Tuesday, August 11, 2026

कराडमधील बहुचर्चित असणारा नेकलेस रोड हा होणारच आहे शहर व परिसरातील नागरिक या गोष्टीला सहमिती देतील पिडब्ल्यूडी च्या माध्यमातून हा रस्ता प्रस्तावित केलेला आज जलसंपदा विभागानेही यासाठी अप्रुअल दिल आहे कराडच्या विसासात भर टाकणारा हा असा नेकलेस रोड होणारच असल्याचे सूतोवाच आमदार डॉ अतुलबाबा भोसले यांनी आज कराड येथे केले कराडच्या विकासाआड असे कोणतेही राजकारण होऊ नये असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला 

कराडच्या प्रस्तावित नेकलेस रोड वरून कराड पालिकेतील सत्ताधारी व विरोधक यांच्यात झालेल्या सभेत मोठी खडाजंगी झाली होती आणि हा विषय तहकूब ठेवन्यात आला होता
त्यानंतर काल एका अनौपचारिक चर्चेत पत्रकारांशी बोलताना आमदार डॉक्टर अतुलबाबा भोसले म्हटले की कोणत्याही परिस्थितीत हा नेकलेस रोड होणारच मला लोकांनी परिसराच्या विकासासाठी निवडून दिल आहे त्यामुळे शहरासह दक्षिण विभागाचा न भूतो- न भविष्यती असा विकास करणे माझे कर्तव्य आहे आणि मी ते चोख पार पाडणार आहे 

पुणे- मुंबई सारख्या शहरात जाताना ज्याप्रमाणे उत्साही आणि लाईटफुल वातावरणात आपण त्याठिकाणी प्रवेश करताना आपल्याला जो दर्जेदार फील येतो तसा फील कराड शहरात येताना येईल असे काम करण्याचा माझा मानस आहे

शहर व परिसरातील ब्रिज असतील किंवा रस्ते पाणी अशा विषयांना प्रगत करत दर्जेदार स्तरावरील सुविधा देणारे शहर मला करायचं आहे माझे त्यासाठीचे सगळे प्लॅन्स तयार आहेत
पर्यायी जागा मिळत नसल्याने शहरातील स्टेडियम लवकरात- लवकर पूर्ण करणार आहोत 
तसेच शहरातील प्रस्तावित बागेची निर्मिती असेल रस्ते, तसेच दैत्यीनिवारींनी शेजारील असलेला प्रोजेक्ट देखील शहराच्या लौकिकात भर टाकणारा ठरणारा आहे

लोकांनी मला काम करण्याची संधी दिली आहे त्याचे मी सोने करणार आहे त्यासाठी कराडच्या विकासाचे स्वप्न पूर्णत्वाकडे नेणे माझे पहिले कर्तव्य आहे आणि मी ते पूर्ण करणारच आहे असा विश्वास देखील त्यांनी या पत्रकारांशी केलेल्या अनौपचारिक चर्चेत व्यक्त केला


No comments:

Post a Comment