Monday, February 13, 2023

भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेश सरचिटणीसपदी सुदर्शन पाटसकर यांची निवड

वेध माझा ऑनलाईन - भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस (महमंत्री)पदी कराडच्या सुदर्शन पाटस्कर यांची नुकतीच निवड करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, भाजपा प्रदेश महामंत्री विक्रांतदादा पाटील भाजयुमो प्रदेशाध्यक्ष राहूल भैय्या लोणीकर यांच्या उपस्थिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते पाटसकर याना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. 

दरम्यान आपल्या निवडीबद्दल बोलताना सुदर्शन पाटसकर म्हणाले की, वडीलांचा सामाजिक कार्याचा वारसा घेवून व भाजपा प्रदेश नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली यापुढेही पक्षाच्या माध्यमातून राज्यातील युवकांचे व सर्वसामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करेन. प्रदेश नेतृत्वाने माझ्यावर टाकलेला विश्वास व ही नवी जबाबदारी नक्कीच सार्थ ठरवेन.

सुदर्शन यांची सुरवातीपासूनच पक्षाप्रती असणारी निष्ठा व सर्वसामान्यांच्या प्रश्नांच्या बाबतीत असणारी त्यांची तळमळ पाहून पक्षनेतृत्वाकडून प्रथम 2014 ला भाजयुमो कराड शहराध्यक्ष ते 2016 भाजयुमो प्रदेश चिटणीस  2021 प्रदेश उपाध्यक्ष पदी नियुक्ती केली त्यानंतर पश्चिम महाराष्ट्र विभागीय समन्वयक म्हणून त्यांना जबाबदारी दिली याबरोबरच  कोल्हापूर जिल्हा ग्रामीण व पुणे शहर, पिंपरी चिंचवड प्रभारी म्हणून देखील त्यांनी काम पाहिले
सुदर्शन हे सामाजिक क्षेत्रातील कामातही अग्रेसर दिसतात. आरोग्य शिबीर, रक्तदान शिबीर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रकारच्या आरोग्याच्या शस्त्रक्रिया करून अनेक सर्वसामान्य लोकांना नवसंजीवनी देण्याचे काम त्यांच्या माध्यमातून झाले आहे. जिल्हा मुद्रा योजना कमिटीवर असताना अनेक युवक युवतींना रोजगाराची संधी उपलब्ध करून दिली आहे. समाजातील वेगवेगळ्या विषयांतर्गत युवक, विद्यार्थी, महिला, जेष्ठ नागरीक, खेळाडू अशा सर्वच घटकांसाठी सदैव शासन दरबारी न्याय मिळवून देण्यासाठी ते तत्पर असतात.  त्यांच्या याच संघटनात्मक व सामाजिक कार्याची दखल घेत भाजपच्या प्रदेश नेतृत्वाकडून सुदर्शन पाटसकर यांची भाजयुमो प्रदेश सरचिटणीस(महमंत्री) पदी नियुक्ती करण्यात आली आहे. 

No comments:

Post a Comment