वेध माझा ऑनलाइन।
भाजपचे सांगलीतील माजी खासदार संजय पाटील यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. कवठेमहांकाळचे माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना मारहाण केल्याबद्दल संजय पाटील आणि खंडू होवाळे यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कवठेमहांकाळ येथील राष्ट्रवादीचे नेते माजी उपनगराध्यक्ष अय्याज मुल्ला यांना माजी खासदार संजय पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी घरात घुसून मारहाण केल्याची घटना घडली. माजी खासदार आणि त्यांच्या समर्थकांनी मुल्ला यांच्या घरातील इतर महिला आणि मुलांनाही मारहाण केली असा आरोप आहे. यावेळी मुल्ला यांना वाचवायला आलेल्या त्यांच्या 76 वर्षीय आईलाही स्वतः माजी खासदारांनी ढकलून दिलं असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान या घटनेनंतर राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या आमदार सुमन पाटील आणि युवा नेते रोहित पाटील यांनी पोलीस ठाण्यात तळ ठोकला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आक्रमक झाले. माजी खासदार संजय पाटील यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
No comments:
Post a Comment