Thursday, September 5, 2024

आपटेच्या बायकोनेच दिली पोलिसांना माहीती... !!त्यानन्तर आपटेला झाली अटक.....क़ाय आहे बातमी ?

वेध माझा ऑनलाइन।
राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडल्यानंतर पोलीस ज्याचा दिवसरात्र शोध घेत होते तो शिल्पकार जयदीप आपटे पोलिसांच्या तावडीत सापडला आहे. पोलिसांनी बुधवारी संध्याकाळी त्याला कल्याणमधील घराच्या परिसरातून ताब्यात घेतले. जयदीप आपटे हा कोणालाही पत्ता लागू नये यासाठी डोक्यावर टोपी आणि चेहऱ्यावर मास्क घालून इमारतीमध्ये शिरत होता. मात्र, यावेळी इमारतीच्या प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या पोलिसांनी जयदीप आपटेला ताब्यात घेतले.गेल्या अनेक दिवसांपासून मालवणी पोलीस, कल्याण ग्रामीण आणि ठाणे पोलिसांची पाच पथकं जयदीप आपटेचा शोध घेत होती. परंतु, जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागला नव्हता. परंतु, बुधवारी जयदीप आपटेच्या पत्नीनेच पोलिसांना माहिती दिल्यामुळे आपटे पोलिसांच्या हाती लागल्याचे सांगितले जात आहे. जयदीप आपटेचे वर्कशॉप त्याच्या घराजवळच आहे. या परिसरातच काल त्याला ताब्यात घेण्यात आले. जयदीप आपटे याने त्याची पत्नी निशिगंधा हिच्याशी संपर्क साधून घरी परत येत असल्याची माहिती दिली होती. तिनेच पोलिसांना जयदीप घरी येत असल्याचे सांगितले. जयदीपने घरी परत यावे आणि तपासात सहकार्य करावे, अशी त्याच्या पत्नीची इच्छा होती. त्यामुळे पत्नीने जयदीप आपटे हा घरी येणार असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पोलिसांनी इमारतीच्या प्रवेशद्वारावर सापळा रचून जयदीप आपटेला अटक केली.

No comments:

Post a Comment