वेध माझा ऑनलाईन - कराडमध्ये सोमवार पेठेतील हाटकेश्वर रिक्षा गेट व मित्रपरिवाराच्या वतीने तेथील रामेश्वर मंदिरात महाशिवरात्री उत्सव मोठ्या भक्तिभावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला
काल महाशिवरात्रीच्या निमित्ताने सकाळी मंदिरात महादेवाची पूजा व अभिषेक सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला यावेळी दर्शनासाठी भाविकांनी मोठी रांग लावली होती अबाल वृद्ध व महिलांनी दर्शनाचा लाभ घेतला दिवसभर भक्तिगीते व भजनाचा देखील भाविकानी लाभ घेतला महाशिवरात्री निमित्त या रिक्षा गेटच्या वतीने दरवर्षी महाप्रसादाचे आयोजिन केले जाते आजही याठिकाणी महाप्रसाद आयोजित करण्यात आला होता शहर व परिसरातील हजारो भक्तांनी या प्रसादाचा लाभ घेतला
दरम्यान हाटकेश्वर रिक्षा गेट व मित्रपरिवाराच्या सदस्यांनी मिळून देवळाची रंग रंगोटी करून देवळाला लाईटच्या माळांनी सजवण्यात आले होते यामुळे या देवालयाचे रुपडे खूपच देखणे दिसत होते बहारदार मांडव घालून देवळाचा परिसर देखील उत्सवासाठी शानदार पद्धतीने सजवण्यात आला होता
या रिक्षा गेटचे नंदू पुजारी हे भाविक दरवर्षी येथील सर्व भक्तांच्या सहकार्याने हा उत्सव साजरा करण्यासाठी मोठ्या हिरीरीने सहभागी होताना दिसतात मात्र यावर्षी ते पायी नर्मदा परिक्रमा करण्यासाठी 2 महिन्यांपूर्वी गेले आहेत त्यामुळे त्यांची अनुपस्थिती आज याठिकाणी प्रकर्षाने जाणवली
दरम्यान हा उत्सव यशस्वी करण्यासाठी कुंमार घोगडे बाळासाहेब घोंगडे दिनेश जोशी योगेश जोशी प्रसाद इनामदार पिंटू जाधव शाह काका अण्णा काठाले विक्रम गरुड पाटील वाचमन खतीब चाचा इकबाल खैरतखान प्रवीण बोगाळे नरपत महाराज शहबाज खैरातखान हरी कुंभार रणजित लाटकर सचिन पावसकर सुधीर घाटे सुनील कुलकर्णी तसेच अनेक भक्तभाविकानी परिश्रम घेतले
No comments:
Post a Comment