कराड शहरातील बुधवार पेठेतील जुना पटेल दवाखाना ते औंधकर हॉस्पिटलपर्यंतच्या भाजी मंडईवरून स्थानिक नागरिकांसह डॉक्टरांनी सोमवारी कराड नगर पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना घेराव घातला.आक्रमक झालेल्या नागरिकांनी मुख्याधिकाऱ्यांना भाजीमंडई तत्काळ हटवावी अन्यथा येत्या काळात तीव्र स्वरूपात ठिय्या आंदोलन करू, अशा इशाराही यावेळी देण्यात आला.
कराड येथील बुधवार पेठेतील रस्त्याकडेला बसणाऱ्या मण्डईमुळे स्थानिक नागरिकांना तसेच येथे असणाऱ्या होस्पिटल व डॉक्टरांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत अनेकवेळा कारवाई करण्याची मागणी करून देखील पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष केले जात असल्याने आक्रमक झालेल्या स्थानिक नागरिकांसह डॉक्टरांनी आज मुख्याधिकाऱ्यांची पालिकेत जाऊन भेट घेतली. तसेच मागण्यांचे त्यांना निवेदन देत आंदोलनाचा इशारा देखील दिला.
यावेळी मुख्याधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, बुधवार पेठ मधील वर नमूद केलेल्या रस्त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला आम्ही अर्जदार कायमचे रहिवासी आहोत.मण्डई ने या रस्त्यावर बसू नये. कारण या ठिकाणी डॉक्टर मोहोळकर हॉस्पिटल डॉक्टर पटेल यादव हॉस्पिटल आणि औंधकर हॉस्पिटल आहेत. त्यामुळे या हॉस्पिटलमध्ये पेशंट येतात त्यांना हॉस्पिटलमध्ये येता जाता या ठिकाणी ट्राफिक जाम होत असते.याकडे नगरपरिषद कराड मधील संबंधित विभाग यांचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे येथील रहिवासी नागरिकाना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. घरासमोर दरवाजामध्ये शेतकरी/व्यापारी बाजार घेऊन टेम्पो या सारख्या मोठ्या गाड्या घेऊन बसल्यामुळे तेथील रहवासि लोकांना त्याठिकानी ये जा करता येत नाही. तसेच त्या भागातील अर्धा भाग हा TP आणि गावठाण असल्यामुळे अडचणींचा रस्ता आहे. त्याभागात जर अचानक रुग्ण आला तर वरील अडचणीमुळे पेशंटचा जीव जाण्याची शक्यता असल्यामुळे आपण सदर प्रकरणी व्यक्तिशः लक्ष घालून गाभीर्यपूर्वक दखल घ्यावी. या अनुषंगाने बुधवारपेठ मधील सामाजिक कार्यक्रत्यांनी गेली एक वर्षाहून अधिक पाठपुरावा केलेला आहे तरी याची दखल घेतली नाहीतर मुख्याधिकारी खंदारे यांच्या दालानाबाहेर ठिय्या आंदोलन करन्यात येईल अशा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
No comments:
Post a Comment