वेध माझा ऑनलाईन - शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याबाबत खळबळजनक दावा केला आहे. गडकरी यांची भाजपमध्ये घुसमट होत आहे. भविष्यात त्यांना आणखी बाजुला सारण्यात येईल, अशा त्यांच्या गटात अफवा आहेत, असे वक्तव्य खैरे यांनी केले. ते शिवगर्जना मोहिमेअंतर्गत ते नागपुरला आले होते. यावेळी पत्रकार परिषदेदरम्यान ते बोलत होते.
काय म्हणाले चंद्रकांत खैरै -
गडकरी हे उद्धव ठाकरे यांना भेटत असतात आणि फोनवरदेखील ते बोलत असतात. ते भाजपमधील चांगले नेते आहेत. महाराष्ट्रातील खासदारांची कामे करणारे ते एकमेव मंत्री होते. मात्र, त्यांना काम करू दिले जात नाही. त्यामुळे मराठवाड्यातील 17 हजार 500 कोटींची कामे त्यांना करू दिली गेली नाही आणि त्यातून मराठवाड्याचे नुकसान झाले,असा आरोपही त्यांनी केला. तसेच संघ परिवार असल्याने गडकरी यांना पूर्णत: बाजूला करण्यात आलेले नाही, असेही खैरे यावेळी म्हणाले.
No comments:
Post a Comment