Monday, September 2, 2024

सकाळी दूधवालाही उठतो… सुप्रिया सुळे यांच्या टीकेवर अजितदादा यांचा पलटवार ; वाचा बातमी-

वेध माझा ऑनलाइन।
उपमुख्यमंत्री अजित पवार हे सध्या राज्याचा दौरा करत आहे. कानोकोपऱ्यात जाऊन ते सरकारने केलेल्या कामांचा आणि योजनेचा प्रसार करत आहेत. या दरम्यान त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या टीकेला उत्तर दिले आहे. दुधवाला ही सकाळी उठतो अशी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती.

उपमुख्यमंत्री अजित पवार सध्या राज्याच्या दौऱ्यावर आहेत. लाडकी बहीण योजनेचा शुभांरभ झाल्यानंतर ते राज्यातील वेगवेगळ्या गांवांमध्ये भेटी देत आहेत. दुसरीकडे पावसाने अनेक जिल्ह्यांना झोडपले आहे. याबाबत बोलताना ते म्हणालेकी, पावसाने मोठं नुकसान झालं आहे. सर्वांना मदत दिली जाणार आहे. यासाठी पंचनामे करायला सांगितले आहेय  मी राज्याचा दौरा करत असल्यामुळे इकडे येता येत नाही.  अजित पवार यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर ही टीका केली आहे. सकाळी दूधवालाही उठतो अशी बोचरी टीका सुप्रिया सुळे यांनी केली होती. त्यावरुन अदित पवाप यांंनी पलटवार केला आहे. अजित पवार म्हणाले की, काहीजण म्हणतात सकाळी दूधवाला पण उठतो, बोलू द्या त्यांना आपल्याला भोकं पडणार नाहीत. योजना पुढे चालू ठेवायच्या असतील तर घड्याळाकडे लक्ष द्यायला पाहिजे.

अजित पवार पुढे म्हणाले की, ‘गुलाबी रंग काय वाईट दिसतो का?. मी माणूस आहे. काही चुक होऊ शकते. राज्यातील 287 मतदारसंघ आहेत त्यामध्ये सर्वात जास्त विकासनिधी तुमच्या बारामतीत दिला. मी लवकरच बारामतीची ब्ल्यू प्रिंट काढणार आहे. बारामतीत कॅन्सर हॉस्पिटल काढणार आहे. करण्याची धमक असली पाहिजे, नेतृत्व तसं पाहिजे. राजकीय टीका टिपण्णी करायची नाही.’

‘राजकोट किल्ल्यावर शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, जे घडायला नको होते ते घडले. मी त्याबद्दल महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागितली मात्र यामध्ये ज्या कुणाची चूक असेल त्याला शिक्षा झाली पाहिजे, तो कुणीही असो आणि पुन्हा भव्य स्मारक करण्यात येणार आहे.’
‘आता काहींनी जोडे मारो आंदोलन केले. आमच्या फोटोला जोडे मारलेत, अरे कसे जोडे मारतात. हिंमत असेल तर समोर या ना.  कुठल्या सरकारला असं वाटणार पुतळा पडावा म्हणून. निवडणूकीच्या काळात संविधान बदलणार असा चुकीचा प्रचार केला. मला तुम्ही पाच वर्ष निवडून दिलं आहे. पुढे काय करायचं ते तुम्ही ठरवा, मी केलेल्या कामाचे पुस्तक काढून तुम्हाला देणार आहे.’ असं ही अजित पवार म्हणाले.

No comments:

Post a Comment