Sunday, September 8, 2024

गणेश चतुर्थीचेनिमित्त शिंदे सरकार कडून पुन्हा एकदा ‘आनंदाचा शिधा’ ; अवघ्या १०० रुपयांत मिळणार या ४ वस्तू ;

वेध माझां ऑनलाइन।
सध्या सर्वत्र गणेशोत्सवाची धूम असून प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पा विराजमान झाले आहेत. गणरायाच्या आगमनाने सर्वांच्या मनात उत्साह आणि आनंदाचे वातावरण आहे. आता याच आनंदात सरकारच्या एका निर्णयाने आणखी भर पडली आहे. गणेश चतुर्थीचे निमित्त साधून शिंदे सरकार कडून पुन्हा एकदा ‘आनंदाचा शिधा’ या उपक्रमाचे वाटप करण्यात येणार आहे. हा आनंदाचा शिधा यंदाही अवघ्या १०० रुपयांत उपलब्ध असून सर्वसामान्य जनतेला या माध्यमातून ४ वस्तू देण्यात येणार आहेत.

या योजनेन्तर्गत पात्र कुटुंबांना फक्त 100 रुपयांत चणाडाळ, तेल, साखर, रवा अशा ४ वस्तू मिळणार आहे. यात चणाडाळ 1 किलो, सोयाबीन तेल 1 लिटर, साखर 1 किलो, आणि रवा 1 किलो मिळेल. राज्यातील सर्वसामान्य आणि गरीब जनतेचा सण गोड़ व्हावा यासाठी सरकार हा उपक्रम राबवत आहे. मात्र यासाठी काही अटी सुद्धा आहेत. त्याची पूर्तता झाल्यानंतरच आनंदाचा शिधा मिळणार आहे.
आनंदाचा शिधा वाटपासाठी सरकारकडून तब्बल 562 कोटी रुपयांचा खर्च करण्यात येणार आहेत. जे कुटुंब अंत्योदय अन्न योजना शिधापत्रिकाधरक आहे त्यांना सरकारच्या या उपक्रमाचा लाभ मिळणार आहे. सोबतच प्राधान्य कुटुंब शिधापत्रिकाधारकांनाही हा आनंदाचा शिधा दिला जाईल. 

No comments:

Post a Comment