शेवटी मी एकदा त्यांना म्हटलं की, तुम्हाला चर्चा करायची असेल तर करा, काय म्हणतात, काय प्रस्ताव आहे ते तर कळु द्यात. त्यानंतर त्यांची चर्चा झाली, पण त्यावेळी मी सांगितलं की, हा प्रस्ताव मला योग्य वाटत नाही. ज्यांना निर्णय घ्यायचा असेल तर त्यांना स्वातंत्र्य आहे, मी येणार नाही. एक काळ असा आला की, त्यांनी निर्णय घेतला, माझी काही तक्रार नाही, त्यांनी मला फसवून निर्णय घेतलेला नाही. यापूर्वी त्यांनी अनेकदा माझ्याशी चर्चा केलेली. त्यानंतर माझी भूमिका मी मांडल्यावर ते आपला निर्णय घ्यायला मोकळे झाले.", असं शरद पवार म्हणाले आहेत. 
दरम्यान,  महाराष्ट्रातल्या सर्व टप्प्यातलं मतदान नुकतचं पार पडलंय. या निवडणुकीत प्रचारामध्ये कोणते मुद्दे चर्चेत आले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, निवडणुकीचं वातावरण या आणि अशा अनेक मुद्यांवर पत्रकार प्रशांत कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं.

एक कोटीची लाच मागणारा पोलीस निरीक्षक अखेर पोलिसांना आला शरण - कुठे घडला प्रकार ; काय आहे बातमी ...?

वेध माझा ऑनलाईन।
बीड पोलीस दलातील एक कोटीची लाच मागणारा पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे अखेर शरण आला आहे. आर्थिक गुन्हे शाखेत कार्यरत असलेला हरिभाऊ खाडे याच्या घरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला (एसीबी) घबाड मिळून आले. एसीबीला एक कोटी आठ लाख ७६ हजार रुपये रोख, ७२ लाखांचे सोन्याची बिस्किटे आणि सोने, चार लाखांची साडे पाच किलो चांदी मिळून आली आहे. 15 मे रोजी एक कोटीच्या लाचेतून पाच लाख घेताना एका खासगी व्यक्तीला लाचलुचपत विभागाने अटक केली होती. त्यानंतर हरिभाऊ खाडेचा सोध घेत होते. अखेर खाडे एसीबी पोलिसांना शरण आले आहे.

काय होते प्रकरण
जिजाऊ मल्टिस्टेट पथसंस्थेच्या गुन्ह्यात आरोपी न करण्यासाठी एक कोटीची लाच हरिभाऊ खाडे याने मागितली होती. या प्रकरणी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे याच्यासह दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या कारवाईनंतर पोलीस निरीक्षक हरिभाऊ खाडे, फौजदार आर. बी. जाधवर हे फरार झाले. त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांचे तीन पथके नेमली होती.

एसीबी समोर शरण
लाचखोर फरार पोलीस निरिक्षक हरिभाऊ खाडे एसीबी समोर शरण आला आहे. खाडेला पकडण्यासाठी पोलिसांचे तीन पथक फिरत होते. आता चौकशीतून खाडेने जमवलेली अपसंपदा समोर येणार आहे.

अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देऊन चूक केली विशाल अग्रवाल यांची पोलिसांसमोर कबुली ; पुणे अपघात प्रकरण ;

वेध माझा ऑनलाइन।
विशाल अग्रवाल यांचा अल्पवयीन मुलगा वेदांतने शनिवारी मध्यरात्री दारूच्या नशेत भरधाव वेगाने कार चालवत एका बाईकला धडक दिली. या अपघातात बाईकवरील अनिश अवधिया आणि अश्विनी कोस्था यांचा जागीच मृत्यू झाला. या अपघात प्रकरणानंतर वेदांतला अटक करण्यात आली तर घडलेला प्रकार माहित होताच फरार झालेल्या वेदांतचे वडील अर्थात विशाल अग्रवालला मंगळवारी छत्रपती संभाजीनगर येथून अटक करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. 

दरम्यान, अल्पवयीन मुलाच्या हातात गाडी देऊन चूक केली अशी कबुली विशाल अग्रवाल याने पोलिसांसमोर दिली आहे. दरम्यान, पुणे अपघात प्रकरणी विशाल अग्रवाल याच्यासह तिघांना सत्र न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. त्यामुळे येत्या २४ मे पर्यंत विशाल अग्रवाल, जितेश शेवनी, जयेश बोनकर याला तीन दिवस कोठडी सुनावली. तर पोलिसांच्या चौकशी दरम्यान विशाल अग्रवालने कबुली देताना अल्पवयीन मुलाला गाडी देऊन चूक केल्याचं म्हटलं आणि झालेल्या प्रकाराबाबत विशाल अग्रवाल याने खंतही व्यक्त केली.

काँग्रेसच्या स्नेहभोजनाला बंडखोर उमेदवार विशाल पाटील उपस्थित ; सांगलीच्या निवडणुकीत ठाकरेंचा गेम झाल्याचे स्पष्ट?

वेध माझा ऑनलाइन ।
लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यानंतर राज्यातील राजकीय प्रचार संपलेला आहे. आता सर्वच उमेदवारांना ४ जूनच्या निकालाची प्रतिक्षा लागली आहे. या निवडणुकीत सर्वाधिक चर्चा असलेल्या सांगली लोकसभा मतदारसंघात कोण बाजी मारणार अशी चर्चा आहे. त्यातच निवडणुकीनंतर इथल्या काँग्रेस पक्षाने कार्यकर्त्यांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन केले होते मात्र या स्नेहभोजनाला बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी लावलेल्या हजेरीनं सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. काँग्रेस कार्यकर्त्यांच्या स्नेहभोजनास विशाल पाटलांच्या हजेरीनं ठाकरे गटही संतापला आहे. त्यामुळे आयोजक आणि विशाल पाटील यांच्यावर काँग्रेसनं कारवाई करावी अशी मागणी ठाकरे गटानं केली आहे.

ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख संजय विभुते म्हणाले की, काँग्रेस जिल्हाध्यक्षाने घेतलेलं स्नेहभोजन आणि त्याला बंडखोर उमेदवार विशाल पाटील यांनी लावलेली हजेरी हा अधिकृत गद्दारी केल्याचा पुरावा आहे म्हणून काँग्रेस जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील यांची हकालपट्टी करावी अशी मागणी आमची काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे आहे. विशाल पाटील यांचीही हकालपट्टी काँग्रेसनं केली नाही. याचा अर्थ गल्लीपासून दिल्लीपर्यंतची सर्व काँग्रेस ही विशाल पाटलांसोबत उभी होती हे आहे का असा सवालही ठाकरे गटाने केला.
 सांगलीत काँग्रेस कधीच उबाठा गटासोबत नव्हती. उबाठाशी त्यांचा संबंध नव्हता. त्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशाल पाटलांचे काम केले. हे सर्व सांगलीकरांना माहिती आहे. त्यामुळे उबाठा गटानं काय मागणी केली त्याकडे काँग्रेस लक्ष देणार नाही. स्नेहभोजनासाठी एकत्रित आलेल्या सर्वांनी ठरवूनच विशाल पाटलांचे काम केले होते. काँग्रेस उबाठासोबत नव्हतीच असा टोला शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी लगावला आहे. 

लोकसभा निवडणुकीत सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यात रस्सीखेच होती. कोल्हापूरच्या बदल्यात सांगलीचा जागा आम्हाला द्यावी अशी मागणी करत उद्धव ठाकरेंनी कुणालाही विचारत न घेता याठिकाणी चंद्रहार पाटलांना उमेदवारी जाहीर केली. मात्र या उमेदवारीला स्थानिक काँग्रेस आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विरोध केला. शेवटपर्यंत ही जागा काँग्रेसला मिळावी यासाठी आमदार विश्वजित कदम यांच्यासह स्थानिक नेते आग्रही होते. मात्र ठाकरेंनी उमेदवार मागे घेणार नाही अशी ठाम भूमिका घेतली. तेव्हा इथले काँग्रेसचे इच्छुक विशाल पाटील यांनी बंडखोरी करत अपक्ष निवडणूक लढवली. त्यात काँग्रेस कार्यकर्त्यांनी विशाल पाटील यांचे काम केल्याचं सांगलीत उघडपणे बोलले जाते.

जर मोदींना २७२ आकडा गाठता आला नाही तर मोदींना पाठिंबा देणार का? काय म्हणाले शरद पवार ?

वेध माझा ऑनलाइन ।
लोकसभा निवडणूक २०२४ साठी आत्तापर्यंत ५ टप्प्यातील मतदान प्रक्रिया पार पडली आहे. यंदा पुन्हा एकदा देशात मोदी सरकार येणार असा दावा भाजपकडून केला जातोय तर दुसरीकडे देशात इंडिया आघाडीचे सरकार येईल असा दावा विरोधी पक्षातील नेतेमंडळी करत आहेत. अनेक राजकीय विश्लेषक भाजपला २८० ते ३०० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करत आहेत. अशातच जर मोदींना २७२ ची मॅजिक फिगर गाठता आली नाही तर महाराष्ट्रातून शरद पवार  किंवा उद्धव ठाकरे मोदींना  पाठिंबा देतील का? अशाही चर्चा रंगू लागल्या आहेत. मात्र आता खुद्द शरद पवारांनीच हि गोष्ट फेटाळून लावली आहे.

ज्येष्ठ पत्रकार प्रशांत कदम यांनी शरद पवार यांची विशेष मुलाखत घेतली. यामध्ये त्यांनी शरद पवारांना थेट प्रश्न केला कि समजा यंदाच्या निवडणुकीत 272 पेक्षा कमी भाजपच्या जागा आल्या आणि तुम्हाला त्यांनी साद घातली तरी तुमचा पक्ष त्यांच्यासोबत जाणार का? यावर उत्तर देताना पवारांनी स्पष्टपणे नाही असं उत्तर दिले. भाजपचे धोरण आम्हाला मान्य नाही. त्यामुळे आम्ही भाजपसोबत जाणार नाही.. आमचे व्यक्तिगत संबंध चांगले राहतील, मी अजून राज्यसभेत आहे, त्याठिकाणी मोदींची भेट झाली तर आम्ही बोलणार नाही असं नाही .. मात्र उद्या संसदेत मी त्यांच्या बाजूने हात वर करणार नाही असं पवारांनी स्पष्ट केलं. तसेच कोणत्याही परिस्थितीत आपला पक्ष भाजपला साथ देणार नाही हे पुन्हा एकदा अधोरेखित केलं.

बारामतीत विजयाची खात्री आहे का? काय म्हणाले शरद पवार ?

वेध माझा ऑनलाईन ।
महाराष्ट्रात शिवसेनेतील बंडाळी आणि राष्ट्रवादीत पडलेली उभी फूट यामुळे संपूर्ण देशाचं लक्ष महाराष्ट्राच्या लोकसभा निवडणूक निकालांकडे लागलं आहे. अशातच निवडणुकीच्या घोषणेपूर्वीपासूनच महाराष्ट्रातील एका मतदारसंघाची जबरदस्त चर्चा रंगलेली. तो म्हणजे, बारामती मतदारसंघ बारामती म्हणजे, पवार आणि पवार म्हणजेच, बारामती, हे समीकरण जणू दृढ झालेलं. पण यंदा याच निवडणुकीत पवार विरुद्ध पवार रंगलेल्या सामन्यामुळे संपूर्ण देशाच्या नजरा बारामतीकडे वळल्यात. अशातच शरद पवारांनी बारामती लोकसभा निकालांबाबत मोठं वक्तव्य केलं आहे. 

महाराष्ट्रातल्या सर्व टप्प्यातलं मतदान नुकतचं पार पडलंय. या निवडणुकीत प्रचारामध्ये कोणते मुद्दे चर्चेत आले. महायुती आणि महाविकास आघाडी यांच्यातील आरोप-प्रत्यारोप, निवडणुकीचं वातावरण या आणि अशा अनेक मुद्यांवर पत्रकार प्रशांत कदम यांनी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीत बोलताना शरद पवारांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केलं आहे. 

काय म्हणाले शरद पवार? 
बारामतीत विजयाची खात्री आहे का? याबाबत बोलताना शरद पवार म्हणाले की, "बारामतीत विजयाची खात्री असायला हरकत नाही. यापूर्वी बारामतीत निवडणुकीत पैशाचा वापर कधीच व्हायचा नाही, पण या निवडणुकीत पैशाचा वापर झाला, असं लोक सांगतात पण त्याचा परिणाम किती होईल हे आज सांगता येणार नाही

Tuesday, May 21, 2024

कराडच्या यशवंत बँकेच्या चौकशीचे आदेश: ...आणखी दोन बँकांसह 39 जणांची चौकशी होणार ... माझ्या आधार कार्ड, पॅन कार्डचा गैरवापर केला गेला... माझ्या खोट्या सह्या केल्या ; तक्रारदार गणेश पवार यांचा पत्रकार परिषदेत गंभीर आरोप ;

वेध माझा ऑनलाईन।
बनावट जामीन प्रकरणी यशवंत को.ऑप बँक लि.फलटण शाखा चावडीचौक कराड, दि चिखली अर्बन को.ऑप बँक लि.चिखली, यवतमाळ अर्बन को.ऑप बँक लि.यवतमाळ या तीन बँकेच्या संचालक, चेअरमन व मुख्य कार्यकारी अधिकारी अशा 39 जणांच्या चौकशीचे आदेश येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले असून या संपूर्ण प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू असल्याची माहिती ॲड.एन.पी.जाधव यांनी दिली.
दरम्यान माझे कराडच्या यशवन्त बँकेत खाते होते... त्याठिकाणी असणाऱ्या माझ्या इनोसीचा, आधार कार्ड, पॅन कार्डचा गैरवापर केला गेला... तसेच माझ्या खोट्या सह्या केल्या गेल्या... असा गंभीर आरोप तक्रारदार गणेश पवार यांनी यावेळी केला कराड येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते (मंगळवारी) बोलत होते. 

यावेळी बोलताना ॲड.एन.पी. जाधव म्हणाले,  कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यु.एल.जोशी यांच्या दिनांक 30 एप्रिल 2024 रोजी आदेशामुळे या तीन बँकांच्या बनावट कर्ज प्रकरणी 39 जणांच्या चौकशीचे आदेश पोलीसांना प्राप्त झाले. रविवार पेठ, कराड येथील रहिवाशी गणेश शिवाजी पवार यांच्या बनावट व खोट्या सह्या मारुन 8 कोटी 55 लाख रुपयांचे कर्ज बनावट कंपनी स्थापन करुन 3 बँकांचे कर्ज चार आरोपींनी बोगस कंपनीव्दारे मिळवले होते. या प्रकरणी फिर्यादी गणेश पवार यांची प्राथमिक फिर्याद कराड येथील मे. प्रथम वर्ग न्या.एम.व्ही भागवत यांच्या कोर्टात दिनांक 19 मे 2023 रोजी दाखल केली होती. त्यावर कोर्टाने चौकशीचे आदेश सी.आर.पी.सी 156 (3) अन्वये दिले होते. त्यावर यशवंत को. ऑफ बैंक लि.फलटणचे चेअरमन शेखर सुरेश चरेगांवकर यांनी कराड येथील जिल्हा व सत्र न्यायाधीश यांच्याकडे क्रिमीनल रिव्हीजन अर्ज नं.8/2023 असा दाखल केला होता. त्यामध्ये फिर्यादी गणेश पवार यांच्यावतीने ॲड.निलेश जाधव यांनी काम पाहिले. फिर्यादी यांनी दाखल केलेली कागदपत्रे व पुरावे इत्यादीचे अवलोकन करुन जिल्हा व संत्र न्यायालयाने खालील कोर्टाचा आदेश कायम केला आहे. या प्रकरणी पोलीसांनी सुमारे 39 जणांच्या विरोधात प्राथमिक फिर्याद दाखल केली आहे.
फिर्यादी गणेश पवार यांनी त्यांच्या बनावट सह्या वैभव विलास कुलकर्णी, विठ्ठल गोविंद कुलकर्णी, अश्विनकुमार सुरेंद्र काळे, सुकृत सुरेंद्र काळे इत्यादीनी करुन रक्कम रुपये 8 कोटी 55 लाखाचे कर्ज समभाग कर्ज योजनेअंतर्गत 1) यशवंत को. ऑप बँक लि. फलटण शाखा चावडी चौक, कराड रक्कम रुपये 1 कोटी 80 लाख 2) चिखली अर्बन को.ऑप बँक लि. चिखली ता. चिखली, जि. बुलढाणा, रक्कम रुपये 4 कोटी 75 लाख 3) यवतमाळ अर्बन को. ऑफ बँक लि. यवतमाळ रक्कम रुपये 2 कोटी असे कर्ज कोणतीही चौकशी न करता, अनियमितपणे, पुरेशी तारण मिळकत न घेता तसेच कर्जदार व जामीनदार यांची प्राथमिक चौकशी न करता, कर्जदार व जामीनदार यांचे इन्कम टॅक्स रिटर्न न घेता कर्ज प्रकरणासाठी लागणारी अत्यावश्यक कागदपत्रे, के. वाय.सी इत्यादी बाबींची पुर्तता न करता नियमबाह्य कर्ज तीन बँकांनी दि.26 जुन 2020 रोजी बनावट कंपन्यांना कर्ज अदा केले होते. सदरचे कर्ज घेतल्यापासून थकीत होते. सदर कर्जाचा एकही हप्ता कर्जदार यांनी भरलेला नाही. कर्जास तारण दिलेली मिळकत परस्पर यशवंत को.ऑफ बँक लि. फलटण, शाखा चावडी चौक कराड यांची एन.ओ.सी घेवून व इतर 2 बँकांची फसवणूक करुन कर्जदार यांनी कर्जास तारण दिलेल्या मिळकती त्रयस्थ इसमास विकल्या आहेत. कर्जास तारण दिलेल्या मिळकतीवरती 7/12 सदरी कर्जदार यांनी मुद्दाम बोजा चढविलेला नव्हता. त्यामुळे आणखी 3 ते 4 लोकांची फसवणुक झाली आहे.
3 बँकानी नियमबाह्य कर्ज दिल्यामुळे त्या कर्जाची वसुली झाली नाही. त्यामुळे ठेवीदारांच्या पैशाचे संरक्षण होत नाही. फिर्यादी यांनी सदरची बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून दिली. कर्जदार वैभव विलास कुलकण व विठ्ठल गोविद कुलकणी यांनी अनेक बँकांना अशाच प्रकारे फसवले असल्याचे पुराव्यानिशी कोर्टामध्ये सांगितले. त्यामुळे मे. कोर्टाने 39 जणांच्या चौकशीचे आदेश दिले आहेत. या संपूर्ण प्रकरणामध्ये खरा सुत्रधार कोण आहे हे शोधून काढणे हे पोलीसांचे समोरील आव्हान आहे. सदरचे फसवणुक प्रकरणी गुन्हा दाखल करण्यास पोलीसांवरती फार मोठा दबाव होता. सदरचे कर्ज प्रकरण हे 8 कोटी 55 लाख रक्कमेचे आहे. यामध्ये फिर्यादीसह अनेक लोकांच्या खोट्या व बोगस सह्या केलेल्या आहेत. त्यामुळे फिर्यादी गणेश पवार यांना कोर्टात जावून आदेश प्राप्त करुन घ्यावा लागला. असे ॲड.एन.पी.जाधव यांनी सांगितले.

Monday, May 20, 2024

कराडमधील ज्वेलर्सवर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणारी टोळी पोलिसांनी घेतली ताब्यात ;

वेध माझा ऑनलाइन ।
कराड परिसरातील सोने चांदीच्या दुकानावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असणाऱ्या टोळीला कराड शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या पथकाने नुकतेच ताब्यात घेतले आहे 

 याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की गेल्या दोन महिन्यापासून  पाचजण विद्यानगर परिसरात रूम घेऊन राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. पोलिसांनी त्याठिकाणी जाऊन छापा टाकला असता त्या पाचजणापैकी तिघेजण पोलिसांच्या हाती लागले. तर दोघेजण पळून गेले. त्यानंतर पोलिसांनी एकास ताब्यात घेतले. तर आणखी एका संशयित आरोपीचा शोध सुरू आहे
ताब्यात घेतलेल्यांकडे चौकशी केली असता कराड परिसरातील एका ज्वेलर्सच्या दुकानावर दरोडा टाकण्याचा उद्देश असल्याचे त्यांनी पोलिसांना सांगितले. पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या तिघांकडून तीन पिस्टल, चार जिवंत काडतुसे, दोन कोयते चिकट टेप पाच दोऱ्या व एक चाकू असा मुद्देमाल जप्त केला आहे.
ताब्यात असलेले संशयित पलूस, इचलकरंजी, पुसेगाव, गोडोली सातारा तालुक्यातील आहेत तर एकजण केरळ राज्यातील आहे
दरम्यान घटनास्थळी कराडचे डीवायएसपी अमोल ठाकूर, पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप, पोलीस उपनिरीक्षक पतंग पाटील यांनी भेट दिली आहे.  

Sunday, May 19, 2024

शरद पवारांनी केले 5 मोठे गौप्यस्फोट : महाराष्ट्राचे राजकारण आता बदलणार?

वेध माझा ऑनलाइन
शरद पवार यांनी महाराष्ट्राच्या राजकारणातील घडामोडींबाबत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. शरद पवारांनी याआधी घडलेल्या घडामोडींबाबत भाष्य केलं आहे. त्यांनी केलेल्या दाव्यांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात काही बदल होतात का? ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी एका दिलेल्या मुलाखतीत अनेक गौप्यस्फोट केले आहेत. त्यांच्या या गौप्यस्फोटांमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आगामी काळात खरंच काही बदल होतात का? ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे. विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर शिवसेनेकडून मुख्यमंत्रीपदासाठी एकनाथ शिंदे यांच्या नावाचा प्रस्ताव महाविकास आघाडीच्या बैठकीत आला होता का? या प्रश्नाचं उत्तर शरद पवार यांनी दिलंय. त्यावेळी एकनाथ शिंदे यांच्या नावाला आमची हरकत नव्हती, असं स्पष्टीकरण शरद पवारांनी दिलं आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल हे 2004 मध्ये भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते, असा मोठा दावा शरद पवारांनी केलाय. शरद पवार यांनी असे अनेक गौप्यस्फोट केले आहेत. 

शरद पवार यांचे 5 महत्त्वाचे गौप्यस्फोट
“विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांचा मुख्यमंत्री करण्यास आमची हरकत नव्हती. पण त्यांचं नाव आमच्यापुढे आलं नाही. शिवसेनेच्या नावाबद्दल शिवसेनेअंतर्गत चर्चा झाल्याचं नंतर समजले”, असं शरद पवार यांनी स्पष्ट केलं आहे.

2014 मध्येच महाविकास आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयत्न होता, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला. भाजप आणि शिवसेनेत अंतर पाडण्याचा आमचा प्रयत्न होता. शिवसेना भाजपसोबत गेली आणि 2014 मध्ये महाविकास आघाडीचा आमचा प्रयोग फसला, असंदेखील शरद पवार म्हणाले.

“प्रफुल्ल पटेल 2004 पासूनच भाजपसोबत जाण्यासाठी आग्रही होते. काँग्रेसबरोबर जाण्यास प्रफुल्ल पटेल यांनी विरोध केला होता. तरीदेखील युपीए सरकारमध्ये आम्ही पटेल यांना केंद्रीय मंत्रीपद दिलं. 2004च्या निवडणुकीच्या आधीपासून प्रफुल्लभाई सारखं सांगायचे की, या निवडणुकीत आपले पक्ष टिकणार नाहीत. वाजपेयींना पर्याय नाही. आपण सगळे भाजपमध्ये जाऊ, तासंतास त्यांनी आग्रह केला होता. शेवटी मी नाही म्हणून सांगितलं. तुम्ही जा म्हणून सांगितलं. शेवटी अक्षरश: त्यांच्या डोळ्यांत पाणी आलं”, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला.

“2004 मध्ये पक्षाकडे मुख्यमंत्रीपदासाठी योग्य नेता नव्हता. अजित पवार त्यावेळी नेता नव्हता. अजित दादा नवखे होते. त्यावेळी छगन भुजबळ यांच्याकडे मुख्यमंत्रीपद सोपवलं असतं तर भविष्यात पक्षात फूट पडली असती”, असा मोठा दावा शरद पवार यांनी केला.

“काँग्रेसबाहेर पडलेल्या नेत्यांनी स्थापन केलेले छोटे पक्ष विलीन होऊ शकतात. आपला पक्ष विलीन करण्याचा विचार नाही. पुढे हा पर्याय त्याज्य नाही”, असं स्पष्टीकरण शरद पवार यांनी दिले.

पंकजा मुंडेंनी केली उदयनराजेंची नक्कल :उदयनराजे कॉलर उडवतात : पंकजा मुंडेंनी उडवला गमछा: काय आहे बातमी?

वेध माझा ऑनलाइन।
देशासह राज्यात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. राज्यात उद्या सोमवारी लोकसभेच्या पाचव्या आणि अंतिम टप्प्यातील मतदानाचा टप्पा पार पडणार आहे. लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा कालच थंडावल्यात. अशातच कालच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात नाशिकमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांनी जाहीर सभा घेतली. यावेळी पंकजा मुंडे यांनी खासदार उदयनराजे भोसले यांची नक्कल केल्याचे पाहायला मिळाले. उदयनराजे भोसले नेहमी आपल्या भाषणात बोलत असताना आपल्या शर्टाची कॉलर उडवताना दिसता. त्यांची ही स्टाईल राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चेत आहे. यावरून पंकजा मुंडे यांनी उदयनराजे भोसलेंची नक्कल केली, यावेळी पंकजा मुंडेंनी आपल्याकडे कॉलर नसल्याचे म्हणत गमछा उडवल्याचे पाहायला मिळाले.

निकालाआधीच सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर्स झळकले ;

वेध माझा ऑनलाइन।
लोकसभा निवडणुकीचा अजून पाचवा टप्पाच सुरू आहे. सातव्या टप्प्यापर्यंत मतदान होणार आहे. त्यानंतर 4 जून रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. मात्र, त्यापूर्वीच अति उत्साही कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्यांचं अभिनंदन करणं सुरू केलं आहे. भोर तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गावर शिंदेवाडी गावाच्या हद्दीत निकाला आधीच लागले सुप्रिया सुळे यांच्या विजयाचे बॅनर लागले आहेत. शिवसेना ठाकरे गटाचे भोर तालुकाप्रमुख ज्ञानेश्वर शिंदे यांनी हे बॅनर लावले आहेत. त्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे. विशेष म्हणजे बारामतीतील निवडणूक अत्यंत चुरशीची झाली होती. तरीही कार्यकर्त्यांना आपलाच नेता निवडून येणार असल्याचं वाटत आहे.

एकीकडे 4 जूनला देशाच्या लोकसभा निवडणुकीचे चित्र काय असणार? याची लोकांमध्ये उत्सुकता आहे. तर दुसरीकडे अतिशय लक्षवेधी लढत ठरलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघातील भोर तालुक्यात पुणे सातारा महामार्गावर ‘गुलाल आपलाच’ असा आशय लिहिलेले बॅनर झळकले आहेत. या बॅनरवर सुप्रिया सुळे यांचा भला मोठा फोटो असून विजयी झाल्याबद्दल त्यांचं अभिनंदनही करण्यात आलं आहे

देशातील लोकसभा निवडणुका सुरु आहेत. अनेक ठिकाणी मतदान झाले आहे तर अनेक ठिकाणी मतदान बाकी आहे. येत्या 4 जून रोजी या लोकसभा निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे 4 जून रोजी नक्की काय होणार? याची उत्सुकता सर्वांना आहे. त्यातच पुणे जिल्ह्यातील बारामती लोकसभा मतदारसंघातील खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्यातील लढत अतिशय लक्षवेधी आणि चुरशीची झाली आहे. त्यात नक्की कोण बाजी मारणार? बारामतीचा गड कोण काबीज करणार? याची उत्सुकता नागरीकांना लागून राहिली आहे. बारामतीत कोण आणि कसे विजयी होणार, याचे अंदाज लावले जात आहेत. पारावर, चौकात, हॉटेलात, शेतात सर्वत्र हीच चर्चा ऐकायला मिळत आहे.

ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन

वेध माझा ऑनलाइन ।
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे वयाच्या नव्वदाव्या वर्षी वृद्धापकाळाने भुईंज येथील निवासस्थानी आज निधन झाले. 
भुईंज गावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीला प्रारंभ करणाऱ्या प्रतापराव भोसले यांनी ४ वेळा आमदार म्हणून वाई खंडाळा विधानसभा मतदार संघाचे प्रतिनिधीत्व करताना कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वी काम केले. त्यानंतर ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण यांच्या निधनाने रिक्त झालेल्या सातारा लोकसभा मतदार संघातून ३ वेळा संसदेत खासदार म्हणून प्रतिनिधीत्व केले. या काळात विविध राष्ट्रीय समित्यांवर महत्वपूर्ण जबाबदाऱ्या पार पाडल्या. त्यानंतर त्यांनी १९९७ साली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारून गेलेली सत्ता पुन्हा आणून महाराष्ट्रात काँग्रेसच्या नेतृत्वाखाली आघाडीचे सरकार स्थापन केले.

या कालावधीत ज्येष्ठ नेते यशवंतराव चव्हाण, देशभक्त आबासाहेब वीर यांच्या नेतृत्वाखाली काम करताना धोम, कण्हेर धरण, किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना, जनता शिक्षण संस्थेच्या उभारणीसह कृषी, सहकार क्षेत्रासह संस्थात्मक कामकाजात मोलाचे योगदान दिले.

सांगलीचा खासदार कोण होणार? यावर पैज लावलेल्या दोघाना पैज लावणे आले अंगलट ; गाड्यांची पैज लावणाऱ्या दोघांवर गुन्हा दाखल ; काय आहे बातमी...?

वेध माझा ऑनलाइन।
सांगलीचा खासदार कोण होणार? यावर पैज लावलेल्या दोघाना अशी पैज लावणे चांगलेच अंगलट आलं आहे. गाड्यांची पैज लावणाऱ्या दोघांवर महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दोघेजण हे कवठेमहांकाळ तालुक्यातील आहेत. सांगली लोकसभा निवडणुकीच्या निकालात आपलाच उमेदवार विजयी आणि खासदार होईल यावर दुचाकीची पैजा लावणाऱ्या कवठेमहांकाळ तालुक्यातील या दोघांवर पोलिसांनी धडक कारवाई केली. महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायद्याखाली रमेश संभाजी जाधव (वय 29, रा. बोरगाव) आणि गौस मुबारक मुलाणी (वय 38, रा.शिरढोण) या दोघावर हा गुन्हा दाखल झाला आहे. 

दोन लाख पंधरा हजाराच्या दोन दुचाकी जप्त 
पोलिसांनी बोरगाव, शिरढोण येथील दोघांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडून दोन लाख पंधरा हजाराच्या दुचाकी जप्त केल्या. बोरगाव येथील ग्रामपंचायत सदस्य रमेश संभाजी जाधव आणि शिरढोणचे गौस मुबारक मुलानी यांनी सांगली लोकसभा निवडणुकीचा निकालाबाबत भाजप पक्षाचा उमेदवार निवडून येईल की अपक्ष उमेदवार निवडून येईल यासाठी स्वतःच्या फायद्यासाठी निवडणुकीतील उमेदवारावर बुलेट एमएच-10-डीएफ-1126 व दुचाकी एमएच-10-डीएच- 8800 गाड्यावर पैजा लावल्या होत्या. पैज लावून तसा संदेश सोशल मीडियाद्वारे प्रसारित केला होता. 
पैज लावल्याचे समजताच तत्काळ कारवाईचे आदेश
पैजा लावल्याची माहिती पोलिस निरीक्षक जोतीराम पाटील यांना समजताच त्यांनी तत्काळ कारवाईचे आदेश दिले. पोलिसांनी दोघांवर कारवाई करत रमेश संभाजी जाधव आणि गौस मुबारक मुलाणी यांना ताब्यात घेत दोघांच्या दोन्ही दोन लाख पंधरा हजाराच्या दुचाकी जप्त केल्यात.सांगलीत अपक्ष उमेदवार विशाल पाटील आणि भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील यांच्या कार्यकर्त्यांमध्ये विजयावरुन पैजा लागल्या आहेत. अपक्ष उमेदवार विशाल पाटील निवडून आले तर रमेश संभाजी जाधव यांच्याकडून यूनिकॉर्न गाडी गौस मुबारक मुलाणी यांना देण्यात येईल. तसेच भाजपचे उमेदवार संजयकाका पाटील निवडून आले तर गौस मुबारक मुलाणी यांचेकडून बुलेट गाडी रमेश संभाजी जाधव यांना देण्यात येणार असल्याचं त्यांनी जाहीर केले आहे. मात्र, हे त्यांच्या चांगलच अंगलट आलं आहे.

अजित पवार यांच्या आरोपांना शरद पवार यांचे जोरदार उत्तर ; म्हणाले...मी कधीही पुतण्या आणि मुलगी यांच्यात भेद केला नाही ; आणखी काय म्हणाले...?

वेध माझा ऑनलाइन।
अजित पवार यांना राज्यात मंत्री केले. अनेक कॅबिनेट मंत्रीपदे देताना सर्व महत्त्वाची खाती दिली. एक, दोन नव्हे तर तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद दिले. विधिमंडळातील गटनेतेपद अजित पवार याला केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद दिले.राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी एका मुलाखतीतून पुन्हा अजित पवार यांना निशाणा केला आहे. अजित पवार यांना काय कमी केले, नेहमी सर्व सत्तापदे त्यांना दिली. सुप्रियाला फक्त खासदारकी दिली. मी पुतण्या आणि मुलगी असा भेद कधीच केला नाही, असे शरद पवार यांनी मुलाखतीत म्हटले आहे. अजित पवार यांच्या आरोपांना शरद पवार यांनी दिलेले हे जोरदार उत्तर आहे.

 मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली नसती का? होय, मला संधी मिळाली असती. मी त्यांचा मुलगा नाही म्हणून संधी मिळाली नाही, असा आरोप काही दिवसांपूर्वी अजित पवार यांनी केला होता. त्या आरोपाला शरद पवार यांनी उत्तर दिले आहे. मी कधीही पुतण्या आणि मुलगी यांच्यात भेद केला नाही. यामुळे सुप्रिया सुळे हिला फक्त खासदारकी दिली. आता ती लोकसभेत पक्षाची गटनेता आहे. ती दिल्लीच्या राजकारणात आहे. परंतु तिला कधीही सत्तापद दिले नाही. दुसरीकडे अजित पवार यांना कायमच सत्तापदे दिली.

अजित पवार यांना राज्यात मंत्री केले. अनेक कॅबिनेट मंत्रीपदे देताना सर्व महत्त्वाची खाती दिली. एक, दोन नव्हे तर तीन वेळा उपमुख्यमंत्रीपद दिले. विधिमंडळातील गटनेतेपद अजित पवार याला केले. विधानसभेचे विरोधी पक्षनेतेपद दिले. हे सर्व दिल्यानंतर अजून काय हवे होते? असा प्रश्न शरद पवार यांनी अजित पवार यांना विचारला.

Friday, May 17, 2024

वेध माझा ऑनलाइन।
मुस्लिम मत उद्धव ठाकरेंकडे जातायत. मराठी प्लस मुस्लिम मतांच्या बेरजेमुळे भाजपा नेते उद्धव ठाकरेंवर तुटून पडलेत का? यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, ठाकरेंच्या लक्षात आलं, मुंबईत आपला मराठी मतांचा टक्का कमी झालाय, याची भरपाई कुठून करता येईल, त्यावेळी मुस्लिम मतांवर त्यांचं लक्ष गेलं. मुस्लिमांच लांगुलचालन केलं, त्यांना पायघड्या घातल्या. त्यांच्या पायावर लोळण घातली की, भरपाई करता येईल असं उद्धव ठाकरेंना वाटतंय असं फडणवीस म्हणाले. इतकंच नाहीतर ठाकरेंनी जाणीवपूर्वक टिपू सुल्तान जयंती साजरी करणं सुरु केलं. त्यांच्या रॅलीत अल्लाहू अकबरचे नारे दिले, हे चुकीचच होतं. हिंदू ह्दयसम्राट बाळासाहेब ठाकरेंनी हे खपवून घेतल नसतं. आता त्यांचं लांगुलचालन या स्तराला पोहोचलय की, मुंबईच्या बॉम्बस्फोटातला आरोपी त्यांचा स्टार प्रचारक बनलाय, अशी टीका फडणवीस यांनी केली. तर उबाठा सेनेच्या रॅलीत पाकिस्तानचे झेंडे. अरे, शरम वाटली पाहिजे, कोणाचे सुपूत्र आहोत आपण. त्यावर साधा निषेधाचा शब्द नाही, हे लांगुलचालन स्पष्टपणे दिसतय. निवडणूक आम्ही जिंकणार आहोत, पण अशी वेळ आली असती, एखादी निवडणूक हरावी लागतेय, म्हणून पाकिस्तानचा झेंडा घेऊन फिरावं लागेल, तर मी निवृत्ती घेतली असती, असं देवेद्र फडणवीस यांनी म्हणत ठाकरेंवर हल्लाबोल केला.

Thursday, May 16, 2024

शरद पवार म्हणाले... बारामतीचे मतदान झाल्यापासून अजित पवार आजारी आहेत, अशी माझी माहिती आहे ; काय आहे बातमी...?

वेध माझा ऑनलाइन।
बारामती मतदारसंघातील मतदान पार पडल्यापासून उपमुख्यमंत्री अजित पवार आहेत कुठे, असा प्रश्न विचारला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दौऱ्यात तसेच महायुतीच्या प्रचाराला त्यांची गैरहजेरी दिसत आहे. यावरून विविध वावड्या उठल्या असताना आता शरद पवारांनीही यावर भाष्य केले आहे. शरद पवार यांनी आज पत्रकार परिषद घेतली असता त्यांना याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावर बोलताना शरद पवार म्हणाले की, बारामतीचे मतदान झाल्यापासून अजित पवार खरंच आजारी आहेत, अशी माझी माहिती आहे. त्यामुळे ते कुठे दिसत नसवाते.

पंतप्रधान मोदी यांच्या राज्यातील दौऱ्याच्या वेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस हे उपस्थित असतात. सुरुवातीच्या काही सभांना अजित पवार उपस्थित होते. पण बारामती मतदारसंघाच्या प्रचारात अजित पवार यांनी बारकाईने लक्ष घातले होते. त्यांनी बारामतीमध्येच ठाण मांडले होते. परिणामी उस्मानाबादमध्ये राष्ट्रवादीचा उमेदवार असतानाही अजित पवार उपस्थित नव्हते. राष्ट्रवादीकडून प्रफुल पटेल हे उपस्थित होते. बुधवारी दिंडोरीत झालेल्या सभेला राष्ट्रवादीच्या वतीने छगन भुजबळ तर कल्याणमध्ये सुनील तटकरे हे उपस्थित होते. पण अजितदादा कुठेच दिसले नाहीत. मुंबईतील रोडे शोच्या वेळीही अजित पवार उपस्थित नव्हते. तसेच पंतप्रधन मोदी यांनी मंगळवारी वाराणसी मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी ‘रालोआ’च्या घटकपक्षाचे नेते उपस्थित होते. मात्र तिकडे अजित पवार फिरकले नाहीत.
बारामतीमधील मतदान पार पडताच अजित पवार यांनी भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्या शरद पवारांबद्दल केलेल्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली होती. ‘शरद पवार यांना आम्हाला संपवायचे आहे’ या पाटील यांच्या विधानावर पवार यांनी आक्षेप घेतला होता. तसेच या विधानामुळे नकारात्मक वातावरण निर्माण झाल्यानेच चंद्रकांत पाटील यांना बारामतीपासून दूर ठेवण्यात आले, असेही पवार म्हणाले होते. बारामतीवरून अजित पवार यांनी मतदान पार पडल्यावरच भाजपवर खापर फोडले होते. पुण्यातील भाजप नेत्यांनी अजितदादांच्या विधानाबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.

Tuesday, May 14, 2024

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले ... लोकसभा निवडणुकीनंतर केंद्रात सत्ताबदल होणार ...इंडिया आघाडीचे किती लोक निवडून येणार ...पृथ्वीराज बाबांनी थेट आकडाच सांगितला ;

वेध माझा ऑनलाईन
इंडिया आघाडीला 240-260 जागा मिळतील आणि केंद्रात सत्ताबदल होणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे. एका वृत्तपत्राला दिलेल्या संवादात पृथ्वीराज चव्हाण यांनी इंडिया आघाडीला 240-260 जागा मिळणार असल्याचा अंदाज व्यक्त केला. यासह राज्यात महाविकास आघाडीला 32 ते 35 जागा मिळणार असल्याचाही दावा पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. 

उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांना जनतेची सहानुभूती आहे. इतकंच नाहीतर शऱद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळालेल्या सहानुभूतीचा फायदा यंदाच्या निवडणुकीमध्ये होणार असल्याचे पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटले आहे.

आमदार रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल ; काय आहे प्रकरण ?

वेध माझा ऑनलाइन।
राज्यात लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा बाकी असतानाच महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आणि कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

नेमकं काय आहे प्रकरण?

पुण्यात नुकतंच १३ मे रोजी लोकसभा निवडणुकीचं मतदान पार पडलं. तर अजून राज्यात पाचवा टप्पा बाकी असतानाच महाविकास आघाडीचे लोकसभा निवडणुकीचे उमेदवार आणि कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासंदर्भातील मोठी बातमी समोर आली आहे. रवींद्र धंगेकर यांच्यावर पुण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला असून पुणे पोलिसांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर ही कारवाई केली आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी रवींद्र धंगेकर यांनी सहकार नगर पोलीस ठाणे येथे भाजपविरोधात आंदोलन केलं होतं. या आंदोलनात बेकायदेशीर पद्धतीने जमाव केल्याप्रकरणी पुणे पोलिसांकडून रवींद्र धंगेकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पैशांचं वाटप भाजपकडून केलं जात असल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. मात्र रवींद्र धंगेकर यांच्यावरच पुण्यात एक गुन्हा दाखल झाला असल्याची माहिती मिळत आहे.

कृष्णा विश्व विद्यापीठाचा गुरुवारी १२ वा दीक्षांत सोहळापद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर यांची प्रमुख उपस्थिती; १०४२ विद्यार्थ्यांना होणार पदवी प्रदान

वेध माझा ऑनलाइन।
येथील कृष्णा विश्व विद्यापीठाचा १२ वा दीक्षांत सोहळा गुरुवार दिनांक १६ मे रोजी सकाळी ११ वाजता विद्यापीठाच्या प्रांगणात आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेचे माजी प्रमुख पद्मश्री डॉ. रमण गंगाखेडकर उपस्थित राहणार असून, कृष्णा विश्व विद्यापीठाचे कुलपती डॉ. सुरेश भोसले अध्यक्षस्थान भूषविणार आहेत. 

या सोहळ्याला कुलपतींचे प्रधान सल्लागार डॉ. वेदप्रकाश मिश्रा, प्र-कुलपती डॉ. प्रवीण शिनगारे, कुलगुरू डॉ. नीलम मिश्रा आदी मान्यवरांसह व्यवस्थापन मंडळाचे सदस्य आणि अभ्यास मंडळाच्या सदस्यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. या सोहळ्यात विद्यापीठाच्या विविध अधिविभागातील १०४२ विद्यार्थ्यांना पदवी प्रदान करुन सन्मानित करण्यात येणार असल्याची माहिती विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

याबाबत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात पुढे म्हटले आहे, की ग्रामीण भागातील जनतेला उच्च दर्जाच्या वैद्यकीय सुविधा मिळाव्यात आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण आरोग्य शिक्षण मिळावे, या उद्देशाने सहकारमहर्षी जयवंतराव भोसले (आप्पा) यांनी सन १९८२ साली कृष्णा हॉस्पिटल व वैद्यकीय संशोधन केंद्राची स्थापना केली. त्यानंतर १९८३ साली कृष्णा नर्सिंग विज्ञान संस्थेची व १९८४ साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेची स्थापना करण्यात आली. २००५ साली कृष्णा वैद्यकीय विज्ञान संस्थेला अभिमत विद्यापीठाचा दर्जा बहाल करण्यात आला. स्व. जयवंतराव भोसले आप्पांची दूरदृष्टी आत्मसात केलेल्या कुलपती डॉ. सुरेश भोसले यांनी केवळ भारतातच नव्हे; तर परदेशातही कृष्णा विश्व विद्यापाठाचा नावलौकिक पोहचविला आहे. कृष्णा विद्यापीठाला ‘नॅक’चे ‘ए प्लस’ श्रेणीचे अव्वल मानांकन, तसेच ‘आयएसओ’ मानांकन प्राप्त झाले आहे.

विद्यापीठाच्या यंदाच्या १२ व्या दीक्षांत सोहळ्यात विद्यापीठातील मेडिसिन अधिविभाग (५२०), नर्सिंग (१६०), दंतविज्ञान (८७), फिजिओथेरपी (९६), अलाईड सायन्स अधिविभाग (७३) आणि फार्मसी (१०६) अशा सहा अधिविभागांतून एमबीबीएस, एमएस, बीडीएस, एमडीएस, बीपीटीएच, एमपीटीएच, बी. एस्सी. नर्सिंग, एम. एस्सी. नर्सिंग, एम. एस्सी. बायोटेक्नॉलॉजी, एम. एस्सी. मायक्रोबायोलॉजी, बी. फार्मसी आदी अभ्यासक्रमांच्या एकूण १०४२ विद्यार्थी-विद्यार्थीनींना पदवी प्रदान केली जाणार आहे. यापैकी १५ विद्यार्थ्यांना पीएच.डी.ने व सुपरस्पेशालिटीच्या ५ विद्यार्थ्यांना पदवीने सन्मानित करण्यात येणार आहे. तसेच विशेष गुणवत्ताप्राप्त ३६ विद्यार्थ्यांना विविध पुरस्कारांचे वितरण करुन गौरविण्यात येणार आहे, अशी माहिती कुलसचिव डॉ. एम. व्ही. घोरपडे आणि परीक्षा नियंत्रक डॉ. ज्योत्स्ना पाटील यांनी दिली आहे.

बारामतीचे EVM पुण्याच्या स्ट्राँगरूममध्ये, तिथले CCTV 45 मिनीटे बंद ? शरद पवार गटाने केला आरोप ;


वेध माझा ऑनलाइन
बारामतीच्या निवडणुकीकरता असलेले सर्व ईव्हीएम हे पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आले होते. पण ज्या स्ट्राँगरूममध्ये हे ईव्हीएम ठेवण्यात आले होते, तिथे तब्बल ४५ मिनिटं सीसीटिव्ही बंद असल्याचा आरोप शरद पवार गटाने केला. हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एकच खळबळ उडाली

बारामतीमध्ये लढत असलेल्या बारामतीचे ईव्हीएम मशीन पुण्यात ठेवण्यात आले. मात्र अचानक ४५ मिनिटं सीसीटिव्ही फुटेज बंद झालं. त्यावरून शरद पवार गटाने शंका उपस्थित केली आहे. बारामतीच्या निवडणुकीकरता असलेले सर्व ईव्हीएम हे पुण्यातील स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आले होते. पण ज्या स्ट्राँगरूममध्ये हे ईव्हीएम ठेवण्यात आले होते, तिथे तब्बल ४५ मिनिटं सीसीटिव्ही बंद असल्याचा आरोप शरद पवार गटाने केला. शरद पवार गटाचे निवडणूक आधिकारी लक्ष्मीकांत खाबिया यांनी बंद पडलेल्या ईव्हीएमचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलेत आणि एकच खळबळ उडाली. शरद पवार गटाकडून करण्यात आलेल्या तक्रारीनंतर ४५ मिनिटांनी पुन्हा एकदा सीसीटिव्ही फुटेज दिसण्यास सुरूवात झाली. पण या ४५ मिनिटांत नेमकं काय घडलं? असा सवाल शरद पवार गटाचे प्रतिनिधी लक्ष्मीकांत खाबिया यांनी केला. बघा शरद पवार गटाकडू नेमकी काय तक्रार नोंदवली?

Monday, May 13, 2024

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी ; महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मोठी बातमी ;

वेध माझा ऑनलाइन
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर एक मोठी बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाच्या प्रकरणावर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह आणि नाव प्रकरणावर माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाच्या विरोधात सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केलीय. याच याचिकेवर उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे. विशेष म्हणजे राज्यात सध्या लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरु आहे. राज्यात आता केवळ पाचव्या टप्प्यासाठी मतदान राहिलं आहे. येत्या 20 मे ला त्यासाठी मतदान होणार आहे. यावेळी एकूण 13 जागांसाठी मतदान होणार आहे. त्यामुळे आता जोरदार प्रचाराची रणधुमाळी बघायला मिळणार आहे. अशावेळी आता सुप्रीम कोर्टात राष्ट्रवादीच्या याचिकांवर महत्त्वाची सुनावणी होणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव आणि चिन्हाबाबत उद्या सुप्रीम कोर्टात महत्त्वाची सुनावणी होणार आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयविरोधात दाखल केलेल्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. सुप्रीम कोर्टाकडून प्रकरण लिस्ट करण्यात आलं आहे. त्यामुळे सुप्रीम कोर्टात दुपार १२ नंतर सुनावणी होण्याची शक्यता आहे. या सुनावणीत काय युक्तिवाद होतो ते पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी पक्षात मोठं बंड पुकारल्यामुळे पक्षात फूट पडली आहे. अजित पवार हे राष्ट्रवादीच्या दिग्गज नेत्यांसोबत सत्तेत सहभागी झाले आहेत. तर शरद पवार यांनी सत्तेत न जाण्याचा निर्णय घेतलाय. याउलट शरद पवार यांनी अजित पवार यांच्याविरोधात कायदेशीर लढाई लढण्याचा निर्धार केलाय. त्यामुळे वर्षभरापासून दोन्ही पवार काका-पुतण्यामध्ये राजकीय आणि कायदेशीर संघर्ष बघायला मिळत आहे.

सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची अफवा, पोलिसांकडून सांगली-मिरज स्टेशनची झाडाझडती ; बातमी ...

वेध माझा ऑनलाइन।
रात्रीच्या वेळी सांगली आणि मिरज स्टेशनवर प्रवासाला जायला आलेल्या प्रवाशांना एक वेगळाच अन् काहीसा भीतीदायक अनुभव आला. अचानक पोलिसांचे डॉग आणि बॉम्ब शोध पथक स्टेशनवर आले आणि त्यांनी संपूर्ण स्टेशनवरच झाडाझडती सुरू केली. शेवटी दोन्ही स्टेशनवर पोलिसांना काहीच आढळून आलं नाही आणि पोलिसांसह प्रवाशांनीही सुटकेचा निश्वास सोडला. सांगली रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी ही कारवाई केली. पण नंतर ते मॉकड्रीलचा भाग असल्याचं स्पष्ट झालं.  

रेल्वे स्टेशनवर बॉम्ब ठेवल्याची माहिती मिळाल्यानंतर सांगली आणि मिरज स्टेशनची सांगली पोलिसांकडून झडती घेण्यात आली. अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्यासह पोलीस पथकाने सांगली रेल्वे स्टेशनची तपासणी केली. डॉग आणि बॉम्ब पथकाकडून रेल्वे  स्थानकाची तपासणी करण्यात आली.

अचानक पोलीस फ़ौजफाटा आल्यामुळे आणि त्यांनी सुरू केलेल्या तपासणीमुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. तर सदर तपासणी मॉकड्रिल असल्याचे अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी माहिती दिली. या नंतर रेल्वे स्थानकावरील प्रवाशांना सुटकेचे निश्वास सोडला.

Sunday, May 12, 2024

औरंगजेबसुद्धा गुजरातमध्येच जन्मला होता, औरंगजेब महाराष्ट्र जिंकण्यासाठीच 27 वर्षे प्रयत्न करत होता ; उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला ; आणखी काय म्हणाले ठाकरे ?

वेध माझा ऑनलाइन।
उद्धव ठाकरे हे काँग्रेस आणि राष्ट्रवादी या पक्षांसोबत गेले असल्याची टीका विरोधकांकडून होत असताना उद्धव ठाकरे यांनी प्रत्युत्तर दिलंय. ‘औरंगजेबाच्या विचाराने पुढे जात असून उद्धव ठाकरे आता औरंगजेब फॅन्स क्लबचे मेंबर झालेत असा हल्लाबोल विरोधकांकडून होत असताना उद्धव ठाकरे म्हणाले, ‘कारण त्यांना त्यांचा आवडता केक जो पाकिस्तानात जाऊन त्यांनी नवाज शरीफ यांच्या वाढदिवशी खाल्ला होता, त्याची आठवण होते. बिनबुलाये मेहमान बनून पाकिस्तानात जाऊन नवाज शरीफांच्या वाढदिवसाचा केक खाणारी लोकं मला औरंगजेबाचा फॅन म्हणू शकत नाहीत. कारण औरंगजेबसुद्धा गुजरातमध्येच जन्मला होता. जसे हे दिल्लीत गेले तसे औरंगजेब हा आग्ग्रात होता. औरंगजेबसुद्धा महाराष्ट्र जिंकण्यासाठीच इकडे 27 वर्षे प्रयत्न करत होता. औरंगजेबाने त्या वेळी रोड-शो-बिड शो काही केले असतील, सभा घेतल्या असतील तर त्याची कल्पना नाही मला, पण महाराष्ट्र जिंकण्यासाठी तो इकडे 27 वर्षे बसला होता. पण तो पुन्हा कधीच आग्ग्राला जाऊ शकला नव्हता, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. पण त्या वेळी औरंगजेबाच्या तंबूचे कळस कापण्याचं जे शौर्य मराठ्यांनी गाजवलं, ते मराठे व त्यांचेच वंशज आजही महाराष्ट्रात जिवंत आहेत.’, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी पलटवार केलाय.

अजित पवार तुला पाडीन, तुला पाडीन करतायेत, मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही? जितेंद्र आव्हाडांचा अजितदादांवर हल्लाबोल ;


वेध माझा ऑनलाइन
अजित पवार आता सगळ्यांना डोस देत सुटलेत, तुला पाडीन, तुला पाडीन करतायेत, मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही? लोकशाहीत एवढा माज कसला दाखवता? ज्या बापाने मला घडवलं, त्या बापाचा हात सोडताना ह्दयात जराही कालवाकालव झाली नाही? असा हल्लाबोल जितेंद्र आव्हाड यांनी अजित पवारांवर केला आहे

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, १९९१ साली अजित पवारांना महाराष्ट्रात कोण ओळखतं होतं? त्या अजित पवारांना लोकसभेची उमेदवारी दिली आणि संसदेत पाठवले. त्यानंतर सातत्याने सत्तेच्या वर्तुळात ठेवले, ४ वेळा उपमुख्यमंत्री बनवलं. संघटनेचे पद का घेतले नाही, कधीतरी मला पक्षाचे अध्यक्ष करा, मला पक्ष वाढवायचाय असं का म्हटलं नाही. तुम्हाला केवळ सत्ता हवी होती. त्या सत्तेसाठी तुम्ही शरद पवारांना घराच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि स्वत: पक्ष ताब्यात घेतला असा आरोप त्यांनी केला. 

त्याशिवाय दुसरीकडे ज्या मातोश्रीने आईसारखं प्रेम दिलं, ज्या मातोश्रीने भरभरून दिले त्यांनी मातोश्री फोडण्याचं काम केले. या दोन्ही गद्दारी महाराष्ट्राला कधी आवडणार नाही. राज्यात २ गद्दारी ओळखली जाते, शिवाजी महाराजांच्या काळातला खंडोजी खोपडे आणि सूर्याजी पिसाळ, यांच्या औलादींना महाराष्ट्राने कधी ओळख दिली नाही, मोठेपणा दिला नाही. तसेच या नवीन सूर्याजी पिसाळ, खंडोजी खोपडेंना या निवडणुकीत कायमचे संपवून टाका, येणाऱ्या कुठल्याच निवडणुकीत जागा देऊ नका असं सांगत आव्हाडांनी अजित पवारांसह एकनाथ शिंदेंवर निशाणा साधला.

दरम्यान, महाविकास आघाडीचे उमेदवार राजन विचारे यांच्या समर्थनार्थ घेतलेल्या सभेत जितेंद्र आव्हाड बोलत होते, ते म्हणाले की, आम्हाला संविधान टिकवायचे आहे, भाजपाला संविधानच मान्य नाही. नवीन संसद भवनाचं उद्घाटन झालं, त्यावेळी पत्रक वाटण्यात आलं, त्यात पुरोगामी शब्दच गायब करण्यात आला. अनेक खासदारांनी प्रश्न विचारला तेव्हा चुकून प्रिंटिंग मिस्टेक झालं असं ते म्हणाले. धर्मनिरपेक्षता हा शब्द संविधानातून भाजपाला वगळायचा होता. या देशात धर्मद्वेष इतका वाढीला लागलाय, पहिल्या २ टप्प्यात मतदान झाले, त्यानंतर नागपूरला ४ वाजेपर्यंत काही माणसं भेटली. त्यानंतर दुसऱ्या दिवशी मंगळसूत्राबाबत मोदींनी विधान केले. या देशाची संस्कृती माहिती नसलेला माणूस कसा बोलतो हे ज्वलंत उदाहरण होतं. मणिपूरमध्ये महिलांवर बलात्कार झाले, तेव्हा विचार केला नाही असा आरोप आव्हाडांनी केला.

शरद पवारांनी माझा राजीनामा मागितला नाही ; एकनाथ खडसे आणखी काय म्हणाले...

वेध माझा ऑनलाइन ।
आमदार एकनाथ खडसे यांचा अजूनही भाजपमध्ये प्रवेश झालेला नाही. एकनाथ खडसे यांनी एका टीव्ही चॅनेलशी संवाद साधला असताना त्यांनी अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. शरद पवार यांनी मला चांगली मदत केली. आता तरी मी विधान परिषदेचा आमदार आहे. शरद पवार यांनी माझा राजीनामा घेणार नसल्याचं स्पष्ट केलं आहे. म्हणजे मी आमदार राहणार आहे. त्यामुळे दुसरी निवडणूक लढण्याचा प्रश्न येत नाही. पवारांनी माझ्या आमदारकीचा राजीनामा मागितला नाही. त्यामुळे इतरांना माझा राजीनामा मागण्याचा अधिकार नसल्याचे एकनाथ खडसे म्हणाले. तर यावेळी त्यांनी मोठी घोषणाही केली. यापुढे मी कोणतीही निवडणूक लढवणार नाही असं नाही. पण माझा निवडणूक लढवण्यावर कल नाही. निवडणूक लढवण्याची माझी इच्छा नाही. त्यामुळे एकनाथ खडसे हे निवडणुकीच्या राजकारणापासून दूर राहणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे

तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो...सुनील केदार यांचे अजित पवारांना चॅलेंज ;

वेध माझा ऑनलाइन 
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यासाठी सोमवारी मतदान पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील नेते मंडळींनी उमेदवारांचा जोरदार प्रचार केला. अनेक ठिकाणी प्रचारादरम्यान नेते मंडळींनी पातळी सोडून एकमेकांवर टीका देखील केली. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या रोखठोक शैलीत उघडपणे शरद पवार गटाचे शिरूरचे आमदार अशोक पवार यांना इशारा दिला होता. तू आमदार कसा होतो तेच बघतो असं म्हणत अजित पवार यांनी अशोक पवार यांना आव्हान दिलं. त्यावर आता काँग्रेसचे आमदार सुनील केदार यांनी अजित पवारांना चॅलेंज दिलं आहे.

सुनील केदार हे पुण्यात काँग्रेस उमेदवाराच्या प्रचारासाठी आले होते. यावेळी पत्रकारांनी पुण्यातील क्रीडा विद्यापीठाचे कामकाज कुठे अडकलं आहे असा सवाल त्यांना केला. त्यावर बोलताना सुनील केदार यांनी अजित पवारांवर निशाणा साधला. धमकी देण्यातून लोकशाही येत नाही, असं म्हणज केदार यांनी अजित पवारांना सुनावलं. अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत. त्यांनी लोकशाही समजून घ्यायला हवी, असंही सुनील केदार म्हणाले.
"सुनील केदारचा तु्म्हाला राग असेल तर विद्यापीठाला माझं नाव देऊ नका. राज्याच्या नवी पिढीसाठी उपयोगी उपक्रम होता. मी नागपुरात न करता तो पुण्यात केला. महाराष्ट्रात काही होऊ द्यायचे नाही आणि नुसत्या गप्पा मारायच्या तुला पाहतो, तू कसा निवडून येतो असा दम द्यायचा. नागपुरात ये कसा निवडून येतो ते मी सांगतो. नागपूरला ये नाहीतर मी बारामतीमध्ये येतो. लोकशाहीमध्ये लोकांची कॉलर पकडून मत मागायचे नसते. लोकांच्या मनात जिव्हाळा आणि विश्वास निर्माण करायचा असतो असं सुनील केदार म्हणाले.

Saturday, May 11, 2024

गोपीनाथ मुंडेंची आठवण काढत उदयनराजेंना अश्रू अनावर: पंकजा मुंडे यांच्या प्रचारासाठी उदयनराजे बीडमध्ये : पंकजा मुंडेंना निवडून देण्याचे केले आवाहन ;

वेध माझा ऑनलाइन भाजपच्या बीडच्या उमेदवार पंकजा मुंडे यांचा प्रचार करताना उदयनराजे भोसले चांगलेच भावूक झाले होते. गोपीनाथ मुंडे यांची आठवण काढताना उदयनराजे यांना भरसभेत अश्रू अनावर झाले. उदयनराजेंनी आसवांना वाट मोकळी करून देतानाच हात जोडले. मतदारांना वाकून नमस्कार केला. उदयनराजे वाकून नमस्कार करत असताना पंकजा मुंडे त्यांना नको नको म्हणत होत्या. उदयनराजेंच्या या कृतीने अनेकांना गलबलून आलं. स्वत: पंकजा मुंडे यांनाही अश्रू अनावर झाले. त्यामुळे सभेला आलेले नागरिक काही काळ स्तब्ध झाले होते.

चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस होता. त्यानिमित्ताने बीडमध्ये पंकजा मुंडे यांची मोठी सभा झाली. या सभेला स्वत: उदयनराजे भोसले आले होते. अजित पवार आले होते. अजित पवार यांच्या तडाखेबंद भाषणानंतर उदयनराजे यांनी भाषणाला सुरुवात केली. यावेळी त्यांनी मिश्किल टिप्पणीही केली. अजितदादा आणि इतर वक्त्यांनी सर्व काही बोलून टाकलं आहे. विकास कामांची माहिती दिली आहे. माझ्यासाठी काहीच ठेवलं नाही. आता मी काय बोलू? असं उदयनराजे म्हणाले तेव्हा एकच खसखस पिकली.

कॉलेजमध्ये असताना… जेव्हा आपण एखादं लांबलाचक भाषण करतो तेव्हा पाहिल्याच टाळ्या आणि शिट्ट्या होतात. तुम्ही टाळ्या आणि शिट्ट्या वाजवल्या ना समजायचं आपण उरकतं घेतलं पाहिजे, अशी मिश्कील टोलेबाजी उदयनराजे यांनी केली. माझं काळीज, माझे मित्र गोपीनाथ मुंडे यांना वंदन करतो. ( असं बोलताना त्यांचा कंठ दाटला) मघाशी अजितदादा बोलले. पंकजाताई बोलल्या. एक लक्षात घ्या, तुम्हाला माहीत नसेल तर ऐका. मुंडे कुटुंबाचं कुलदैवत शिखरशिंगणापूर. कामानिमित्त ते इथे आले. हे मला मुंडे साहेबांनी सांगितलं होतं. त्यावेळी कारखानदारी नव्हती. ऊसतोड कामगार होते. ते लढले आणि झटले. जगले. असं असताना आज त्यांच्या कन्येने तुमच्याकडे हात पसरून मतं मागायची?, असा सवाल उदयनराजे यांनी केला.
ते म्हणाले हृदयापासून सांगतो. बाय हार्ट… महिला वडीलधारी लोकं. एक लक्षात घ्या.  ती तुमची मुलगी आहे, बहीण आहे. तिला मतदान नाही करायचं तर कुणाला करायचं? कृपया माझ्या बहिणीला निवडून द्या, असं आवाहन करताना त्यांनी हात जोडले. त्यांचा कंठ दाटून आला होता. डोळ्यातून अश्रू येत होते. 
मुंडेंनी माझं बोट धरलं
माझे वडील वारल्यानंतर कोण नव्हतं बोट धरायला. गोपीनाथ मुंडे यांनी माझं बोट धरलं. (असं म्हणताना उदयनराजे अक्षरशः रडले) माझ्या गळ्याची शपथ आहे. तुम्हाला महाराजांची शपथ आहे. कुणी कायपण बोललं तर विश्वास ठेवू नका. पंकजा मुंडेना निवडून द्याअसे आवाहन त्यांनी यावेळी केले 

काँग्रेसनेही चुका केल्या ; राहुल गांधींचं मोठं विधान ;

वेध माझा ऑनलाइन।
काँग्रेस नेते अध्यक्ष राहुल गांधी यांनी काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या असून येत्या काळात आपल्या राजकारणात, धोरणात बदल करावे लागणार असल्याचं म्हटलं आहे. इंदिरा गांधी प्रतिष्ठानमध्ये झालेल्या 'राष्ट्रीय संविधान परिषदेत' राहुल गांधी म्हणाले की, "सत्य हे आहे की काँग्रेस पक्षाला आगामी काळात आपलं राजकारण बदलावं लागेल. काँग्रेस पक्षाकडूनही चुका झाल्या आहेत, मी काँग्रेसचा असूनही हे सांगत आहे."  याआधी राहुल यांनी दावा केला होता की, भाजपा 180 पेक्षा जास्त जागा जिंकणार नाही.
राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार निशाणा साधला आहे. "मी एका गोष्टीची गॅरंटी देतो की, आता होणाऱ्या निवडणुकीत नरेंद्र मोदीजी पंतप्रधान होणार नाहीत. तुमची इच्छा असेल तर मी सही करून देईन. मोदींची रणनीती ही भावाला भावासोबत लढायला भाग पाडण्याची आहे आणि या निवडणुकीत हे काम करत नाही. जर यामध्ये चीटिंग केली तर हरकत नाही, पण त्यांचा पक्ष 180 (जागा) च्या पुढे जात नाही."असेही ते म्हणाले

अजित पवारांच भाषण चर्चेत :म्हणाले...अल्पसंख्याक विभागाच्या केसालाही धक्का लागणार नाही. :


वेध माझा ऑनलाइन।
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बीडमध्ये भाजपच्या उमेदवार पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेला हजेरी लावली होती. सध्या याच प्रचार सभेतील अजित पवार यांच्या भाषणाची जोरदार चर्चा रंगली आहे. 

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यातील प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार बीडमध्ये पंकजा मुंडे यांच्या सभेला हजर झाले होते. यावेळी अजित पवार यांनी सभेमधील भाषणात म्हटलं आहे की, मी सर्व समाजासाठीच्या विभागांना निधी दिला आहे. सर्वजण आपली आहेत त्यामुळे प्रत्येक ठिकाणी मी निधी दिला. कुठेही निधी देताना मी भेदभाव केला नाही. अल्पसंख्याक विभागाच्या केसालाही धक्का लागणार नाही. तुम्ही अजिबात काळजी करु नका. असं देखील अजित पवार प्रचार सभेमध्ये बोलले.

निलेश लंके तू किस झाड की पत्ती है...लंके ज्या शाळेत शिकतो. त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे, ;अजित पवारांचा हल्लाबोल ;

वेध माझा ऑनलाइन
राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची काल महायुतीचे अहमदनगर दक्षिणचे उमेदवार सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ पारनेर इथं जाहीर सभा पार पडली. या सभेतून अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार निलेश लंके यांच्यावर घणाघाती टीका करत त्यांना पराभूत करण्याचं आवाहन पारनेरकरांना केलं. अजित पवारांनी केलेल्या आक्रमक हल्ल्याला निलेश लंके नेमकं कसं प्रत्युत्तर देणार, याबाबत उत्सुकता होती. लंके यांनी या टीकेवर आज प्रतिक्रिया दिली असून अजित पवारांना थेट लक्ष्य करणं त्यांनी टाळलं आहे. मात्र त्याचवेळी एक आरोप करत या वादाची दिशा बदलण्याचा प्रयत्नही लंके यांच्याकडून करण्यात आला आहे.दरम्यान निलेश लंके तू किस झाड की पत्ती है ... मला इथे आल्यानंतर कळालं की महायुतीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते आहे. अधिकाऱ्यांना भर सभेतून दम दिला जातो. निलेश लंके ज्या शाळेत शिकतो. त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे," असा हल्लाबोल अजित पवारांनी केला आहे.


अजित पवारांनी केलेल्या टीकेबाबत प्रश्न विचारताच निलेश लंके म्हणाले की, "एखादा राजकीय नेता एखाद्या उमेदवाराच्या प्रचारात आल्यानंतर काहीतरी बोलावंच लागतं. नाही बोललं तर खालून टाळ्या पडत नाहीत. अजितदादा बोलत असताना त्यांना मागून एक चिठ्ठी देण्यात आली. ही चिठ्ठी देण्याआधी त्यांच्या भाषणाचा ट्रॅक हा देशाचा विकास, महाराष्ट्राचा विकास असा होता. मात्र चिठ्ठी देऊन त्यांना माझ्यावर व्यक्तिगत बोलण्यास भाग पाडण्यात आलं," असा आरोप लंके यांनी केला आहे. हा आरोप करत निलेश लंके यांनी अजितदादांना माझ्यावर टीका करण्याची इच्छा नव्हती, मात्र विखे पाटील कुटुंबाने त्यांना तसं करण्यास भाग पाडल्याचं सुचवल्याचं दिसत आहे.

दरम्यान, "अजितदादा काहीही बोलले असतील तरी ठीक आहे. त्यांचा माझ्यावर अधिकार आहे, माझाही त्यांच्यावर अधिकार आहे. त्यामुळे १३ तारखेनंतर आम्ही भेटल्यानंतर त्यावर चर्चा करू," असंही निलेश लंके यांनी म्हटलं आहे.

अजित पवार नेमकं काय म्हणाले होते?
महायुतीचे उमेदवार डॉ. सुजय विखे पाटील यांच्या प्रचारार्थ  पारनेर येथील बाजार तळावर सभा झाली. या सभेत बोलताना अजित पवार म्हणाले की, "महाराष्ट्रात माझ्या नादी लागणाऱ्यांचा पुरता मी बंदोबस्त केला आहे. निलेश लंके तू किस झाड की पत्ती है! मला इथे आल्यानंतर कळालं की महायुतीच्या कार्यकर्त्यांना दमदाटी केली जाते आहे. अधिकाऱ्यांना भर सभेतून दम दिला जातो. निलेश लंके ज्या शाळेत शिकतो. त्या शाळेचा मी हेडमास्तर आहे," असा हल्लाबोल अजित पवारांनी केला आहे.

मंत्री व्हायला निघालायस, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो", अजित पवारांनी दिले शरद पवारांच्या उमेदवाराला चॅलेंज ; कोण आहे तो उमेदवार ?

वेध माझा ऑनलाइन
 "दिलीपराव वळसे पाटलांचा शपथविधी झाला की, याची सटकली. हा म्हणाला दादांनी याला मंत्रीमंडळात घ्यायला नको होते. आता आपलं काही जमणार नाही. त्यांच्या डाव्या आणि उजव्या बाजूला बसलेल्या आमदारांना त्यांनी सांगितलं. मला त्या आमदारांनी घरी आल्या आल्या सांगितले की, ते असं म्हणत होता आणि नंतर तो तिकडे गेला. त्याला गाजर दाखवण्यात आलं आहे. त्याला साहेबांनी सांगितलं की, पुढच्या वेळेस तुच मंत्री होणार आहे. आता पुढच्या वेळेस मंत्री होण्यासाठी त्याने कारखान्याची वाट लावली, बाकीच्या सगळ्यांची वाट लावली. आता मंत्री व्हायला निघालायस, पठ्ठ्या तू आमदार कसा होतो तेच बघतो", असे म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना आव्हान दिले आहे. महायुतीचे उमेदवार शिवाजी आढळराव पाटील  यांच्या प्रचारार्थ अजित पवार यांनी सभा घेतली. यावेळी ते बोलत होते.

अजित पवार म्हणाले, घोडगंगा कारखाना अडचणीत आहे. त्यातून मार्ग काढता येऊ शकेल.  मात्र संचालक मंडळ एकत्रित हवे.अमोल कोल्हे सेलिब्रेटी आहेत, असं सांगून पाच वर्षांत लोकांकडे गेले नाहीत. तुमचे प्रश्न केंद्र आणि राज्य सरकार एकत्रित सोडवू शकते. शरद पवारांनी शिरुरचे आमदार अशोक पवार यांना मंत्रिपदाचे गाजर दाखवलय, त्यामुळे ते आपल्यासोबत आले नाहीत.  अजित पवाराने जर ठरवलं तर एखाद्याला आमदार नाही म्हणजे नाही होऊ देत.  तुझी औकात काय आहे ? असं  अजित पवारांनी म्हटलं आहे

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, पंतप्रधान पुण्यात सभेला आले होते. एकनाथ शिंदे त्यावेळी भाषणाला उठले आणि मी लगेच त्या खुर्चीवर जाऊन बसलो.  गप्पा मारायला सुरुवात केली.  गप्पा म्हणजे गावाकडच्या गप्पा नव्हत्या. मी त्यांना कांदा बंदी उठवणे कसे  गरजेचे आहे हे सांगितले.  त्यानंतर महाराष्ट्रात कांदा बंदी उठली. अशोक पवारला कारखाना चालवता येत नाही आणि आमच्यावर पावत्या फाडतो, असंही अजित पवार यांनी सांगितले.

Thursday, May 9, 2024

भाजपच्या बीड लोकसभा मतदारसंघाच्या उमेदवार पंकजा मुंडे आणि अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या रविकांत राठोड यांची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल झाली होती. आता या कथित ऑडिओ क्लिपवर पंकजा मुंडे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. “खरंतर अर्ज मागे घेण्याची तारीख माझ्या मते 26 एप्रिल होती. त्या दिवसाचं संभाषण नेमकं पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सभेनंतर व्हायरल होतंय. त्यामुळे हे मला कळत नाही की हे काय आहे? त्या व्यक्तीचा आणि माझा काही परिचय नाही. ते राष्ट्रवादीशी संबंधित व्यक्ती होते. पालकमंत्री धनंजय मुंडे यांनी त्यांना सांगितलं, की बाबा तू फॉर्म भरू नको कारण त्यांनी राष्ट्रवादीमधील नाराजीमुळे फॉर्म भरला होता. त्यामुळे पालकमंत्र्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर त्या व्यक्तीने सांगितलं की, मला पंकजाताई स्वतः बोलल्या पाहिजेत. त्यामुळे मला धनंजय भाऊंचा स्वतः निरोप आला. म्हणून मी त्यांना बोलले”, असा खुलासा पंकजा मुंडे यांनी केला.

“माझ्या एका कार्यकर्त्याच्या फोनवर त्यांनी फोन लावून दिला, त्यांच्याशी मी जे बोलले ते जे संभाषण आहे, ते मी ऐकलं नाही. मात्र मला आत्मविश्वास आहे, तुम्ही हजार वेळा लावलं तरी त्यामध्ये काही अवैध, गैर आणि असंविधानिक बोलले नाही. ते मला काही त्यांच्या मागण्या ठेवत होते, पण ती क्लिप पूर्ण आहे की एडिट आहे? हे मला माहीत नाही. तेच म्हणाले माझ्या अवकातीत काय आहे, ते प्रयत्न करेन. आणि यामध्ये काही असंविधानिक नाही”, असा दावा पंकजा मुंडे यांनी केला.

‘मी त्यांना समोरून फोन केला नाही’
“जर एखादा पक्षाचा कार्यकर्ता रुसून फॉर्म भरत असेल आणि त्याला त्याचे नेते सांगत असतील की फॉर्म काढ, तर ती त्यांच्यातील आपसातली चर्चा आहे. मात्र त्यांनी इच्छा व्यक्त केली, माझ्याशी बोलायची. मी त्यांना समोरून फोन केला, असं झालं नाही. त्यांनी इच्छा व्यक्त केली, माझ्याशी बोलायची आणि मी त्यांना बोलले आणि यामुळेच मला यामध्ये असं काहीच वाटत नाही की ते आक्षेपाहार्य आहे”, असं पंकजा मुंडे यांनी स्पष्ट केलं. “महाराष्ट्रातील कोणत्याही गोष्टीची चर्चा थांबवायचे असेल तर पंकजा मुंडेंची बातमी करा, या ट्रेंडची मला सवय झाली आहे”, असंदेखील पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या.

अजितदादांच्या आरोपांना सुप्रिया सुळेंचं प्रत्युत्तर ; म्हणाल्या...त्याचा हिशोब करा ;

वेध माझा ऑनलाइन।
मी शरद पवार यांचा मुलगा असतो तर मला संधी मिळाली असती… पण केवळ मी त्यांचा मुलगा नाही, म्हणून मला संधी मिळाली नाही, असं विधान अजित पवार यांनी शिरूरमध्ये बोलताना केलं. त्यांच्या या वक्तव्याला सुप्रिया सुळेंनी प्रत्युत्तर दिलं आहे. आता मला त्यांचा स्वभाव माहीत आहे. तुम्हीच तुलना करा ना… कोणाला काय मिळालं? याचा हिशोब करा. मला काय मिळालं आणि अजितदादांना काय काय मिळालं. सगळं तुमच्या समोर आहे. सगळं स्पष्ट होईल. खूप सोपं उत्तरं आहे, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.


चंद्रकांत पाटील यांच्या विधानावर सुप्रिया सुळे बोलल्या
चंद्रकांत पाटलांनी बारामतीत असं बोलायला नको होतं. मुळात हे वक्तव्य दीड महिन्यांपूर्वी केलं होतं. आम्हाला वेदना देणारं हे वक्तव्य आहे. शरद पवारांना संपवायचं आहे, असे शब्द चंद्रकांतदादांचे होते. ते असं का बोलले होते, हे आम्हाला समजलं नव्हतं. मात्र गेली महिनाभर यावर कोणी बोललं नाही. ही प्रवृत्ती वाईट आहे. आम्ही संविधानाच्या चौकटीत राहून काम केलं आहे. अशात संपवायची भाषा खूप धक्कादायक आणि दुर्दैवी होतं. लोकशाहीत असं चालत नाही, 
लोकशाहीत संपवायची भाषा नसते. सत्तेतील नेते बारामतीत येऊन पवारांना संपवायची भाषा करतात हे दुर्दैवी आहे, असंही सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत

छगन भुजबळांकडून शरद पवारांच्या 'तुतारी'चा प्रचार, शिवसेना आमदाराच्या आरोपानं खळबळ



वेध माझा ऑनलाइन।
महायुतीचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार गटाच्या तुतारी या निवडणूक चिन्हाचा प्रचार करत आहेत असा आरोप एकनाथ शिंदे गटाच्या आमदारानं केल्याने खळबळ उडाली आहे

महायुतीचे नेते छगन भुजबळ हे शरद पवार गटाच्या तुतारी या निवडणूक चिन्हाचा प्रचार करत असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. सुहास कांदे मेळाव्यात बोलत असताना त्यांनी छगन भुजबळांवर हल्लाबोल केला आहे. तर छगन भुजबळ यांचे कार्यकर्ते हे नाशिक जिल्ह्यातील दिंडोरीमध्ये फिरतात आणि भंगरे यांच्यासोबत फिरतात, असा आरोपही सुहास कांदे यांनी केला आहे. दरम्यान, मंत्री छगन भुजबळ हे स्वतः नाशिकमधून लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छूक होते इतकंच नाहीतर शेवटपर्यंत त्यांच्या नावाची चर्चा होती. मात्र शिंदे यांच्या शिवसेनेतील खासदार हेमंत गोडसे यांना पुन्हा लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली. यानंतर छगन भुजबळ नाराज असल्याच्या चर्चाही राजकीय वर्तुळात सुरू होत्या. या चर्चांवर प्रतिक्रिया देत त्यावेळी छगन भुजबळ यांनी पुर्णविराम दिला होता. अशातच सुहास कांदे यांनी भर मेळाव्यातील सभेत भुजबळांवर आरोप केला आहे



Wednesday, May 8, 2024

कन्येकडे महाराष्ट्राच नेतृत्व देण्याची विनंती शरद पवारांनी काँग्रेसकडे केली होती./ काँग्रेसमध्ये विलीनिकरण करण्याबाबतच्या शरद पवारांच्या विधानावर माजी काँग्रेस नेत्याचा मोठा दावा ;

वेध माझा ऑनलाइन।
महाराष्ट्राच्या राजकारणतील दिग्गज नेते शरद पवार यांनी आज एक मोठं विधान केलं. लोकसभा निवडणुकीनंतर अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होऊ शकतात, असं माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी म्हटलं आहे. यानंतर शरद पवार यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार का? या विषयी विविध चर्चा सुरु झाल्या आहेत. आता एका माजी काँग्रेस नेत्याने या बद्दल मोठा दावा केला आहे. “शरद पवार अनेक दिवसांपासून आपला पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करण्याचा विचार करत होते. शरद पवार यांनी आपल्या मुलीला महाराष्ट्रात काँग्रेसचे नेतृत्व सोपवण्याची विनंती केली होती. ती काँग्रेसने फेटाळून लावली” असं दावा संजय निरुपम यांनी केला. संजय निरुपम मागची अनेक वर्ष काँग्रेसमध्ये होते. मुंबईत लोकसभेच्या जागावाटपावरुन त्यांचं पक्षासोबत बिनसलं. त्यांनी नुकताच शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय.

“बुडत्या पक्षाला वाचवण्यासाठी त्यांच्या मुलीकडे असलेली राजकीय कुशाग्र बुद्धिमत्ता अपुरी आहे. काँग्रेसनेही त्यांना अनेकदा हा प्रस्ताव दिला होता. मुलीबाबत समस्या होती. आता त्यांच्या पक्षाचे विघटन झाले आहे. त्यांच्या ताज्या विधानाचा अर्थ असा आहे की, बारामती त्यांच्या हातातून निसटून जाऊ शकते, कदाचित त्यांना तशी भीती वाटते. काँग्रेसमध्ये विलीन होण्याशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही” असं संजय निरुपम म्हणाले.
आपल्या पक्षाच्या विलीनीकरणा संदर्भात शरद पवार म्हणाले की, “काँग्रेस पक्ष आणि आमच्यात काही फरक मला दिसत नाही. या दोन्ही पक्षांची विचारसरणी गांधी आणि नेहरू यांच्या विचारांची आहे. परंतु यावर मी सहकाऱ्यांचा सल्ला घेतल्याशिवाय आता काही बोलत नाही. परंतु वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु नरेंद्र मोदी यांच्याशी जुळवून घेणे कठीण आहे”

महाराष्ट्रात 11 जागांवर मतदान, कुठं किती टक्के मतदान? कुठं झाली कमाल तर कुठं वाढलं टेन्शन?

वेध माझा ऑनलाईन
महाराष्ट्रात नुकतंच लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ५३.४० टक्के मतदान झाल्याची नोंद. आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी पाचपर्यंत सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर ६३. ७१ तर सर्वात कमी ४५.६८ टक्के मतदान हे बारामतीमध्ये झालंय.

महाराष्ट्रात नुकतंच लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदान झालं. संध्याकाळी ५ वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार ५३.४० टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. कोल्हापुरात सर्वाधिक मतदान झालं तर बारामतीमध्ये सर्वात कमी मतदान झालंय. महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात ५ जागांवर ६१.९ टक्के मतदान झालं. ८ जागांवर दुसऱ्या टप्प्यात ५९. ६ टक्के तर तिसऱ्या टप्प्यात ११ जागांवर ५३. ४० टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या आकडेवारीनुसार, संध्याकाळी पाच वाजेपर्यंत सर्वाधिक मतदान हे कोल्हापूर ६३. ७१ टक्के तर सर्वात कमी ४५.६८ टक्के मतदान हे बारामतीमध्ये झालंय. काँग्रेसने आमदारांना मतदानाची खास जबाबदारी सोपवली होती. त्याचा परिणाम कोल्हापुरातील मतदानाच्या टक्केवारीवरून दिसतोय. 



एकनाथ शिंदे म्हणाले होते...ईडी-सीबीआयवाले माझ्या मागे लागलेत…”, राऊतांनी सांगितला अयोध्या दौऱ्यातील प्रसंग

वेध माझा ऑनलाइन
एकनाथ शिंदे कसले शिवसैनिक? यांच्यासारखा डरपोक शिवसैनिक मी माझ्या आयुष्यात पाहिलेला नाही, असं म्हणत शिवसेनेच्या ठाकरे गटातील खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला आहे. संजय राऊत म्हणाले, “ते अटकेच्या भितीने भाजपाबरोबर पळून गेले.” शिवसेनेच्या ठाकरे गटाचे ठाणे लोकसभेचे उमेदवार राजन विचारे (विद्यमान खासदार) यांच्या प्रचारार्थ शिवसेनेने ठाण्यात आयोजित केलेल्या प्रचारसभेत संजय राऊत बोलत होते. यावेळी राऊत यांनी शिवसेना फुटण्यापूर्वी त्यांच्यात आणि एकनाथ शिंदेंमध्ये झालेलं संभाषण सांगितलं. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना ते शिवसेनेच्या सर्व आमदार, खासदारांना घेऊन अयोध्या दौऱ्यावर गेले होते. तेव्हाचा प्रसंग संजय राऊत यांनी सांगितला.

संजय राऊत म्हणाले, आम्ही सर्वजण १५ जून २०२२ रोजी अयोध्या दौऱ्यावर गेलो होतो. तेव्हा राजन विचारे, एकनाथ शिंदे यांच्यासह अनेक मंत्री, शिवसेनेचे आमदार, खासदार आमच्याबरोबर होते. आम्ही अयोध्या दौऱ्यावर असताना १४ जूनच्या रात्री हे महाशय (एकनाथ शिंदे) माझ्या खोलीत आले आणि मला म्हणाले, “आपण आता काहीतरी निर्णय घ्यायला पाहिजे”. त्यावर मी त्यांना विचारलं, “काय निर्णय घ्यायचा?” तर ते मला म्हणाले, “हे काही माझं तुरुंगात जायचं वय नाही.” मी त्यांना विचारलं, “तुम्हाला तुरुंगात कोण टाकतंय?” तर ते मला म्हणाले, “मला भीती वाटते, मी तुरुंगात जाऊ शकत नाही”. आमचा हा संवाद अयोध्येत रामाच्या साक्षीने चालला होता. ज्या रामाच्या प्राणप्रतिष्ठेला हे महाशय पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर गेले होते, त्या श्रीरामाच्या साक्षीने हा संवाद चालू होता.

संजय राऊत यांनी सांगितलं की, एकनाथ शिंदे मला म्हणाले, “तुम्ही काहीतरी करा…” त्यावर मी त्यांना विचारलं, “काय करायचं?” तर ते मला म्हणाले, “आपण मोदींबरोबर जायला पाहिजे”. मी त्यांना म्हटलं, “मोदींबरोबर का जायचं? इथे आपलं सगळं चांगलं चाललंय. आपल्या शिवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे हे या राज्याचे मुख्यमंत्री आहेत आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या पाठीशी उभा आहे. राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेचं सरकार उत्तमपणे चाललं आहे. उद्धव ठाकरे यांच्या राज्यकारभाराने गती पकडली आहे आणि तुम्ही म्हणताय हा निर्णय बदलायला हवा, कशासाठी बदलायचा?” त्यावर ते मला एवढंच म्हणाले, माझी तुरुंगात जायची इच्छा नाही. “मी त्यांना (एकनाथ शिंदे) विचारलं तुम्हाला तुरुंगात कोण आणि का पाठवतंय? तुम्ही या राष्ट्रासाठी असं काय क्रांतिकारक काम केलं आहे? शहीद भगतसिंग, सुखदेव, राजगुरू आणि स्वातंत्र्यवीर सावरकरांसारखं असं काय कार्य केलं आहे? तुम्ही असं कोणतं भूमिगत कार्य केलं आहे की ज्यामुळे या देशाची सत्ता तुम्हाला तुरुंगात पाठवायला निघाली आहे?” त्यावर ते मला म्हणाले, “माझ्या मागे ईडी आणि सीबीआयवाले लागले आहेत”. मी त्यांना लगेच म्हटलं, “ईडी आणि सीबीआयवाले उगाच कोणाच्या मागे लागत नाहीत. ते माझ्याही मागे लागले होते, मात्र त्यांना मला सोडावं लागलं. त्यांना वाटलं, याला जास्त दिवस डांबून ठेवलं तर हा भिंती फोडून बाहेर येईल. त्यामुळे तुम्हाला कशाला फोन पकडतंय.” त्यावर ते मला म्हणाले, ‘आता आपल्याला निर्णय घ्यावा लागेल, मी काही तुरुंगात जाणार नाही.” याचा अर्थ हे महाशय घाबरून पळून गेले आहेत. म्हणजेच यांच्याकडे निष्ठा, नैतिकता, विचार असं काहीच नाही.

Tuesday, May 7, 2024

मतदानावेळी सुप्रिया सुळे अजितदादांच्या घरी ? अजित पवारांच्या बंगल्यावर सुप्रिया सुळे का आल्या? काय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन।
बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी चुरशीची लढत रंगत असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी का पोहोचल्या? राजकीय वर्तुळात उलट-सुलट चर्चा सुरू झाल्यानंतर सुप्रिया सुळे यांनी दादांच्या घरी जाण्याचं कारण सांगितलं...

मतदान सुरू असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवार यांच्या काटेवाडीतील घरी आल्या. बारामतीत सुप्रिया सुळे विरूद्ध सुनेत्रा पवार अशी चुरशीची लढत रंगत असताना सुप्रिया सुळे अचानक अजित पवारांच्या घरी का पोहोचल्या? अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली. यानंतर सुप्रिया सुळे यांनी दादांच्या घरी जाण्याचं कारण सांगितलं. आपण अजित पवारांच्या भेटीसाठी नाहीतर अजित पवारांच्या आई आशा काकूंच्या भेटीसाठी आल्याचे सुप्रिया सुळेंनी म्हटलं. सुप्रिया सुळे जेव्हा घरी आल्या तेव्हा अजित पवार घरीच होते मात्र आपली त्यांच्याशी भेट झाली नाही. तसेच आशा काकींचे आशीर्वाद घेण्यासाठी आल्याचे सुळेंनी म्हटलं तर अजित पवारांनी यावर अधिक न बोलता, आपल्याला काही माहिती नाही तर मी घरीच नव्हतो अशी प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली...