वेध माझा ऑनलाईन।
कराडच्या उड्डाणपुलावरून अजूनही रात्रीची वाहतूक सुरु दिसत नाही.रात्रीच्या वाहतुकीसाठी आवश्यक असलेली लाईटची व्यवस्था झालेली दिसत नाही.त्यामुळे बऱ्याचदा वाहतुकीला अडचणी येत आहेत.नॅशनल हायवे कडून दिवस-रात्र वाहतुकीसाठी हा उड्डाणपूल योग्य आहे हा व्यवहारिकता अहवाल आल्यावरच याचे उदघाटन करायला हवे होते.कराडच्या उड्डाणपुलाच्या उदघानाची घाई झालेली दिसते.असा टोला पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी अप्रत्यक्षपणे भाजपला लगावला.
कराड येथे काल मंगळवारी माध्यमांशी संवाद साधताना मंत्री देसाई बोलत होते.कराडच्या उड्डाणपुलावरून अजूनही रात्रीची वाहतूक होत नाही याबाबत छेडले असता त्यांनी हा टोला लगावला.
ना देसाई म्हणाले...
काही जखमा वरून बऱ्या झाल्या अशा दिसतात
होऊ घातलेल्या सातारा जिल्हा बँकेची निवडणूक आम्ही महायुती म्हणून लढवणार आहोत असे मत पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी मंगळवारी कराड येथे व्यक्त केले.यावेळी जिल्हा परिषद निवडणुकीत झालेल्या जखमा बऱ्या झाल्या म्हणायच्या काय?असे छेडले असता काही जखमावरून बऱ्या झाल्या सारख्या दिसतात असे सांगणे त्यांनी पसंत केले.
No comments:
Post a Comment