वेध माझा ऑनलाइन।
लोकसभेनंतर आता महायुतीतील नेत्यांना विधानसभा निवडणुकांच्या जागावाटपाही डोकेदु:खीचं ठरत असल्याचं पाहायला मिळत आहे. कारण, एका-एका जागेवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे समर्थक आणि भाजपचे स्थानिक नेते आपल्या मतदारसंघातील जागेसाठी आग्रही असल्याचे दिसून येते. महायुतीत सध्याच्या जागावाटपानुसार विद्यमान आमदार असलेली जागा त्या त्या पक्षाला मिळणार असल्याचे स्पष्ट आहे. त्यामुळे, भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सबंधित जागेवर इच्छुक असलेल्या इतर उमेदवारांना महाविकास आघाडी किंवा इतर पक्षांचा पर्याय शोधावा लागत आहे. इंदापूरमधील विधानसभेची महायुतीत राष्ट्रवादी काँग्रेसकडे जाईल. कारण, सध्या तिथे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार आहेत. मात्र, ही जागा आपणास लढवायची असल्याचे सांगत भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांनी जाहीरपणे भूमिका स्पष्ट केली आहे. त्यामुळे, भाजपची अडचण वाढली आहे. आता, राष्ट्रवादी काँग्रेसकडून दौंड येथील जागेवरही दावा करण्यात आला आहे. त्यामुळे, महायुतीतील डोकेदु:खी वाढत असल्याचे दिसून येते.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निकटवर्तीय आणि दौंड शुगर्सचे संचालक वीरधवल जगदाळे यांनी पक्षाचे प्रमुख अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून दौंडमधील जागा महायुतीत राष्ट्रवादीला सोडावी, अशी मागणी केली आहे. मात्र, सध्या या जागेवर भाजप नेते राहुल कुल हे विद्यमान आमदार आहे. त्यामुळे, महायुतीतील विद्यमान आमदाराच्या जागेनुसार ही जागा भाजपच्या वाटेला जाते. त्यामुळे, महायुतीत पुन्हा एकदा क्लिष्ट निर्माण होण्याची शक्यता आहे.
No comments:
Post a Comment