Monday, September 2, 2024

जे आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वत:च कर्तृत्व नसताना पळवून नेतात, त्यांच्या तोंडात मर्दांनगीची भाषा शोभत नाही ; अजितदादाना संजय राऊत यांचे उत्तर ;

वेध माझा ऑनलाइन।
छत्रपती शिवाजी महाराजांचा सिंधुदुर्गातील राजकोट किल्ल्यावर उभारलेला पुतळा आठ महिन्यात कोसळल्यानंतर महाविकासआघाडीचे नेते रस्त्यावर उतरले होते. या नेत्यांनी मुंबईतील गेटवे परिसरात जोडे मारा आंदोलन केले. त्या आंदोलनावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी “हिंमत असेल तर समोर या. रडीचा डाव कसला खेळताय”, अशा शब्दात टीका केली. या टीकेला आता शिवसेना खासदार संजय राऊतांनी प्रत्युत्तर दिले आहे. “जे आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वत:च कर्तृत्व नसताना पळवून नेतात, त्यांच्या तोंडात मर्दांनगीची भाषा शोभत नाही”, अशा शब्दात संजय राऊतांनी अजित पवारांवर हल्लाबोल केला.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना अजित पवारांच्या जोडे मारो आंदोलनावरील टीकेबद्दल विचारणा करण्यात आली. त्यावर बोलताना संजय राऊतांनी अजित पवारांचा खरपूस समाचार घेतला. “जो आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वत:च कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शाहांच्या ताकदीचा वापर करुन पळवून नेतात, त्यांच्या तोंडात अशी मर्दांनगीची भाषा शोभत नाही”, अशी खोचक टीका शिवसेना खासदार संजय राऊतांनी केली.

संजय राऊत काय म्हणाले?
“रडीचा डाव कुणीही खेळत नाही. जो आपल्या काकांचा पक्ष आणि चिन्ह स्वत:च कर्तृत्व नसताना फक्त मोदी आणि शाहांच्या ताकदीचा वापर करुन पळवून नेतात, त्यांनी अशी भाषा वापरु नये. त्यांच्यात कर्तृत्व असेल तर त्यांनी स्वत:चा पक्ष स्थापन करावा, निवडणुका लढवाव्यात. जे चोरी करुन राजकारणात आले आहेत मग ते मिंधे असतील नाहीतर अजित दादा असतील, त्यांच्या तोंडात अशी मर्दांनगीची भाषा शोभत नाही”, असे संजय राऊत म्हणाले.

No comments:

Post a Comment