Sunday, September 1, 2024

गॅस सिलेंडर महागला ; वाचा बातमी...

वेध माझा ऑनलाइन।

आज सप्टेंबर महिन्याच्या पहिल्याच दिवशी गॅस सिलेंडरच्या किमतीत वाढ झाली आहे. मात्र हि दरवाढ घरगुती गॅस सिलेंडरसाठी नव्हे तर व्यावसायिक गॅस सिलेंडरसाठी करण्यात आली आहे. आजपासून व्यावसायिक गॅस सिलेंडरच्या किमती 39 रुपयांनी वाढलेल्या आहेत. तेल विपणन कंपन्यांनी हि नवीन दरवाढ लागू केली आहे. ऑगस्ट महिन्यात सुद्धा व्यावसायिक गॅस सिलिंडरचे भाव वाढले होते, आता या किमती आणखी महाग झाल्यामुळे हॉटेलचे जेवण आता परवडणार नाही.

No comments:

Post a Comment