Tuesday, August 11, 2026

माजी पालकमंत्र्यांच्या वाढदिवसासाठी फ्लेक्स लावता यावेत म्हणून पालिकेने केलेला ठराव बदलला ; झाकीर पठाण यांचा पत्रकार परिषदेत आरोप ;

वेध माझा ऑनलाईन।
कराड शहरात फ्लेक्स लावायला बंदी करण्याचा ठराव पालिकेने केला असता फक्त माजी पालकमंत्र्यांच्या वाढदिवसासाठी फ्लेक्स लावता यावेत म्हणून हा ठराव पुन्हा बदलला गेला असा आरोप काँग्रेस अल्पसंख्याक नेते झाकीर पठाण यांनी पत्रकार परिषदेत केला

ते म्हणाले...
आपण सातत्याने अनधिकृत फ्लेक्सविरोधात आवाज उठविला असून, त्यामुळे नगरपरिषदेचे उत्पन्न वाढण्यास मदत होत असल्याचा दावा त्यांनी केला.
काही महिन्यांपूर्वी आपण याबाबत तक्रार केली होती. काही नगरसेवकांनीच आपले फ्लेक्स लावून त्याचे भाडे पालिकेकडे भरले नसल्याचा आरोप करत, पालिकेचे आर्थिक नुकसान होत असल्याचा मुद्दा आपण उपस्थित केला होता, असेही पठाण यांनी सांगितले.

दरम्यान शहराच्या विकासासाठी घेतलेला ठराव दुसऱ्याच दिवशी बदलून वाढदिवसाचे फ्लेक्स लावण्यास परवानगी देणे, हे कसले विकासाचे राजकारण?’ 
असा सवाल पठाण यांनी उपस्थित केला.

या ठरावात वाढदिवसानिमित्त फ्लेक्स लावण्यास परवानगी नेमकी कोणासाठी देण्यात आली? असा प्रश्नही उपस्थित करत माजी पालकमंत्र्यांच्या वाढदिवसासाठी हा ठराव बदलला असा आरोप त्यांनी केला त्यानंतर त्यांचे बॅनर कराड शहरात लागले होते...याकडे पत्रकार परिषदेत लक्ष वेधले गेले

No comments:

Post a Comment