आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटातून बाहेर पडून उद्धव ठाकरेंचे नेतृत्व मान्य केलेले कराड चे नगरसेवक इंद्रजित गुजर यांनी आता मिशन विधानसभा असे शहरातून बोर्ड लावून पृथ्वीराज चव्हाण यांची डोकेदुखी वाढवली आहे महाविकास आघाडीचे घटक असूनही त्यांनी शिवसेनेसाठी या मतदारसंघात आपला क्लेम सांगितला आहे...त्यामुळे या मतदार संघात महा विकास आघाडित फुट पडली की क़ाय ?अशी चर्चा आहे... हा मतदार संघ काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे मात्र शिवसेनेचे दिवंगत अशोकराव भावके तसेच अजिंक्य डी वाय पाटील अशा उमेदवारांनी याठिकाणी आपले नशीब आजमावले आहे... पाहूया आता इंद्रजित गुजर यांचे नशीब काय म्हणतय ते ...
नगरसेवक इंद्रजित गुजर हे अपक्ष म्हणून निवडून आले आहेत त्यानंतर ते आ पृथ्वीराज चव्हाण यांच्या गटाबरोबर दिसू लागले होते गेली पाच वर्षे त्यांनी चव्हाण गटात आपले स्थान निर्माण केले होते... त्यांच्या जोडीला नगरसेवक अप्पा माने हे देखील होते... नगरसेवक माने हे काँग्रेसचे शहर अध्यक्ष होते मात्र गेल्या वर्षी त्यांना या पदावरुन अचानक पाय उतार व्हावे लागले... त्यानंतर आ पृथ्वीराज चव्हाण गटाशी माने व गुजर यांची जवळीक कमी झाल्याचे जाणवले... सध्या अप्पा माने हे डॉ अतुल भोसले यांच्याशी जवळीक करून आहेत... तर इंद्रजित गुजर यांनी थेट मुंबई गाठत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे... सध्या सातारा जिल्ह्याचे समनव्यक म्हणून ते काम पाहतात... उद्धव ठाकरे व संजय राऊत यांचे विशेष प्रेम त्यांच्यावर आहे... त्या दोघांबरोबर गुजर प्रत्येक मुंबईतील कार्यक्रमात दिसतात... गुजर सध्या कराड दक्षिण च्या होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत उमेदवारी करिता इच्छुक आहेत... त्यांनी त्यासाठीची तयारी देखील चालू केली आहे... निवडणुकीला कमी कालावधी आहे त्यामध्ये गुजर हे या मतदारसंघातून संवाद यात्रा काढणार असल्याचे सांगतात...त्यांना शिवसेना म्हणून कितपत आणि कसा प्रतिसाद मिळतो ते पहावे लागेल... गुजर हे प्रसिद्ध क्रिकेट प्लेयर आहेत...त्यांना जिल्यात व राज्यात कॅप्टन म्हणून ओळखतात...क्रिकेट खेळाच्या माध्यमातून त्यांचा शहर व ग्रामीण भागात खूप मोठा संपर्क आहे... शिवसेनेत प्रवेश केल्यापासून त्यांनी कराड शहर तसेच कराड उत्तर व दक्षिणमधे मिळून 70 ते 80 शाखा ओपन केल्याचे ते सांगतात... उद्धव ठाकरेंच्या हस्ते या शाखांचे लवकरच उद्घाटन घेण्याचा त्यांचा मानस आहे त्यादरम्यान आता ही निवडणूक जाहीर झाल्याने इंद्रजीत गुजर हे सगळे कार्यक्रम कसे मॅनेज करतात तेच पहावे लागेल...
दरम्यान या मतदार संघात आ पृथ्वीराज चव्हाण यांची सलग दोनदा आमदार म्हणून वर्णी लागली आहे... त्यांची ही आता तिसरी निवडणुकीची टर्म असेल... पण कराड च्या महाविकास आघाडीत फूट पडून जर इंद्रजित गुजर याठिकाणी बंडख़ोर म्हणून उभे राहिले... तर भाजपच्या उमेदवाराला ही निवडणूक सोपी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही... म्हणूनच खऱ्या अर्थाने आ चव्हाण यांची याठिकाणी डोकेदुखी वाढेल असे चित्र निर्माण होऊ शकते...पाहूया पुढे काय होते ते...
No comments:
Post a Comment